Thursday, January 5, 2023

 वृत्त क्रमांक 13 

अपघातापासून सुरक्षिततेसाठी उजवीकडून चाला

अभियानाचा 6 जानेवारीला शुभारंभ    

नांदेड, (जिमाका) दि. 5 :- रस्त्यावरील अपघातात पादचाऱ्यांचे वाढणारे निष्पाप बळी लक्षात घेऊन यावर उपाययोजनेसाठी आजवर अनेक उपक्रम राबविले. पूर्वीच्या प्रघातानुसार आपण डाव्या बाजुनेच रस्त्यावर चालल्यामुळे पाठीमागुन येणाऱ्या वाहनांची कल्पना न आल्याने गेलेले बळी अधिक आहेत. हे लक्षात घेऊन रस्त्यावर चालतांना समोरून येणारी वाहने आपल्याला दिसावीत व त्यापासून स्वत:ची सुरक्षा करता यावी यादृष्टीने नांदेड जिल्ह्यात उजव्या बाजुने चाला ही अभिनव मोहिम प्रादेशिक परिवहन विभागाने हाती घेतली आहे. 

या अभिनव मोहिमेचा शुभारंभ 6 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे केला जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कलामंदीर, एसपी ऑफीस चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर विद्यार्थी व मान्यवर उजव्या बाजुने चालून या अभियानाची सुरूवात करतील. याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय ते वजिराबाद पोलीस स्टेशन, महावीर चौक, वजिराबाद रोड, एसपी ऑफीस चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावरही विद्यार्थ्यांचा दुसरा गट उजव्या बाजुने चालून लोकांपर्यंत हा संदेश पोहचवतील. या उपक्रमात सर्वांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.

0000    

 वृत्त क्रमांक 12 

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक

अनुषंगाने विविध बाबींवरील निर्बंध आदेश निर्गमित  

नांदेड, (जिमाका) दि. 5 :- 05-औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2023 ची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पडावी या दृष्टीकोणातून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्‍वये प्रदान करण्‍यात आलेल्‍या अधिकाराचा वापर करुन जिल्‍हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी नांदेड जिल्ह्यासाठी विविध बाबींवरील निर्बंध आदेश दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी निर्गमीत केले आहेत.   

विश्रामगृहाच्या वापरावर नियंत्रण

शासकीय व निवडणुकीच्‍या कामावर असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्‍या व्‍यतीरिक्‍त इतर कोणत्‍याही व्‍यक्‍तीस विश्रामगृहात थांबण्‍यासाठी संबंधित खात्‍याने दिलेला अधिकृत परवाना असल्‍याशिवाय किंवा सक्षम अधिकाऱ्यांच्‍या पूर्व परवानगी शिवाय नांदेड जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय विश्रामगृहात अथवा त्‍या परिसरात प्रवेश करता येणार नाही. 

शासकीय वाहनाच्‍या गैरवापरास प्रतिबंध

निवडणूक कालावधीत नांदेड जिल्ह्यात कोणत्‍याही वाहनांच्‍या ताफ्यामध्‍ये तीन पेक्षा जास्‍त मोटारगाडया अथवा वाहने (Cars/Vehicles) वापरण्‍यास निर्बंध घालण्‍यात आले आहेत.  

शासकीय कार्यालय, विश्रामगृह इत्यादी परिसरात

मिरवणुका, घोषणा देणे, सभा घेण्यास निर्बंध

या निवडणूक कालावधीत नांदेड जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यालये, विश्रामगृह याठिकाणी पुढील बाबीस प्रतिबंध करण्यात आले आहे. कोणत्‍याही प्रकारची मिरवणूक / मोर्चा काढणे, सभा घेणे, उपोषण करणे, कोणत्‍याही प्रकारच्‍या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्‍हणने, कोणत्‍याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणे याबाबी करण्‍यास या आदेशान्‍वये बंदी घालण्‍यात आली आहे.  

ध्‍वनीक्षेपकाचा वापर नियंत्रीत करणे

कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था, पक्ष व पक्षाचे कार्यकर्ते यांना ध्‍वनीक्षेपक व धवनिवर्धकाचा वापर सक्षम प्राधिकाऱ्याच्या पुर्व परवानगी शिवाय करता येणार नाही. फिरत्या वाहनांवर ध्वनिक्षेप व ध्वनिवर्धकाचा वापर करता येणार नाही. महाराष्ट्र शासन पर्यावरण विभाग शासन निर्णय दिनांक 31 जुलै 2013 नुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर ध्वनी प्रदुषणाची पातळी विहित मर्यादेत राखून करावी. ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर सकाळी 6 वाजेपूर्वी व रात्री 10 वाजेनंतर करता येणार नाही. 

05-औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2023 च्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्याच्या हद्दीत हा आदेश दिनांक 2 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2023 च्या मध्यरात्री पर्यंत लागू राहील.  

00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...