Tuesday, February 8, 2022

 नांदेड जिल्ह्यात 54 व्यक्ती कोरोना बाधित

तर 289 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड (जिमाका) दि. 8 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 158 अहवालापैकी 54 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 46 तर अँटिजेन तपासणीद्वारे 8 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 590 एवढी झाली असून यातील 98 हजार 766 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 हजार 140 रुग्ण उपचार घेत असून यात 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे मुखेड तालुक्यातील हातरळ येथील 75 वर्षाच्या एका महिलेचा 7 फेब्रुवारी रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 684 एवढी आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 28, लोहा 1, परभणी 4, वाशीम 1, बिलोली 1, मुदखेड 1, उमरखेड 1, देगलूर 2, मुखेड 1, हिंगोली 2, हदगाव 1, नायगांव 2, लातूर 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा8 असे एकुण 54 कोरोना बाधित आढळले आहे. 

आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 199, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 77, खाजगी रुग्णालय 8 असे एकुण 289 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 22, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 538, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 553, खाजगी रुग्णालय 25, असे एकुण 1 हजार 140 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 56 हजार 920

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 37 हजार 980

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 590

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 98 हजार 766

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 684

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.27 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-44

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-1 हजार 140

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3. 

कोरोना विषाणूची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000

 प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या

लाभासाठी केवायसी बंधनकारक 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) पोर्टलवर नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची केवायसी 31 मार्च 2022 पर्यत पूर्ण करण्याबाबत शासनाच्या सूचना आहेत. या योजनेतर्गंत पात्र शेतकऱ्यांना योजनेचा एप्रिल-जुलै 2022 या कालावधीचा लाभ मिळण्यासाठी केवायसी प्रमाणिकरणाची प्रक्रीया बंधनकारक करण्यात आहे.


केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करुन दिलेले आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पीएम किसान https://pmkisan.gov.in या वेबसाईटवरील फॉर्मर कार्नर या टॅबमध्ये किंवा पीएम किसान अँपद्वारे ओटीपीद्वारे लाभार्थीना स्वत: केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल किंवा ग्राहक सेवा केंद्र सीएससी येथे प्रति लाभार्थी रुपये 15 रुपये दराने केवायसी प्रमाणीकरण बायोमॅट्रीक पध्दतीने करता येईल असे निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी कळविले आहे.

00000

 

 क्रीडा प्रबोधनीत सरळ प्रवेश व खेळनिहाय

कौशल्य चाचणीद्वारे प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 8 :- राज्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी प्रतिभावंत खेळाडूची निवड करण्यात येणार आहे. जिल्हयातील खेळाडूंनी आपले विहित नमुन्यातील अर्ज, जन्म दिनांक व क्रीडा कामगिरीबाबत आवश्यक कागदपत्रे ( क्रीडा प्रमाणपत्रे,/ आधारकार्ड/ जन्म दाखला इत्यादीसह) अर्ज 7 ते 15 फेब्रुवारी, 2022 या कालावधीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावेत. अधिक माहितीसाठी श्रीमती शीवकांता देशमुख ( राज्य क्रीडा मार्गदर्शक ॲथलेटिक्स ) यांचेकडे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

 

शास्त्रोक्त प्रशिक्षण, शिक्षण भोजन, निवास, अद्यावत क्रीडा सुविधा, क्रीडा प्रबोधीनीच्या अंतर्गत खेळाडूंना देण्यात येत आहेत. राज्यातील क्रीडा प्रबोधीनीमध्ये सरळ सेवा प्रवेश व खेळ निहाय कौशल्य चाचण्यांद्वारे निवासी व अनिवासी खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार आहे. यामध्ये अमरावती (आर्चरी, ज्युदो), नागपूर ( हॅण्डबॉल, ॲथलेटिक्स), अकोला ( बॉक्सींग), गडचिरोली (ॲथलेटिक्स), ठाणे (बॅडमिंटन), नाशीक ( शुटींग, ॲथलेटिक्स), कोल्हापूर (शुटींग, कुस्ती), औरंगाबाद ( ॲथलेटिक्स, हॉकी), पुणे ( टेबल टेनिस, वेट लिफटींग व जिम्नॅस्टीक्स) या खेळाचा समावेश असून याची अर्हता पुढीलप्रमाणे आहे.

 

सरळ प्रवेश प्रक्रीया- क्रीडा प्रबोधीनीत असलेल्या सबंधीत खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू ज्यांचे वय 19 वर्षाच्या आतील आहे, अशा खेळाडूंना सबंधीत खेळाबाबतची चाचणी तज्ञ समिती समक्ष देऊन प्रवेश निश्चीत केला जातो.

 

खेळनिहाय कौशल्य चाचणी - क्रीडा प्रबोधीनीतील सबंधीत खेळात राज्यस्तरावर सहभागी खेळाडूंना ज्यांचे वय 19 वर्षाच्या आतील आहे, अशा खेळाडूंना सबंधीत खेळाच्या खेळ निहाय कौशल्य चाचणीचे आयोजन करुन गुणनुक्रमे प्रवेश निश्चीत केला जातो.

 

अनिवास प्रवेश प्रक्रीया- अनिवास क्रीडा प्रबोधीनीमध्ये प्रवेशासाठी अधीकृत राज्य, राष्ट्रीय, स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय स्थान प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना प्राधान्याने प्रवेश देण्यात यईल. इतर खेळाडूंची त्यांच्या क्रीडा प्रकारानुसार विविध कौशल्याची चाचणी घेऊन त्या आधारे खेळाडूंना प्रवेश देण्यात येईल असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...