Thursday, February 8, 2018


"हत्तीरोग" उच्चाटनासाठी
सामुदायिक औषधोपचार मोहिम  
नांदेड, दि. 8 :- "हत्तीरोग" एक दिवसीय सामुदायिक औषधोपचार मोहिम जिल्ह्यात 10, 1112 फेब्रुवारी 2018 या कालावधीत ग्रामीण भागात तर शहरी, मनपा निवडक भागात 10 ते 14 फेब्रुवारी 2018 दरम्यान राबविली जाणार आहे. या मोहिमेत डीईसी अधिक अॅलबेनडॉझॉल गोळया खाऊ घालण्यासाठी आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, स्वंयसेवक येतील तेंव्हा या गोळया जेवन करुन (उपासी पोटी न घेता)  घेऊन शासनाच्या या मोहिमेस प्रतिसाद द्यावा व हत्तीरोगाच्या दूरीकरणासाठी सर्वानी हातभार लावावा, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. राजेंद्र पवार यांनी केले आहे.
जिल्ह्यात ही मोहिम राबविण्यासाठी 1 हजार 869 टिम ( 2 कर्मचाऱ्यांची एक टिम)  तयार करण्यात आली आहे. त्यावर 186 पर्यवेक्षक, 16 जिल्हास्तरीय पर्यवेक्षक व 10 जिल्हास्तरीय अधिकारी पाहणी करणार आहेत. ही मोहिम राबविण्यासाठी 76 लाख डि.ई.सी. गोळया व 30 लाख अलबेंडॉझॉल गोळया प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरापर्यंत पोहच करण्यात आल्या आहेत. जिल्हयात 35,27,985 लोकसंख्या पैकी 30,55,160 लोकसंख्या निवडलेली आहे. त्यात एकुण अपेक्षित लाभार्थी 28,41,298 आहेत. यात शुन्य ते 2 वर्षाचे बालके, गरोदर माता व गंभीर रुग्णांना वगळण्यात आले आहे. लोकसंख्येत नांदेड जिल्हयातील ग्रामीण, शहरी व मनपा नांदेड मधील हडको, सिडको  वाघाळा व तरोडा खु, बु परिसराचा समावेश आहे.
एक दिवसीय उपचार मोहिमेच्या गोळयाचा डोस
वयोगट
डी.ई.सी. 100 मि. ग्रॅम गोळ्याची मात्रा
ॲलबेनडॉझोल 400 मि.ग्रॅ
2 वर्षापेक्षा कमी 
निरंक   
निरंक   
2 ते 5 वर्षे
1 गोळी
1 गोळी
6 ते 14  वर्षे
2 गोळ्या
1 गोळी
15 वर्षावरील
3 गोळ्या
1 गोळी
भारतात "हिवताप" खालोखाल हत्तीरोग ही महत्वाची सार्वजनिक आरोग्याची समस्या आहे. जगातील 110 कोटी लोकसंख्येचा भाग हत्तीरोगग्रस्त आहे. 80 देशातील 12 कोटी लोंकाना याची लागण झालेली आहे. त्यापैकी 1 / 3 रुग्ण भारतात आढळतात. भारतात हा रोग देशभर पसरलेला असून त्यातल्या त्यात केरळ, आंध्रप्रदेश, ओरिसा, पं. बंगाल, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश व बिहार राज्यातील काही भागात हत्तीरोग रुग्ण जास्त प्रमाणात आढळतात. तर राज्यात नागपूर, नांदेड, चंद्रपूर, ठाणे, भंडारा, सोलापूर, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली आदी जिल्हयात जास्त प्रमाणात आढळते.
            बुचेरिया बॅक्रोपटाय व ब्रुग्रीया मलायी नावाच्या परजीवी जंतुमुळे हत्तीरोग हा आजार होतो. जेंव्हा डासाची क्युलेक्स मादी हत्तीरोग झालेल्या (आजारी) व्यक्तीस चावते तेंव्हा ती मानवाच्या शरीरातील जंतू रक्तासोबत शोषून घेते. डासाच्या शरीरात या जंतूची 12 ते 14 दिवसात वाढ होऊन पुनः दुस-या निरोगी व्यक्तीस जेंव्हा हा डास चावतो तेंव्हा, हे जंतू त्या व्यक्तीच्या शरीरात सोडतो. मानवाच्या शरीरात हे जंतू लसीका संस्थेत जातात. तेथे त्यांची वाढ होते. नर व मादी वेगळे होतात. नंतर नर व मादी जंतूचे मिलन होऊन असंख्य पिल्ले जन्म घेतात त्यांना आपण मायक्रोपफायलेरिया म्हणतो. नर व मादी मानवी शरीरात 5 ते 8 वर्षे राहतात. लसीकावाहिनीत हे जंतू अडकून बसल्याने तेथील भाग फुगीर बनतो व तेथेच संबंधीत व्यक्तीस विकृती येते त्यासच आपण लसीकाचा हत्तीरोग झाला असे म्हणतो. डास चावण्यापासून ते हत्तीरोगाचे लक्षणे दिसण्याचा कालावधी (अधिशयन काळ) 12 ते 18 महिने आहे.
            हत्तीरोगग्रस्त रुग्णाच्या लसीकाग्रृंथी सुजतात. जांघेत गाठ येते, वेदना होतात, रुग्णास ताप येतो, थंडी सुध्दा वाजते. काही पुरुषामध्ये वृषणदाह होतो. हातपाय व बाहय जननेंद्रिय सुजतात. रुग्णास अंडवृध्दी होते. या लक्षणामुळे रुग्ण सामाजिक उपेक्षेस पात्र ठरतो. रुग्णाचे लग्न होत नाही. अशा या हत्तीरोगाचे केंद्र शासनाने सन 2020 पर्यन्त उच्चाटण करण्याचे ठरविले आहे. सद्यस्थितीत हत्तीरोगाच्या नियंत्रणासाठी रुग्णांना औषधोपचार व डास नियंत्रण या कार्यप्रणालीनुसार हत्तीरोगाचे नियंत्रण करण्यात येते. जागतिक आरोग्य संघटनेने सुचविल्याप्रमाणे हत्तीरोगाच्या दूरीकरणासाठी "एकदिवसीय सामुहिक औषधोपचारएम.डी.ए. (मास ड्रग अॅडमिनिट्रेशन) सर्वाना (ज्यांच्या शरीरात मायक्रोफायलेरिया असोत किंवा नसोत, लक्षणे असोत किंवा नसोत) रोगाचा कायम प्रादुर्भाव असणा-या भागात दिला जातो. फक्त 2 वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रीयांना व खुप आजारी रुग्णांना हा औषधोपचार देवू नये.
            या एम.डी.ए. एकदिवसीय सामुहिक औषधोपचार मोहिम ही जवळ जवळ 12 दिवसाच्या हत्तीरोगाच्या समुळ उपचारा इतकीच प्रभावी आहे. हत्तीरोग रुग्ण शोधणे फार कठीण काम आहे. हत्तीरोगाचे संपुर्ण सर्वेक्षण होत नाही. रोगीचे रक्त नमुने घेणे, तपासणे व रुग्णास 12 दिवस औषधोपचार करणे. शिवाय रुग्णांना काहीच लक्षणे दिसून येत नाहीत. एकदम 10 ते 15 वर्षाला विकृती दिसून येते. म्हणून एम.डी.ए या एकदिवसीय डी.ई.सी अधिक अॅलबेनडॉझॉल गोळयाचा उपचार एक दिवसीय सतत पाच वर्षे केल्यास एकाच मात्रा (डोस) मुळे रुग्णाच्या शरीरात जर हत्तीरोगाचे जंतू असतील तर ते जंतू जवळ जवळ 95 टक्के मरतात. यामुळे रोग फैलावत नाही. पर्यायाने हत्तीरोगाच्या प्रसारास आळा बसतो, असेही जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. राजेंद्र पवार यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले केले आहे.
00000


उद्यम भांडवल निधी, सामुहिक प्रोत्साहन
योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
            नांदेड दि. 8 :- अनुसुचित जाती जमातीमधील औद्योगिक घटकांनी उद्यम भांडवल निधी सामुहिक प्रोत्साहन योजनेच्या इतर सवलतीचा लाभ घ्यावा असे महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, नांदेड यांनी आवाहन केले आहे.
          महाराष्ट्र शासनाने अनुसुचित जाती, अनुसुचित जमातीच्या उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामुहिक प्रोत्साहन योजना जाहीर केली आहे.  या योजनेतर्गत अनुसुचित जाती जमातीच्या उद्योजकांना उद्योग सुरु करण्यासाठी लागणारा तफावत निधी उपलब्ध करुन देण्याकरिता व्यवस्थापनासाठी  आयडीबीआय कॅपिटल मार्केट  न्ड सिक्युरीटीज लिमिटेड (ICMS) या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी उद्योजकांनी www.idbicapital.com   या संकेतस्थळावरुन माहिती अर्ज प्राप्त करुन घ्यावे. उद्योग   संचालनालयाच्या di.maharashtra.gov.in   या संकेतस्थळावरुन सुध्दा लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
00000


प्रलंबीत शिष्यवृत्तीचे प्रस्ताव
 सादर करण्याचे आवाहन   
नांदेड, दि. 8 :- काही विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती / शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, निर्वाह भत्ता आदी लाभ देण्याचे प्रलंबीत आहे. ते देण्यासाठी ई-स्कॉलरशीप संकेतस्थळ मर्यादित कालावधीसाठी सुरु करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 31 मार्च अखेर ऑनलाईन अर्ज केली आहेत परंतू ज्यांना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती इयत्ता 5 वी ते 7 वी, इयत्ता 9 वी व दहावीत शिकणाऱ्या अनु. जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व भारत सरकार शिष्यवृत्ती योजना इ. लाभ मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांचे प्रलंबित असलेले अर्ज शाळांनी पुनरुजीवित करण्यात आलेल्या संकेतस्थळावरुन शनिवार 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत आवश्यक कागदपत्रासह जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे पाठवावेत. त्यानंतर अर्ज प्रलंबित राहिल्यास शाळेचे मुख्याध्यापक जबाबदार राहतील, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्येंत आऊलवार यांनी केले आहे.  
शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परीक्षा आदी लाभ मिळाला नाही त्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाकडे प्रलंबित असलेले अर्ज, नुतनीकरण करावयाचे प्रस्ताव महाविद्यालयानी ई-स्कॉलरशीप संकेतस्थळावरुन गुरुवार 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे पाठवावीत, असे आवाहन नांदेडचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त व जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.  
सामाजिक न्याय विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा निर्वाह भत्ता, विद्यावेतन आदी योजनेच्या माध्यमातून आर्थिक लाभ दिला जातो. सन 2017-18  साठी राज्य शासनाने सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती महा-डीबीटी पार्टलमार्फत अदा करण्याचा निर्णय घेतला असल्याने  सामाजिक न्याय विभागाचे https://mahaeshol.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ संस्थागित करण्यात आले होते, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.  
000000


प्रणालीवर अद्ययावतीकरणासाठी
माहिती देण्याचे शस्त्र परवानाधारकांना आवाहन

नांदेड, दि. 8 : केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयामार्फत देशभरातील दि. 1 एप्रिल 2016 पर्यंतच्या शस्त्र परवानाधारक, शस्त्र दुरुस्ती/खरेदी-विक्री परवानाधारकांची माहिती NDAL (National Database for Arms Licenses) या प्रणालीमध्ये नोंदविण्याची मुदत 31 मार्च 2018 पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे त्यामुळे महाराष्ट्रातील दि. 1 एप्रिल 2016 पर्यंतच्या सर्व शस्त्र परवानाधारकांनी तातडीने संबंधित जिल्हाधिकारी/जिल्हादंडाधिकारी किंवा पोलीस आयुक्त यांच्याशी तात्काळ संपर्क साधून त्यांच्या शस्त्र परवान्याची माहिती उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन राज्य शासनाच्या गृह विभागाने केले आहे.
यापूर्वी ही प्रक्रिया दि.31 मार्च 2017 रोजी बंद करण्यात आली होती. परंतु आता केंद्र  सरकारच्या गृह मंत्रालयाने (आंतरिक सुरक्षा II) दि.28 नोव्हेंबर 2017 च्या अधिसूचनेद्वारे NDAL प्रणालीमध्ये माहिती नोंदवून घेण्याची अंतिम मुदत दि.31 मार्च 2018 पर्यंत वाढविलेली आहे.
शस्त्र परवानाधारक, शस्त्र दुरुस्ती/खरेदी-विक्री परवानाधारकांची माहिती NDAL (National Database of Arms Licenses) या  प्रणालीद्वारे गोळा करण्यात येते. या प्रणालीद्वारे माहिती अद्ययावत केल्यानंतर प्रत्येक परवानाधारकास विशिष्ट ओळख क्रमांक (UIN – Unique Identification Number) देण्यात येतो. या माहितीमध्ये परवानाधारकाची संपूर्ण माहिती, शस्त्राची तसेच शस्त्र उत्पादक व वितरक आदींची माहिती भरणे आवश्यक आहे. ही माहिती भरल्यानंतर प्रत्येक परवानाधारकास विशिष्ट ओळख क्रमांक घेणे बंधनकारक असून असा क्रमांक न घेतल्यास संबंधित शस्त्र परवानाधारकांचा शस्त्र परवाना रद्द होणार आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या गृह विभागाने शस्त्र परवानाधारक तसेच उत्पादक व वितरकांनी तातडीने माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
००००



  वृत्‍त क्र.   36 6 एमएच-सीईटी परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश   नांदेड , दि.   19   : - एमएच-सीईटी परीक्षा-2024     ही 2...