Thursday, July 9, 2020

वृत्त क्र. 629


कोरोनातून 12 व्यक्ती झाले बरे
  13 व्यक्ती बाधित तर एकाचा मृत्यू
नांदेड (जिमाका) दि. 9 :- कोरोना आजारातून आज पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 12 बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 353  व्यक्तीं कोरोनातून बरे झाले आहेत. गुरुवार 9 जुलै 2020 रोजी सायं 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकुण 112 अहवालापैकी 90 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले. यात नवीन 13 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे‍ जिल्ह्यातील एकुण बाधित व्यक्तीची संख्या 524 एवढी झाली आहे.  
विजयनगर येथील  75 वर्षाचा एका पुरुषाचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला आहे. या बाधितावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. या बाधिताला उच्च रक्तदाब, श्वसनास त्रास आणि मधुमेह इत्यादी आजार होते. त्यामुळे आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत्यू बाधितांची संख्या 24 एवढी आहे.
आज बाधित झालेल्या व्यक्तींमध्ये देगलूर नाका येथील 25 वर्षाचा 1 पुरुष, नांदेड तालुक्यातील वाघी येथील 25 वर्षाची 1 महिला, मुखेड नाथनगर येथील 6 महिन्याचे 1 बालक व 31 वर्षाची 1 महिला तसेच मुदखेड येथील 33 वर्षाचा 1 पुरुष यांच्या समावेश आहे व सर्व बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (नमूद सर्व 5 बाधितांचा अहवाल 8 जुलै रोजी रात्री उशिरा प्राप्त झाला आहे.) तसेच चाळीसगाव येथील 30 वर्षाचा 1 पुरुष, लक्ष्मीनगर येथील 24, 27 व 45 वर्षाच्या 3 महिला, नवीन हस्सापूर येथील 45 वर्षाची 1 महिला, मोहसीन कॉलनी 47 वर्षाची 1 महिला, धनगर टेकडी नांदेड येथील 42 व 45 वर्षाचे 2 पुरुष यांचा समावेश आहे. (नमूद सर्व 8 बाधितांचा अहवाल 9 जुलै रोजी सायं 5.30 वा. प्राप्त झाला आहे.)
आतापर्यंत 524 बाधितांपैकी 353 बाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरीत 147 बाधितांवर औषधोपचार चालू आहेत. यातील 18 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 10 महिला बाधित आणि 8 पुरुष बाधित यांचा समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यात 147 बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 45, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 59, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 8, नायगाव  कोविड केअर सेंटर येथे 8, जिल्हा रुग्णालय येथे 5 बाधित, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 7 बाधित, हिमायतनगर कोविड केअर सेंटर येथे 2, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 2, किनवट कोविड केअर सेंटर येथे 2, हदगाव कोविड केअर सेंटर येथे 1 बाधित तसेच नांदेड शहरातील एका खाजगी रुग्णालयात 2 बाधित व्यक्ती उपचार घेत असून 6 बाधित  औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत.
9 जुलै 2020 रोजी 248 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- 1 लाख 47 हजार 530,
घेतलेले स्वॅब- 7 हजार 610,
निगेटिव्ह स्वॅब- 6 हजार 329,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 13,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 524,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 12,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 2,
मृत्यू संख्या- 24,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 353,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 147,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 248 एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000

वृत्त क्र. 628   
महाविद्यालयीन शिष्यवृत्तीचे अर्ज
फॉरवर्ड करण्यास मुदतवाढ
नांदेड, दि. 9 (जिमाका) :- महाडिबीटी प्रणाली अंतर्गत शैक्षणिक वर्षे 2019-20 मधील महाविद्यालयाच्या लॉगिनवर प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज समाज कल्याण कार्यालयाच्या लॉगिनवर फॉरवर्ड करण्यासाठी संबंधीत महाविद्यालयाना 17 जुलै 2020 मुदतवाढ देण्यात आली आहे. याची संबंधित महाविद्यालयांनी नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.
भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क प्रतिपूर्ती, व्यवसायिक पाठ्यक्रमाच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता व राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेंतर्गत कनिष्ठ, वरीष्ठ अनुदानित, विनाअनुदानित, व्यवसायिक व बिगर व्यवसयिक अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी महाडिबीटी पोर्टल प्रणालीअंतर्गत www.mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ कार्यान्वीत करण्यात आले आहे.
अनु.जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना नमूद योजनेंतर्गत महाडिबीटी पोर्टल प्रणालीमध्ये ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर लाभाची रक्कम थेट विद्यार्थ्याच्या / महाविद्यालयांच्या वैयक्तीक बँक खात्यावर जमा करण्यात येते.
शैक्षणिक वर्ष 2019 -20 मधील महाडिबीटी पोर्टल प्रणालीमधील महाविद्यालयाच्या लॉगीनवर प्रलंबित असलेले अर्ज समाज कल्याण कार्यालयाच्या लॉगिनवर फॉरवर्ड करण्यासाठी 17 जुलै 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महाविद्यालयाच्या लॉगिनवर प्रलंबित असलेल्या अर्जाची महाविद्यालयस्तरावर छानणी करून आवश्यक सर्व कागदत्रांची पूर्तता करित असलेल्या पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयाच्या लॉगिन मधून समाज कल्याण कार्यालयाच्या लॉगिनवर फॉरवर्ड करावीत.
विनाअनुदानित व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज (हार्ड कॉपी) व आवश्यक कागदपत्र समाज कल्याण कार्यालयास छाननी प्रक्रीयेसाठी 17 जुलै 2020  पूर्वी सादर करावेत.
000000

वृत्त क्र. 627


 आस्थापनांना कर्मचाऱ्यांची माहिती
ऑनलाईन भरण्याचे आवाहन
नांदेड, दि. 9 (जिमाका) :- शासकिय-निमशासकिय कार्यालय तसेच खाजगी आस्थापनांनी जुलै 2020 या महिन्याचे वेतन देयक दाखल करताना जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांच्याकडे आपल्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची माहिती असलेले जून-2020 अखेरचे ई. आर-1 त्रैमासिक विवरणपत्र 31 जुलै 2020 पर्यंत भरावयाची मुदत आहे. कार्यालयाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळवरुन ऑनलाईन ई-आर 1 भरुन दिल्याचे ऑनलाईनचे प्रमाणपत्र देयकासोबत जोडल्याशिवाय मासिक वेतन देयके व इतर कोणतेही देयके कोषागारात स्विकारले जाणार नाहीत याची संबंधीतानी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक संचालक प्रशांत खंदारे यांनी केले आहे.
सर्व कार्यालयांना युजर आय.डी. व पासवर्ड यापुर्वीच देण्यात आलेला आहे. सर्व कार्यालयानी आपला ईमेल आय.डी. व फोन नंबर, पत्ता, टॅन नंबर,पॅन नंबर टाकून आपली प्रोफाईल अपडेट करावी, असेही त्यांनी सांगितले आहे.
00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...