Thursday, July 9, 2020

वृत्त क्र. 628   
महाविद्यालयीन शिष्यवृत्तीचे अर्ज
फॉरवर्ड करण्यास मुदतवाढ
नांदेड, दि. 9 (जिमाका) :- महाडिबीटी प्रणाली अंतर्गत शैक्षणिक वर्षे 2019-20 मधील महाविद्यालयाच्या लॉगिनवर प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज समाज कल्याण कार्यालयाच्या लॉगिनवर फॉरवर्ड करण्यासाठी संबंधीत महाविद्यालयाना 17 जुलै 2020 मुदतवाढ देण्यात आली आहे. याची संबंधित महाविद्यालयांनी नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.
भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क प्रतिपूर्ती, व्यवसायिक पाठ्यक्रमाच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता व राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेंतर्गत कनिष्ठ, वरीष्ठ अनुदानित, विनाअनुदानित, व्यवसायिक व बिगर व्यवसयिक अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी महाडिबीटी पोर्टल प्रणालीअंतर्गत www.mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ कार्यान्वीत करण्यात आले आहे.
अनु.जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना नमूद योजनेंतर्गत महाडिबीटी पोर्टल प्रणालीमध्ये ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर लाभाची रक्कम थेट विद्यार्थ्याच्या / महाविद्यालयांच्या वैयक्तीक बँक खात्यावर जमा करण्यात येते.
शैक्षणिक वर्ष 2019 -20 मधील महाडिबीटी पोर्टल प्रणालीमधील महाविद्यालयाच्या लॉगीनवर प्रलंबित असलेले अर्ज समाज कल्याण कार्यालयाच्या लॉगिनवर फॉरवर्ड करण्यासाठी 17 जुलै 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महाविद्यालयाच्या लॉगिनवर प्रलंबित असलेल्या अर्जाची महाविद्यालयस्तरावर छानणी करून आवश्यक सर्व कागदत्रांची पूर्तता करित असलेल्या पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयाच्या लॉगिन मधून समाज कल्याण कार्यालयाच्या लॉगिनवर फॉरवर्ड करावीत.
विनाअनुदानित व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज (हार्ड कॉपी) व आवश्यक कागदपत्र समाज कल्याण कार्यालयास छाननी प्रक्रीयेसाठी 17 जुलै 2020  पूर्वी सादर करावेत.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...