Friday, December 16, 2016

लेख -

राज्य शासकी निवृत्तीवेतनधारकांना
जीवन प्रमाणपत्र (Digital Life Certificate) सुविधा   
सेवा निवृत्तीवेतनधारकांना दरमहा प्राप्त होणारे निवृत्तीवेतन नियमितपणे सुरू राहण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये निवृत्तीवेतन धारकांना आपले हयातीचे प्रमाणपत्र आपल्या बँकेमार्फत अथवा थेट कोषागारामध्ये जमा करावे लागते. हयातीचे प्रमाणपत्र कोषागारामध्ये वेळेवर मिळू शकल्यास संबंधित निवृत्तीवेतन धारकांना त्यांचे निवृत्तीवेतन मिळण्यामध्ये अडचण किंवा विलंब होत असतो.
            या समस्येवर उपाय शोधण्याच्या हेतुने शासनाने जीवनप्रमाण www.jeevanpramaan.gov.in या नावाने वेबपोर्टल तयार केले आहे. राज्य शासकी निवृत्तीवेतन धारकांना हयातीचे दाखले देण्यासाठी बायोमेट्रीक म्हणजेच त्यांच्या बोटांचे ठसे किंवा त्यांच्या डोळयातीलआयरीस’ Finger Prints Reader किंवा Iris Reader या यंत्रावर ठेवून संबंधित निवृत्तीवेतन धारकाची ओळख पटविता येणे, शक्य झाले आहे. नुकतेच जिल्हा कोषागार कार्यालय नांदेड येथे बोटांचे ठसे वाचण्यासाठी Finger Prints Readers ही यंत्रे बसविण्यात आलेली आहेत.
            बोटांचे ठसे घेण्याची सुविधा आपल्या जिल्हा कोषागारामध्ये आणि सर्व उपकोषागार कार्यालयांमध्ये करण्यात आलेली आहे तसेच इतर कोषागार कार्यालय उपकोषागार कार्यालयातही ही सुविधा उपलब्ध झालेली आहे. नजीकच्या काळात ही सुविधा जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, राष्ट्रीयकृत बँका येथे देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या ठिकाणी निवृत्तीवेतन धारक व्यक्तीने आपली सर्व वैयक्तिक माहिती म्हणजेच त्यांचा पी.पी.. क्रमांक (Pension Payment Order), बँक पासबुक, नाव, मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती घेउन यावे. तेथे त्यांना ही माहितीजीवन प्रमाणपोर्टल वर भरण्यासाठी मदत केली जाईल. त्यांचे बायोमेट्रीक ऑथेंटीकेशन पूर्ण झाल्यावर त्याबाबत त्यांच्या मोबाईलवर त्यांना एसएमएस प्राप्त होईल. यासाठी पी.पी.. क्रमांक अचुक भरण्याची दक्षता घेणे गरजेचे आहे.
            जीवन प्रमाणपत्र प्राप्त करण्याची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतरजीवन प्रमाणसंकेतस्थळावर 'Pensioner Log-in’ केल्यास Digital Life Certificate सादर करण्याची कोषागार कार्यालयात स्वीकृती यशस्वीरीत्या झाली किंवा नाही याची देखील माहिती संकेतस्थळावर आपल्याला मिळू शकेल.
            अर्थातच ही नवीन (Digital Life Certificate) सुविधा आपल्याला मिळालेली एक जास्तीची सुविधा आहे. आतापर्यंत आपण वापरत असलेलीकागदी हयातीचे प्रमाणपत्र किंवा दाखलेहे यापुढे देखील देता येतील. त्यामुळे ज्यांना या सुविधेचा लाभ घेता येणे, अडचणीचे वाटत असेल, त्यांना यापूर्वी प्रमाणेच आपले हयातीचे दाखले आपल्या बँकेमार्फत, पोस्टाव्दारे किंवा थेट कोषागार किंवा तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या उपकोषागारामध्ये पाठविता येतील.
            आपल्या निवृत्तीवेतनाचे प्रदान नियमीतपणे होण्यासाठी नोव्हेंबर महिन्यामध्ये तसेच त्यांनतरदेखील या नवीन ‘Digital Life Certificate’ सुविधेचा जास्तीत जास्त सेवा निवृत्तीवेतन धारकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
-    मनोज एस. गग्गड

   जिल्हा कोषागार अधिकारी नांदेड
तुर, हरभरा पिक संरक्षणासाठी
कृषि विभागाचा संदेश
 नांदेड , दि. 16 : -  जिल्ह्यात तुर व हरभरा पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पाअंतर्गत काम सुरु आहे. किडीपासून संरक्षणासाठी पुढील प्रमाणे संदेश देण्यात आला आहे.
तुर पिकांवरील शेंगा खाणाऱ्या अळ्याच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के एसजी 0.45 ग्रॅम प्रति लिटर किंवा क्लोरॅनट्रयानीप्रोल 18.5 टक्के एससी 0.3 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. हरभरा घाटेअळीसाठी निंबोळी अर्क 5 टक्के किंवा एचएएनपीव्ही 500 मिली प्रति हेक्टर या प्रमाणे फवारणी करावी. पक्षी थांबे प्रति हेक्टर 50 उभारावेत, असे आवाहन नांदेड उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.

0000000
केळी पिक संरक्षणासाठी संदेश
 नांदेड , दि. 16 : - उपविभागीय कृषि  कार्यालय नांदेड अंतर्गत मुदखेड अर्धापूर  या तालुक्यात  केळी पिकासाठी  किड रोग सर्वेक्षण हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. केळी पिक संरक्षणासाठी पुढील प्रमाणे  संदेश देण्यात आला आहे.
केळीच्या पानावर रोगाचा प्रादुर्भाव आकाराने जास्त असेल तर  त्याचा परिणाम प्रकाश संश्लेषणावर होतो. पानाचा प्रादुर्भाव ग्रस्त भाग काढ टाकावा.  झाडावर प्रोपीकोनेझॉल 0.05 टक्के (0.5मि.ली.) मिनरल ऑईल 1 टक्के ( 10 मि.ली ) प्रति लिटर पाण्यात  मिसळुन फवारणी करावी, असे आवाहन डॉ. व्ही. व्ही. भरगंडे  उपविभागीय कृषि अधिकारी  नांदेड  यांनी केले आहे.

000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...