Friday, November 10, 2023

जुन्या पोलीस पाटील किंवा त्यांच्या वारसांकडे जन्म मृत्यू नोंदवह्या असल्यास तहसिल कार्यालयात जमा करण्याचे आवाहन

 जुन्या पोलीस पाटील किंवा त्यांच्या वारसांकडे जन्म मृत्यू

नोंदवह्या असल्यास तहसिल कार्यालयात जमा करण्याचे आवाहन

 

नांदेड, (जिमाका) दि.10 :-  मराठा समाजातील व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत गावातील जुन्या पोलीस पाटील किंवा त्यांच्या वारसांकडे गाव नमुना क्रमांक 14 (जन्म मृत्यू नोंदवह्या) उपलब्ध असतील तर त्यांनी अशा नोंदवह्या संबंधित तालुक्याचे तहसिल कार्यालयात रितसर जमा कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहेत.

 

मराठा समाजातील व्यक्तींना, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत शासन निर्णयातील तरतुदी विचारात घेवून कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्राच्या अनुषंगाने 1967 पूर्वी कार्यरत पोलीस पाटील यांचेकडील गाव नमुना क्रमांक 14 (जन्म मृत्यू नोंदवह्यामध्ये कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी अशा जात नोंदी आढळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुने पोलीस पाटील किंवा त्यांच्या वारसांनी अशा नोंदवह्या उपलब्ध असल्यास तहसिल कार्यालयास जमा कराव्यात असे जिल्हा प्रशासनाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

रब्बी हंगामात गहु, ज्वारी, हरभरा या पिकांसाठी 1 रुपयात पिक विमा

 रब्बी हंगामात गहु, ज्वारी, हरभरा

या  पिकांसाठी 1 रुपयात पिक विमा

 

नांदेड, (जिमाका) दि.10 :- प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम 2023-24 मध्ये एक रुपयामध्ये पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पिक विमा उतरविण्याची अंतिम मुदत ज्वारी  जि. पिकासाठी 30 नोव्हेंबर 2023 असून गहू बा. व हरभरा पिकासाठी 15 डिसेंबर आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी किंवा जवळच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

 

प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. पिक पेरणीतून काढणीपर्यतचा कालावधी नैसर्गिक आग, वीज, कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड इ. बाबीमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट काढणीपश्चात नुकसान इ. जोखीम यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील गहु बा, ज्वारी (जि), हरभरा या पिकांसाठी ही योजना लागू आहे.

 

या योजनेअंतर्गत पिक, विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता, विमा लागू असलेले तालुके, पिक विमा भरण्याचा अंतिम दिनांक पुढीलप्रमाणे आहे. गहू बा. पिकासाठी हेक्टरी 42 हजार 500 विमा संरक्षित रक्कम रुपये असून विमा हप्ता रु. 1 आहे. नांदेड, अर्धापूर, मुदखेड, बिलोली, लोहा, कंधार, नायगाव, धर्माबाद, किनवट, हिमायतनगर, भोकर, हदगाव या तालुक्यासाठी लागू असून विमा भरण्याची अंतिम मुदत 15 डिसेंबर आहे. ज्वारी जि. पिकासाठी 33 हजार 750 विमा संरक्षण असून 1 रुपयात नांदेड, देगलूर, नायगाव, बिलोली, मुखेड, धर्माबाद, किनवट, हदगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांना 30 नोव्हेंबर 2023 पर्यत विमा भरता येणार आहे. हरभरा पिकासाठी 37 हजार 500 विमा संरक्षित रक्कम असून नांदेड, अर्धापूर, मुदखेड, बिलोली, लोहा, कंधार, नायगाव, धर्माबाद, मुखेड, किनवट, माहूर, हिमायतनगर, भोकर, हदगाव, उमरी या तालुक्यातील शेतकऱ्यांना 15 डिसेंबर 2023 पर्यत 1 रुपयात विमा भरता येणार आहे, असे कृषी अधीक्षक कृषी कार्यालयाने कळविले आहे.

0000

विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेद्वारे पात्र लाभार्थ्यांपर्यंत अधिकाधिक योजना पोहोचवा - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेद्वारे

 

पात्र लाभार्थ्यांपर्यंत अधिकाधिक योजना पोहोचवा

 

-         जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

·         15 नोव्हेंबर रोजी किनवट येथे मोहीमेचा शुभारंभ

 

नांदेड, (जिमाका) दि.10 :-  शासनाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम राबविण्यात येत आहे. सुरुवातीला अनुसूचित जमाती असलेल्या 110 जिल्ह्यांना ही यात्रा भेट देणार आहे. यात किनवट तालुक्याचा समावेश आहे.  किनवट येथे 15 नोंव्हेंबर रोजी या यात्रेच्या रथाचे स्वागत व मोहीमेचा शुभारंभ होणार आहे. या मोहीमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विभाग प्रमुखांनी त्या-त्या विभागाच्या योजना वंचित लाभार्थ्यांपर्यत पोहचविण्याच्या दृष्टीने योग्य नियोजन करावेअसे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्य मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवालसहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कार्तीकेएन एसजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदेजिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडेजिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटेआत्मा प्रकल्प उपसंचालक माधुरी सोनवणेजिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुले, जिल्हा सूचना-विज्ञान अधिकारी प्रफुल्ल कर्णेवार आदीची तर सर्व तालुक्याचे मुख्याधिकारीगटविकास अधिकारीतालुका आरोग्य अधिकारीशिक्षण विस्तार अधिकारी यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थिती होती.

 

जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा मोहीमेचा पहिला टप्पा 15 ते 23 नोंव्हेंबर या कालावधीत किनवट येथे प्रस्तावित आहे. या कालावधीत ही यात्रा मोहीम 16 ग्रामपंचायतीना भेट देणार आहे. या मोहीमेच्या अंमलबजावणीसाठी नोडल अधिकारी नेमणूकग्रामपंचायतीचा रस्त्याचा नकाशाकार्यक्रमाच्या दिवशी नेमलेल्या नोडल अधिकाऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करणेकार्यक्रमाच्या दिवशी कार्यक्रमाचे फोटो व व्हीडीओ अपलोड करणे याबाबत माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी किनवट तालुक्याच्या मुख्याधिकारी व गटविकास अधिकारी यांना सांगितली. तसेच या मोहीमेसाठी तालुका व ग्रामपंचायत स्तरावर समित्या गठीत करुन प्रत्येक कामासाठी समन्वय अधिकारी नियुक्त करावेत. स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधीलाभार्थीव्यापक जनसहभाग व जिल्हा समन्वयक यांच्या सहकार्याने ही मोहिम यशस्वी राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संबंधित विभागाला दिल्या.

 

विकसित भारत संकल्प यात्रा या मोहीमेचा शुभारंभ 15 नोव्हेंबर रोजी किनवट येथे होणार आहे. त्या अनुषंगाने तालुका व ग्रामपंचायत स्तरावर समित्या तात्काळ गठीत कराव्यात. या यात्रेच्या माध्यमातून आपल्याला वंचित लाभार्थ्यांपर्यत पोहोचायचे आहे. त्यासाठी संबंधित विभागाने लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्याच्या कामावर प्राधान्याने भर द्यावाअसे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी स्पष्ट केले. या मोहीमेत आरोग्यकृषीआवासआयुष्यमान भारतपीएम गरीब कल्याण अन्न योजनापीएम विश्वकर्माजन धन योजनाअटल पेन्शन योजनाबीमा योजनापीएम पोषण अभियानदिनदयाल अंत्योदय योजना आदीचा समावेश आहे. तसेच आदीवासी विभागासाठी विशेष योजनास्कॉलरशिप योजनावंदन योजनाउज्वला योजनाउजाला योजना अशा विविध विभागाच्या योजनाचा यात समावेश असणार आहे. या योजनाचा लाभअर्ज भरुन घेणे याबाबीचा यात समावेश असणार आहे. या मोहीमेच्या अनुषंगाने केलेली कार्यवाही तसेच फोटोव्हीडीओ संबंधित अधिकाऱ्यांनी पोर्टलवर अपलोड करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या.

0000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...