Friday, November 20, 2020

 

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या

पात्र परिसरात कलम 144 लागू

नांदेड (जिमाका) दि. 20 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 20 नोव्हेंबर 2020 पासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत. 

याबंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 डिसेंबर 2020 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे. 

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

 

26 नोव्हेंबर हा दिवस हुंडाबंदी दिन

म्हणून साजरा करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- महिला व बालविकास विभागाचे शासन परिपत्रक 28 जुलै 2006 नुसार हुंडाबंदी दिन 26 नोव्हेंबर 2020 रोजी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, विभाग संस्थांनी साजरा करावा. हुंडाबंदीबाबत सर्वांनी शपथ घेऊन या दिवसापासून हुंडाबंदी सप्ताह पाळावा, असे आवाहन जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  

00000

37 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

   तर 76 कोरोना बाधितांची भर    

नांदेड (जिमाका) दि. 20 :- शुक्रवार 20 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 37 कोरोना बाधित व्यक्तींम सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 76 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 41 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 35 बाधित आले. 

आजच्या एकुण 1 हजार 424 अहवालापैकी  1 हजार 301 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता  19 हजार 849 एवढी झाली असून यातील  18  हजार 819 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 291 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 17 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

आज रोजी प्राप्त अहवालानुसार एकाही रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला नाही. जिल्ह्यातील बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 543 झाली आहे. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 6, खाजगी रुग्णालय 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 3, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 14 असे एकूण 37 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.81 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 40, नायगाव तालुक्यात 1 असे एकुण 41 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 18, अर्धापूर तालुक्यात 3, किनवट 1, लोहा 1, नांदेड ग्रामीण 3, भोकर 5, मुखेड 3, नायगाव 1 असे एकुण 35  बाधित आढळले. 

जिल्ह्यात 291 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 26, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 28, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे 24, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 123, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 6, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 7, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 8, बिलोली कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 3, भोकर कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 16, कंधार कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 2, अर्धापूर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 4, धर्माबाद तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 4, खाजगी रुग्णालय 32, हैदराबाद येथे संदर्भित 1, औरंगाबाद येथे संदर्भित 1, लातूर येथे संदर्भित 4, अकोला येथे संदर्भित 1 आहेत.  

शुक्रवार 20 नोव्हेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 172, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 78 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 32 हजार 955

निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 9 हजार 166

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 19 हजार 849

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 18 हजार 819

एकूण मृत्यू संख्या- 543

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.81 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-38

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-9

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-658

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-291

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-17. 

आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

00000

 

रब्बी हंगामासाठी निम्म मानार प्रकल्पातून

पहिली पाणीपाळी 25 नोव्हेंबर पासून सुरु 

नांदेड (जिमाका) 20 :- जिल्ह्यातील मोठे प्रकल्प निम्न मानार (बारुळ) यात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध असून या प्रकल्पावर रब्बी हंगाम 2021 साठी नियोजन करण्यात आले आहे. निम्न मानार प्रकल्पातून प्रथम रब्बी हंगामासाठी पाणीपाळी 25 नोव्हेंबर 2020 पासून सुरु होणार आहे. लाभक्षेत्रातील सर्व बागायतदारांनी पाटबंधारे शाखेत रितसर पाणी अर्ज देऊन पाणीपट्टी भरुन सिंचनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. 

सध्या आचारसंहिता लागु असल्याने कालवा सल्लागार समीतीच्या फक्त शासकीय सदस्यांची बैठक घेण्यात आली असून रब्बी हंगामात तिन पाणी पाळी देण्याचे नियोजन केले आहे. तर उर्वरीत पाणीपाळी बाबतचा निर्णय नियमीत कालवा सल्लागार समीतीच्या बैठकीत घेण्यात येईल. 

निम्न मानार प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील बागायतदारांनी नमुना नंबर 7, 7() मध्ये पाणी अर्ज मागविण्यात येत आहेत. पुढील दर्शविलेल्या शर्तीस शासनाच्या प्रचलित नियमास अनुसरुन पाणी अर्जास मंजूरी देण्यात येईल. महाराष्ट्र शासन,जलसंपदा विभागाने वेळोवेळी निर्गमीत केलेल्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सर्व शर्ती व अटी बंधनकारक राहतील याची सर्व लाभधारकांनी नोंद घ्यावी. 

आवर्तन प्रारंभ होण्याच्या व समाप्त होण्याच्या दिनांकामध्ये क्षेत्रीय परिस्थितीनुसार थोडा बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रब्बी हंगामी, दुहंगामी व इतर बारमाही पिकांसाठी कालव्याचे प्रवाही, मंजुर उपसा, मंजुर जलाशय उपसा व मंजुर नदी, नाले उपसा सिंचनासाठी ज्यांना पाणी घ्यावयाचे आहे त्यांनी आपले पाणी मागणी अर्ज विहीत नमुन्यात व विहीत दिनांकापुर्वी संबधित शाखा कार्यालयात दाखल करावेत. पिकांचे मागणी क्षेत्र 20 आरच्या पटीत असावे. कालवा संचलन कार्यक्रमानुसारच पाणी घेणे बंधनकारक आहे. पाणीपट्टी  न भरणाऱ्या व पाणी अर्ज नामंजुर असलेल्या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे या कार्यालयास बंधनकारक राहणार नाही. काही अपरिहार्य कारणास्तव किंवा तांत्रिक कारणास्तव पाणी पुरवठा करणे शक्य न झाल्यास होणाऱ्या नुकसानीस हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. लाभधारकांनी दिवस व रात्रीच्या वेळेस पाणी घेणे बंधनकारक आहे. रात्रीच्या वेळेस पाणी न घेतल्यामुळे पाणी नदीनाल्यास वाया जावुन ठराविक मुदतीत पाणी न मिळाल्यास या कार्यालयाची जबाबदारी राहणार नाही. शासन निर्णयातील प्रचलित दरानुसार पाणीपट्टीचे दर आकारण्यात येतील. शेतचारी स्वच्छ व दुरुस्त ठेवण्याची जबाबदारी संबंधीत लाभधारकांची राहील. उडाप्याच्या अंतीम क्षेत्रास पाणी पुरवठा करणे बंधनकारक राहणार नाही. पाणी पाळी सुरु असताना जबरदस्तीने अथवा विनापरवानगी विद्युत मोटारी, ट्रॅक्टरद्वारे पाणी उपसा करणे अथवा गेट उघडल्यास नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. कमी पाण्यात व कमी वेळात सिंचन करुन राष्ट्रीय जलसंपतीचा काटेकोर पणे वापर करावा. पाणी नाश कटाक्षाने टाळावा. महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील तरतुदी नुसार सर्व शर्ती व अटी बंधनकारक राहातील याची सर्व लाभधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग (दक्षिण) चे कार्यकारी अभियंता एन. व्ही. पत्तेवार यांनी केले आहे.

000000

 

रब्बी हंगामासाठी शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी 

प्रकल्पातून 25 नोव्हेंबरला प्रथम पाणीपाळी 

नांदेड (जिमाका) 20 :- शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाच्या धरणातील उपलब्ध पाणी साठ्यानुसार रब्बी हंगाम 2020-21 साठी एकुण तीन पाणी पाळया देण्याचे नियोजन आहे. यात पहिली पाणीपाळी बुधवार 25 नोव्हेंबर 2020 पासून देण्याचे नियोजन आहे. याबाबत शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाच्या कालव्यावरील लाभधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग उत्तरचे कार्यकारी अभियंता एन. पी. गव्हाणे यांनी केले आहे. 

शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाच्या धरणातील उपलब्ध पाणी साठ्यानुसार रब्बी हंगाम 2020-21 साठी कालव्यावरील प्रथम पाणीपाळी आवर्तनाचे नियोजन 19 नोव्हेंबर 2020 रोजी प्रकल्पाचा कालवा समितीच्या शासकीय सदस्यांच्या बैठकीत करण्यात आले आहे. उर्वरित पाणीपाळया बाबतचा अंतिम निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात येईल. परंतू पाऊस व इतर अपरीहार्य कारणामुळे वेळापत्रकात बदल करण्यात येईल.  रब्बी हंगाम 2020-21 पाणीपाळी क्र.1. बुधवार 25 नोव्हेबर 2020 शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील बागायतदारांनी नमुना नंबर 7  व 7 अ मध्ये पाणी अर्ज मागविण्यात येत आहेत. पुढील दर्शविलेल्या शर्तीस शासनाच्या प्रचलित नियमास अनुसरुन पाणी अर्जास  मंजुरी देण्यात येईल. जलसंपदा विभागाने वेळोवेळी निर्गमीत केलेल्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सर्व शर्ती व अटी बंधनकारक राहतील याची सर्व लाभधारकांनी नोंद घ्यावी. 

आवर्तन प्रारंभ होण्याच्या  व समाप्त  होण्याच्या दिनांकमध्ये  क्षेत्रीय परिस्थितीनुसार  थोडा बदल  होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  रब्बी हंगामी दुहंगामी व इतर  बारमाही पिकांसाठी कालव्याचे  प्रवाही / मंजुर उपसा मंजुर जलाशय उपसा व मंजूर नदी /नाले उपसा सिंचनासाठी ज्यांना पाणी घ्यावयाचे आहे त्यांनी आपले पाणी मागणी अर्ज विहीत नमुन्यात व विहीत दिनांकापूर्वी संबंधित शाखा कार्यालयात दाखल करावेत. पिकांचे मागणी क्षेत्र 20 आर च्या पटीत असावे. कालवा संचलन कार्यक्रमानुसारच पाणी घेणे बंधनकारक आहे. पाणीपट्टी व भरणाऱ्या व पाणी अर्ज नामंजूर असलेल्या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे  या कार्यालसास बंधनकारक राहणार नाही. काही अपरिहार्य किंवा तांत्रिक कारणास्तव पाणी पुरवठा करणे शक्य न झाल्यास होणाऱ्या नुकसानीस हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. लाभधारकांनी दिवस व रात्रीच्या वेळेस पाणी घेणे बंधनकारक आहे. रात्रीच्या वेळेस पाणी न घेतल्यामुळे पाणी नदीनाल्यास वाया जावून ठराविक मुदतीत पाणी न मिळाल्यास या कार्यालयाची जबाबदारी राहणार नाही. शासन निर्णयातील प्रचलित दरानुसार पाणीपट्टीचे दर आकारण्यात येतील. शेतचारी स्वच्छ व दुरुस्त ठेवण्याची जबाबदारी संबधीत लाभधारकांची राहील. उडाप्याच्या अंतिम क्षेत्रास पाणी पुरवठा करणे बंधनकारक राहणार नाही. पाणी पाळी सुरु असताना जबरदस्तीने अथवा विनापरवानगी विद्युत मोटारी, ट्रॅक्टरद्वारे पाणी उपसा करणे अथवा गेट उघडल्यास नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. कमी पाण्यात व कमी वेळात सिंचन करुन राष्ट्रीय जलसंपतीचा काटेकोरपणे  वापर करावा. पाणी नाश कटाक्षाने टाळावा. महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील तरतुदी नुसार सर्व शर्ती व अटी बंधनकारक राहातील याची सर्व लाभधारकांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग उत्तरचे कार्यकारी अभियंता एन. पी. गव्हाणे यांनी केले आहे.

00000

 

जिल्हा ग्रंथालय कार्यालयात -ग्रंथालय आज्ञावली सेवा

ग्रंथालयांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन वाचकांना सेवा पुरवावी

- सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे  

नांदेड (जिमाका) 20 :- सार्वजनिक ग्रंथालयांनी आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करुन  वाचकांना ग्रंथालयीन सेवा पुरवणे काळाची गरज आहे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात सार्वजनिक ग्रंथालयांनी काळाची गरज म्हणून  फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अॅप, -ग्रंथालय आज्ञावली इतर मार्गांनी वाचकापर्यंत पोहचून जास्तीत जास्त वाचक जोडावेत जेणेकरुन आपल्या ग्रंथालयातील उपलब्ध साहित्याचा वाचकांना लाभ होईल, असे प्रतिपादन औरंगाबाद विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांनी केले. ते जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड येथे -ग्रंथालय आज्ञावलीद्वारे वाचकांना देण्यात येणाऱ्या ग्रंथ देव-घेव, OPAC इतर ग्रंथालयीन सेवांच्या द्घाटन प्रसंगी बोलत होते. 

याप्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, वाचक बसवराज कडगे काका, राजेंद्र हंबीरे, अनील बावीस्कर, प्रताप सुर्यवंशी यांची उपस्थिती होती. सर कार्याक्रमात श्री हुसे यांचे हस्ते जेष्ठ वाचक कडगे काका यांना प्रातिनिधीक सभासद कार्ड पहिल्या ग्रंथाचे -ग्रंथालय आज्ञावली मार्फत वाटप करण्यात आले. 

जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी  प्रास्ताविकात कार्यालयात -ग्रंथालय आज्ञावली बाबत तसेच  कार्यालयात झालेल्या एक कामाबाबत भविष्यात याद्वारे देण्यात येणाऱ्या सेवांबाबत उपस्थितीतांना माहिती दिली. याप्रसंगी जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव राजेंद्र हंबीरे कडगे काका यांनी सुध्दा याप्रसंगी मार्गदर्शन केले. या कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्र. के. सुर्यवंशी, के. एम. गाडेवाड, संजय पाटील, गजानन कळके आदीनी प्रयत्न केले.

000000





  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...