Friday, January 9, 2026

वृत्त क्रमांक 30

“हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समित्यांनी समन्वय ठेवावा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला सर्व समित्यांचा सविस्तर आढावा

नांदेड, दि. ९ जानेवारी : श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त “हिंद दी चादर” हा भव्य व ऐतिहासिक कार्यक्रम २४ व २५ जानेवारी रोजी नांदेड येथे होत आहे. या कार्यक्रमास देश-विदेशातून सुमारे १० लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असून, येणाऱ्या भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी सर्व समित्यांनी दिलेली जबाबदारी वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे या कार्यक्रमासाठी गठीत करण्यात आलेल्या २५ समित्यांचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला. यावेळी प्रत्येक समितीने आतापर्यंत केलेल्या कामाचा सविस्तर आढावा घेऊन पुढील नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या आढावा बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी अजय शिंदे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, मुख्यमंत्री सहायता निधी राज्य समन्वयक डॉ. रितेश पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

नांदेड येथे तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा असल्यामुळे येथील समागमाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे नमूद करत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले की, या कार्यक्रमासाठी विविध ९ समाजांचे महंत व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम गुरुघर समजून येणाऱ्या प्रत्येक भाविकांचा यथोचित सन्मान होईल, यासाठी सर्वांनी जबाबदारीने व समन्वयाने कार्य करावे. या भव्य ऐतिहासिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक संस्था, उद्योजक, होमगार्ड, नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात योगदान द्यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जागरण व्यवस्थापन समिती, मैदान व्यवस्थापन समिती, मंडप व्यवस्थापन समिती, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापन समिती, सुरक्षा व्यवस्थापन समिती, स्वयंसेवक व्यवस्थापन समिती, अतिथी स्वागत समिती, लंगर/भोजन व्यवस्थापन समिती, स्वच्छता व्यवस्थापन समिती, वैद्यकीय सेवा समिती, विद्युत व ध्वनी व्यवस्थापन समिती, प्रसिद्धी व मीडिया समिती, कार्यक्रम सादरीकरण समिती, ध्वज व सजावट समिती, आर्थिक व्यवस्थापन समिती, शासकीय परवानगी समिती, जुताघर व्यवस्थापन समिती, जलपुरवठा समिती, महिला सेवा समिती, ज्येष्ठ नागरिक समिती, जिल्हा समन्वय समिती, स्वरूपा व्यवस्थापन समिती, सुरक्षा व तपासणी समिती, निवास व्यवस्थापन समिती, प्रदर्शनी समिती तसेच राखीव समिती यांनी केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. तसेच समिती प्रमुखांना येणाऱ्या अडचणी, आवश्यक मनुष्यबळ व साहित्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

00000






कृपया सोबत - वृत्त चित्रफित लिंक

https://drive.google.com/file/d/1wUdluBV5lvTqDdCXnsJrb-fVJP02orfw/view?usp=drive_link



 वृत्त क्रमांक 29

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालतीचे आयोजन

नांदेड दि. 9 जानेवारी :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 13 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000

 वृत्त क्रमांक 28

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत उत्कृष्ट रुग्णसेवा :
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा उल्लेखनीय कामगिरीचा आदर्श
 

नांदेड दि. 9 जानेवारी :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णूपुरी नांदेड येथे आयुष्यमान भारत योजना व सलग्नित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून, या योजनांअंतर्गत रुग्णसेवेच्या क्षेत्रात एक उल्लेखनीय व आदर्शवत कामगिरी करण्यात आलेली आहे. 

अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या सक्षम नेतृत्वाखाली तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या अध्यक्षा व उप-अधिष्ठाता डॉ. शितल राठोड-चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयाने राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवेच्या दर्जात लक्षणीय भर घातली आहे. 

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सन 2025 या कालावधीत एकूण 7041 पेक्षा अधिक गरीब, गरजू व सर्वसामान्य रुग्णांना गंभीर व अतिगंभीर आजारांवरील उपचार पूर्णतः विनामूल्य स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णांच्या आरोग्यस्थितीत लक्षणीय सुधार झाल्याचे निदर्शनास येत आहे. 

या कालावधीत योजनेअंतर्गत उपचारांपोटी शासनाकडे एकूण रु. 18 कोटी 85 लक्ष 47 हजार 800/- इतकी विमा रक्कम प्राप्त झाली असून, सदर रक्कमेतून रुग्णांच्या निदानासाठी आवश्यक असलेल्या विविध तपासण्या, औषधोपचार व शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत. 

सद्यस्थितीत रुग्णालयात विविध आजारांवर अद्ययावत व सक्षम उपचार सुविधा कार्यान्वित असून, सर्व विभागांमार्फत समन्वयाने रुग्णसेवा देण्यात येत आहे. 

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर. के. अंबुलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हिप रिप्लेसमेंट, नी रिप्लेसमेंट तसेच मणक्याच्या गंभीर शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या असून अनेक रुग्णांना नवजीवन मिळाले आहे.

औषधवैद्यकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शितल राठोड-चव्हाण तसेच डॉ. कपिल मोरे, डॉ. उबेदुल्ला खान, डॉ. अंजली देशमुख, डॉ.फारुखी राफे यांच्या मार्गदर्शनाखाली जीबीएस (Guillain-Barré Syndrome), ब्रेन हॅमरेज, हार्ट अटॅक यांसारख्या अतिगंभीर रुग्णांवर प्रभावी उपचार करून त्यांना पूर्णतः बरे करून घरी सोडण्यात आले. 

शल्यचिकित्सा शास्त्र विभाग प्रमुख डॉ. अनिल देगावकर, डॉ. केळकर व डॉ. सुनील बोंबले यांच्या मार्गदर्शनाखाली कर्करोगावरील शस्त्रक्रिया तसेच पोटाच्या व आतड्याच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया योजनेअंतर्गत यशस्वीपणे पार पाडण्यात आल्या. 

बालरोगशास्त्र विभाग प्रमुख डॉ. किशोर राठोड, डॉ. सलीम तांबे, डॉ. अरविंद चव्हाण व डॉ. गजानन सुरेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निओ-नेटल बेबी केअर, कमी वजनाची नवजात अर्भके तसेच पीआयसीयू मधील अतिगंभीर बालरुग्णांना योजनेअंतर्गत उपचार देऊन जीवनदान देण्यात आले. 

स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. आर. वाकोडे, डॉ. फसिया व डॉ. शिरीष धुलेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गर्भाशयाच्या कर्करोगावरील शस्त्रक्रिया तसेच दुर्बिणीद्वारे (लॅप्रोस्कोपी) महिलांच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या. 

कान-नाक-घसा विभाग प्रमुख डॉ. आतिश गुजराती व त्यांच्या टीमने एंडोस्कोपी सायनस सर्जरी, थायरॉईड सर्जरी तसेच कानाच्या विविध गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया गरजू रुग्णांवर केल्या.

 

बधिरीकरणशास्त्र विभाग

योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या विविध प्रकारच्या मोठ्या व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांमध्ये बधिरीकरणशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. वैष्णवी कुलकर्णी, डॉ. सचिन तोटावाड व त्यांची संपूर्ण टीम यांनी रुग्णांना सुरक्षित, शास्त्रशुद्ध व आधुनिक पद्धतीने भूल देण्याचे कार्य अत्यंत उत्कृष्टपणे पार पाडले. 

श्वसनरोगशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजय कापसे, डॉ. झागडे व त्यांच्या टीमने रेस्पिरेटरी फेल्युअर असलेल्या रुग्णांवर यशस्वी उपचार केले. 

नेत्रशल्यचिकित्सा विभाग प्रमुख डॉ. अतुल राऊत व त्यांच्या टीमने डोळ्यांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिरावफुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पार पाडल्या. 

त्वचा व गुप्तरोगशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मनोज हरनाळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्वचेच्या गंभीर आजारांवर तंत्रशुद्ध उपचार करण्यात आले. 

मनोविकारशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रदीप बोडके व डॉ. उमेश आत्राम यांनी मानसिक आजारग्रस्त रुग्णांना योग्य उपचार पद्धतीद्वारे उपचार करून त्यांचे पुनर्वसन करण्यात मदत केली. 

दंत शल्यचिकित्सा विभाग

दंत शल्यचिकित्सा विभागाच्या विभागप्रमुख डॉ. भावना भगत व त्यांची टीम यांनी केलेल्या दंत शस्त्रक्रियेमुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळाला आहे. 

रुग्णांच्या तपासण्यांसाठी रेडिओलॉजी विभाग प्रमुख डॉ. अमित पंचमहालकर व टीम, शरीर विकृतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. समीर व टीम, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय मोरे व टीम, तसेच जीवरसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हुमेरा खान व टीम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आवश्यक तपासण्या करण्यात आल्या. 

रुग्णांना आवश्यक असलेली औषधे औषध विभाग प्रमुख डॉ. चंडालिया, डॉ. जे. बी. देशमुख व श्री डोके यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली. 

अधिसेविका श्रीमती भगीरथा मुदीराज, सर्व नर्सिंग स्टाफ, निवासी डॉक्टर यांनी सातत्यपूर्ण परिश्रम घेऊन या यशात मोलाचा वाटा उचलला आहे. योजनेचे सर्व कामकाज ऑनलाईन प्रणालीद्वारे श्री. बिबींसार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी डेटा एन्ट्री ऑपरेटर मार्फत प्रभावीपणे करण्यात आले.

00000




वृत्त क्रमांक 27

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  

नांदेड दि. 9 जानेवारी : नांदेड जिल्ह्यात 12 जानेवारी 2026 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 26 जानेवारी 2026 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 12 जानेवारीचे सकाळी 6 वाजेपासून ते 26 जानेवारी 2026 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल.  

त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

0000

वृत्त क्रमांक 26

“हिंद की चादर” कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी

 सचखंड पब्लिक स्कूलमध्ये विशेष कार्यक्रम

नांदेड दि. 9 जानेवारी :- श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त “हिंद की चादर” हा भव्य व ऐतिहासिक कार्यक्रम दिनांक 24 व 25 जानेवारी 2026 रोजी नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग लाभावा, यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे. 

या मोहिमेच्या अनुषंगाने आज नांदेड येथील सचखंड पब्लिक स्कूल येथे विद्यार्थ्यांना कार्यक्रमाची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. तसेच भारताचा नकाशा करून हिंद दी चादर  या गीताचे गायन देखील यावेळी केले आणि शहिदांना श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, शाळेच्या प्राचार्य अनिल कौर, चत्तर सिंग टंक, रणदीप सिंग पिरंगे, करणपाल सिंग लोणी वाले, भगेंद्रसिंग फौजी आदीची उपस्थिती होती. 

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांनी शाळा स्तरावर विविध स्पर्धा व उपक्रम राबवून “हिंद की चादर” कार्यक्रम व्यापक स्तरावर पोहोचवण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले आहे.

विद्यार्थ्यांमध्ये या ऐतिहासिक कार्यक्रमाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रभात फेरी, विविध स्पर्धा, भाषण, रांगोळी आदी उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. याअनुषंगाने आज नांदेड येथील सचखंड पब्लिक स्कूल येथे आयोजित कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल कर्डिले उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत नांदेड येथे होणाऱ्या “हिंद की चादर” कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. तसेच हा कार्यक्रम समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शाळांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

आज सचखंड पब्लिक स्कूल शाळेच्या प्राचार्या अनिल कौर खालसा यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या संपूर्ण स्टाफच्या मदतीने विद्यार्थ्यांनी भारताचा नकाशा साकारला होता.गुरुबचन सिंग शिलेदार आयटीआय खालसाचे प्राचार्य यांचे मार्गदर्शन लाभले.

00000












वृत्त क्रमांक 25

नांदेड येथील "हिंद-दी-चादर" कार्यक्रम ऐतिहासिक करावा

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वांचा समावेश आवश्यक

मान्यवरांचे पत्रकार परिषदेत आवाहन 

नांदेड, दि. 9 जानेवारी :-  “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या 350 शहीदी समागम वर्षानिमित्त  नांदेड येथे 24 व 25 जानेवारी 2026 रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सर्व समाजातील नागरिकांनी उपस्थित राहून हा कार्यक्रम ऐतिहासिक करावा, असे आवाहन आज आयोजित पत्रकार परिषदेत मान्यवरांनी केले. 

सचखंड पब्लिक स्कूल येथील गुरु ग्रंथ साहिब भवन येथे आयोजित या पत्रकार परिषदेस जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा अबचलनगर नांदेडचे मुख्य जथ्थेदार संत बाबा कुलवंत सिंगजी यांच्यासह भाई जोसिंदर सिंगजी, भाई राम सिंगजी, भाई कश्मीर सिंगजी, भाई गुरमीत सिंगजी, संत ज्ञानी हरनाम सिंग जी तसेच गुरुद्वारा लंगर साहिबचे संत बाबा बलविंदर सिंगजी, समिती अध्यक्ष डॉ. विजय सतबीर सिंग, सरजीत सिंग गिल, राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, महेंद्र रायचूरा (धर्म जागरण क्षेत्रीय प्रमुख पश्चिम क्षेत्र ) महंत सुनिल महाराज, महंत जितेंद्र महाराज, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे संस्थापक किशनराव राठोड आदी उपस्थित होते.

राज्य शासनाचा अल्पसंख्याक विकास विभाग, राज्यस्तरीय समिती, शीख, सिकलीकर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मीकी, उदासीन व भगत नामदेव (वारकरी संप्रदाय) व इतर सर्व समाज यांच्या संयुक्त विद्यामाने हिंद-दी-चादर कार्यक्रमाचे आयोजन नांदेड शहरातील मोदी मैदान येथे करण्यात आले आहे. 

जथेदार साहेब भाई कुलवंत सिंग जी, संत ज्ञानी हरनाम सिंग जी यांनी हिंद-दी-चादर या कार्यक्रमाचे महत्त्व विषद करून शीख व इतर समाजाचे कार्यक्रमाच्या अनुषंगाने असणाऱ्या योगदानाबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शासन करत असलेल्या महत्त्वपूर्ण सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. 

जिल्हाधिकारी श्री.कर्डिले  म्हणाले की, महाराष्ट्र शासन व विविध समाज यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या "हिंद दी चादर" कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सध्या तयारी वेगाने सुरु आहे. भाविकांनी कुठल्याही प्रकारची अडचण भासणार नाही याची पूर्णत: काळजी घेतली जाईल. कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी विविध 25 समित्यांची स्थापन करण्यात आली असून समित्यांवर सोपविलेल्या कामाप्रमाणे नियुक्त अधिकारी व कर्मचारी दक्षतेने कामे करीत आहेत. भाविकांसाठी जिल्हानिहाय पार्किंगची ठिकाणे निश्चित करण्यात आली असून निवासासाठी शहरातील शाळा, महाविद्यालये व मोकळ्या जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वाहतूक व्यवस्थेचे सुसूत्र नियोजन करण्यात आले असून आवश्यक वाहनांची व्यवस्था देखील करण्यात येत आहे. नांदेड हे रेल्वेमार्गावर असल्याने रेल्वे विभागाच्या सहकार्याने अधिकाधिक भाविकांना रेल्वे सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. लंगर, निवास, पाणी व वाहतूक व्यवस्थेचा दैनंदिन आढावा घेतला जात असून आरोग्य सेवांसाठी विविध रुग्णालयांमार्फत वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येणार आहेत. कार्यक्रमस्थळी विविध आरोग्य स्टॉल उभारण्यात येणार आहेत. कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी विविध शाळांमध्ये स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून येत्या १५ जानेवारीपासून प्रभातफेऱ्या काढण्यात येणार आहेत.

राज्यस्तरीय समिती समन्वयक रामेश्वर नाईक म्हणाले की, शहिदी समागम केवळ धार्मिक कार्यक्रम नसून तो सर्वधर्म समभाव, मानवता, संविधानिक मूल्ये व सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा ऐतिहासिक उपक्रम आहे. या शहिदी समागम उपक्रमांची सुरुवात नागपूर येथे यशस्वीरित्या पार पडलेली असून त्याच उपक्रमाचा पुढील महत्त्वाचा टप्पा म्हणून नांदेड येथे दिनांक 24 व 25 जानेवारी 2026 रोजी दोन दिवसांचा भव्य शहिदी समागम कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम ऐतिहासिक करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. या कार्यक्रमाची मोठया प्रमाणात प्रचार-प्रसिद्धी करून आपल्या नांदेड जिल्ह्याच्या नावलौकिकात भर घालावी. 

0000













वृत्त क्रमांक 24

“हिंद की चादर” कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांचे योगदान आवश्यक -  जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड, दि. 9 जानेवारी : नांदेड येथे दिनांक 24 व 25 जानेवारी 2026 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत “हिंद की चादर” या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांचा सक्रिय सहभाग व योगदान आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज जिल्ह्यातील विविध संघटना, उद्योजक, होमगार्ड समदेशक तसेच विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून कार्यक्रमास सहकार्य व योगदान देण्याचे आवाहन केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, तहसीलदार संजय वारकड, विविध संघटनांचे प्रतिनिधी, जिल्ह्यातील उद्योजक, होमगार्ड समदेशक आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी सर्वांनी सकारात्मक भूमिकेतून कार्यक्रमात सहभागी होत सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी सकारात्मक प्रतिसाद देत संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने दोन आढावा बैठका घेण्यात आल्या. पहिली आढावा बैठक सकाळी ११ वाजता संपन्न झाली. या बैठकीस स्कूल बस चालक संघटना, होमगार्ड समदेशक, उद्योजक तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. त्यानंतर हॉटेल असोसिएशन, व्यापारी संघटना व विविध स्वयंसेवी संस्था (NGO) यांच्या सहभागाने दुसरी आढावा बैठक घेण्यात आली.

दोन्ही बैठकीत “हिंद की चादर” कार्यक्रमाच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी करावयाच्या कामांचे नियोजन, प्रचार-प्रसिद्धी, समन्वय तसेच प्रभावी अंमलबजावणीबाबत उपस्थितांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. कार्यक्रम व्यापक स्तरावर पोहोचावा यासाठी सर्व संबंधितांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

00000






वृत्त क्रमांक 23

हिंद की चादर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी 

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विविध संघटनांसोबत आढावा बैठक

नांदेड, दि. ०९ जानेवारी :जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांच्या अध्यक्षतेखाली “हिंद की चादर” कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसिद्धी तसेच इतर अनुषंगिक बाबींविषयी हॉटेल असोसिएशन, विविध व्यापारी संघटना व स्वयंसेवी संस्था (NGO) यांच्या सहभागाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. 

या बैठकीत कार्यक्रमाच्या अनुषंगाने करावयाच्या कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी लागणारे आवश्यक नियोजन, समन्वय व प्रभावी अंमलबजावणीबाबत उपस्थितांना मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या. “हिंद की चादर” कार्यक्रम व्यापक स्तरावर पोहोचावा यासाठी सर्व संबंधित घटकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

०००००





विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...