Thursday, December 27, 2018


रस्ता सुरक्षा जनजागृती मोहिम
           
नांदेड, दि. 27 :- सर्वोच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार 21 डिसेंबर 2018 रोजी दुपारी 3 वा. भाऊराव सहकारी साखर मर्यादित नांदेड  येथे रस्ता सुरक्षा जागजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
यावेळी कार्यकारी संचालक एस. आर. पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष प्राध्यापक कैलास दाड, सहा.पोलीस निरीक्षक महामार्ग रहेमान शेख,  जनसंपर्क अधिकारी श्री. धर्माधिकारी, मोटार वाहन निरीक्षक, दादा मोरे उपस्थित होते.
याप्रसंगी सहा.पोलीस निरीक्षक श्री. शेख मोटार वाहन निरीक्षक श्री. मोरे यांनी रस्ता सुरक्षा जनजागृती मागचा उद्देश विभागाची भूमिका स्पष्ट केली. वाहन चालविताना होणारा मोबाईलचा रस्त्यावर हॉर्नचा अतिवापर याबाबत चिंता व्यक्त करुन असे प्रकार टाळण्यासाठी जनतेने स्वत:हून प्रयत्न करणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त केली. वाहन चालवत असताना वेगावर नियंत्रण करणे अत्यावश्यक असून त्याद्वारे रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करता येणे शक्य असल्याचे विचार मांडले इतर रस्ता सुरक्षेच्या इतर बाबीबाबत सूचना केल्या.
या कार्यक्रमात ऊस वाहतूक करणाऱ्या बैल गाडया, ट्रॅक्टर ट्रेलर ट्रक यांना रिफ्लेक्टर लावण्यात आले. याप्रसंगी साखर कारखान्यातील कर्मचारी, अधिकारी नागरिक उपस्थित होते.
000000



कृषि व्यवसाय प्रशिक्षणाचे आयोजन
नांदेड दि. 26 :-  शेतकऱ्यांचे उत्पन्न सन 2022 पर्यंत दुप्पट करण्याकरिता उत्पादित कृषि मालासाठी शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करणे, कृषि मालाचे मुल्यवर्धन करणे, कृषि प्रक्रिया उद्योगात वृध्दी करणे गरजेचे आहे. या उद्देशाची पुर्तता करण्यासाठी सहकार विकास महामंडळामार्फत राज्यातील विविध कार्यकारी संस्था / शेतकरी उत्पादक कंपनी / महिला बचत गट यांचे सभासद / वैयक्तीक शेतकरी यांच्यासाठी "Agri Business Start-up" प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
हे प्रशिक्षण  14 ते 18 जानेवारी 2019 या कालावधीत सहकार प्रशिक्षण संस्थान नळस्टॉप पुणे येथे आयोजित करण्यात येणार असून त्यासाठी 30 प्रशिक्षणार्थीची निवासी बॅच राहणार आहे. याकरिता प्रती प्रशिक्षणार्थी  8 हजार 500 रुपये + (18 टक्के GST रु.1,530/-) असे एकूण 10 हजार 30 रुपये शुल्क निर्धारीत करण्यात आले आहे.  त्यामुळे हे प्रशिक्षणाचा लाभ जास्तीतजास्त संबंधित संस्था व इच्छुक उमेदवारांनी घेणेबाबत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड प्रवीण फडणीस यांनी आवाहन केले आहे.
या प्रशिक्षणाचा उद्देश व निकष तसेच प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणीबाबतचा अर्जचा नमुना याबाबतच्या अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व जिल्हा व्यवसाय विकास व पणन व्यवस्थापक यांचेशी संपर्क साधावा. तसेच महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित यांचे वेबसाईट www.mahamcdc.com वरून अधिक माहिती घ्यावी.
00000


आयटीआय येथे
अंतिम प्रमाणपत्र वाटप सप्ताह

नांदेड, दि. 27 :-  औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथून सन फेब्रुवारी 2009 ते ऑगस्ट 2017 या कालावधी दरम्यान सेंटर ऑफ एक्सलस योजनेंतर्गत अखिल भारतीय व्यवसाय परिक्षा पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचे अंतिम प्रमाणपत्र संस्थामध्ये प्राप्त झाले आहेत. तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथून सन 1980 ते 2015 या कालावधी दरम्यान आयटीआय पूर्ण केलेल्या ज्या प्रशिक्षणार्थ्यांचे अंतिम प्रमाणपत्र देखील संस्थेस प्राप्त झाले आहेत.
24 डिसेंबर 2018 ते 1 जानेवारी 2019 पर्यंत संस्थेमध्ये अंतिम प्रमाणपत्र वाटप सप्ताह सुरु करण्यात आला आहे. ज्या प्रशिक्षणार्थ्यांचे अंतिम प्रमाणपत्र अद्यापर्यंत प्राप्त झाले नाहीत किंवा ज्यांच्या अंतिम प्रमाणपत्रांमध्ये दुरुस्ती करावयाची आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांनी 1 जानेवारी 2019 पर्यंत पुढील नमुद पुराव्यांसह संस्थेत समक्ष येऊन अर्ज सादर करावेत.
अंतिम प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही अशा उमेदवारांनी एनसीव्हीटी-Trade, Coe-B.B.B.T, COE-A.T.M. उत्तीर्ण असल्याबाबत पुरावा व ओळखपत्र / आधार कार्ड झेरॉक्स. अंतिम प्रमाणपत्रामध्ये दुरुस्ती करावयाची आहे अशा उमेदवारांनी ज्या बाबीमध्ये दुरुस्ती करावयाची आहे जसे स्वत:चे नाव, वडिलांचे नाव, जन्म तारीख, प्रशिक्षण कालावधी आणि उत्तीर्ण महिना व वर्षे त्याबाबीच्या अनुषंगिक योग्य कागदपत्रे पुरव्यासाठी जोडण्यात यावीत जसे शाळा सोडल्याचा दाखला, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र आदी, असे आवाहन नांदेड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे.
0000000


वैध मापन शास्त्र यंत्रणेचे आवाहन

नांदेड, दि. 27 :- पॅकबंद आवेष्टीत वस्तूवर वैध मापन शास्त्र अधिनियम 2009 व त्याअंतर्गत नियमानुसार आवश्यक तरतूदी पुढीलप्रमाणे आहेत.
अधिकतम किरकोळ विक्री किंमत (सर्व करांसहित) लिहिने आवश्यक, नसल्यास तो गुन्हा. एमआरपीवर खाडाखोड करणे हा गुन्हा आहे. छापिल किंमतीपेक्षा जास्त किंमत आकारणे हा गुन्हा आहे. आवेष्टीत वस्तूवर उत्पादकाचे, पॅकरचे किंवा आयातदाराचे नाव व पूर्ण पत्ता आवश्यक, नसल्यास तो गुन्हा. उत्पादनाचा, आवेष्टनाचा, आयातीचा महिना व वर्षे लिहिणे आवश्यक नसल्यास गुन्हा. ग्राहक तक्रार संपर्कासाठी संबंधीत व्यक्तीचे नाव, पत्ता, दुरध्वनी क्रमांक व ईमेल पत्ता आवेष्टीत वस्तूवर लिहिणे आवश्यक नसल्यास गुन्हा. ग्राहकांना वजनात / मापात कमी माल दिल्यास गुन्हा होतो. सोने-चांदीच्या व्यवहारामध्ये केवळ वर्ग अ / वर्ग- ब चे दांडी तराजु किंवा वर्ग-1 / वर्ग-2 अचुकता असलेले अस्वयंचलीत तोलन उपकरणांचा वापर करता येईल. साखर कारखान्यातील वाहन काटा अथवा व्यापाऱ्याकडील तोलन उपकरणांबाबत शंका असल्यास त्यांचेकडे उपलब्ध असणे बंधनकारक असलेल्या वजनाद्वारे वाहन काटा अथवा तोलन उपकरण बरोबर असल्याची खातरजमा ग्राहकाना करता येते. पेट्रोल पंपावर 5 लिटर क्षमतेचे प्रमाणित माप उपलब्ध असणे बंधनकारक असल्याने वितरणांबाबत शंका असल्यास या मापाद्वारे ग्राहकांना खातरजमा करता येईल.
वरील कायदेशीर तरतुदीचे उल्लंघन आढळून आल्यास पुढील दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा अथवा ई-मेलद्वारे aclmnanded@yahoo.in यावर तक्रार नोंदविता येईल. कार्यालय सहाय्यक नियंत्रक, वैध मापन शास्त्र बंदा घाट रोड वजिराबाद नांदेड दूरध्वनी क्रमांक 02462-233881 वर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक नियंत्रक, वैध मापन शास्त्र नांदेड यांनी केले आहे.
00000


माळेगाव यात्रेत पशुसंवर्धन कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड, दि. 27 :- लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रा 4 ते 7 जानेवारी 2019 या कालावधीत भरणाऱ्या भव्य खंडोबा यात्रेनिमित्त जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या यात्रेत शुक्रवार 4 जानेवारी रोजी पशुसंवर्धन विषयक प्रदर्शनी स्टॉलचे उद्घाटन व दुग्धस्पर्धा. शनिवार 5 जानेवारी 2019 रोजी भव्य पशु प्रदर्शन. रविवार 7 जानेवारी 2019 रोजी बक्षीस वितरण. पशुप्रदर्शनासाठी पुढील प्रमाणे मार्गदर्शक सुचना सहभागी होणाऱ्या पशुपालकांसाठी देण्यात येत आहेत. पशुप्रदर्शनात भाग घेण्यासाठी प्रत्येक पशुपालकाने आपल्या जनावरांची नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीची वेळ सकाळी 8 ते 11 अशी राहील. नोंदणी शिवाय रिंगमध्ये प्रवेश दिल्या जाणार नाही याची नोंद घ्यावी. निवड समितीचा निकाल अंतिम राहील. बक्षीस पात्र पशुपालकांना बक्षीसांसोबत प्रशस्तीपत्र दिले जाईल. प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय व तृतीय व उत्तेजनार्थ बक्षीसे दिली जातील. पशुपालकांनी येतांना आधार कार्ड व बँक पासबुकची झेरॉक्स प्रत यासोबत आणावी, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी कळविले आहे.  
0000000


भारतनेट प्रकल्‍पाच्‍या दुसऱ्या चरणास प्रारंभ
ग्रामपंचायतीना मिळेल उच्‍च प्रतीची इंटरनेट जोडणी

           
नांदेड, दि. 27 :- केंद्र सरकारच्‍या भारतनेट या उपक्रमाच्‍या दुस-या टप्‍याची सुरूवात नांदेड जिल्‍ह्यातील  लोहा तालुक्यातील मौ. किरोडा येथे आज तहसिलदार विठ्ठल परळीकर यांचे हस्‍ते करण्‍यात आल.
भारतनेट-महानेट प्रकल्‍प महाराष्‍ट्र राज्‍य माहिती व तंत्रज्ञान महामंडळ मुंबई यांचेमार्फत राबविण्‍यात येत असून या प्रकल्‍पाव्‍दारे नांदेड जिल्‍हातील 11 तालुक्‍यातील 964 ग्रामपंचायतीना ऑप्‍टीकल फायबर नेटवर्क ब्रॉडबॅडने जोडले जाणार आहेत. ग्रामस्‍तरावरील नागरिकांना डिजिटल सेवा देउन त्‍यांना जगाशी जोडण्‍याच्‍या उद्देशाने केंद्र सरकारव्‍दारे हा उपक्रम सुरु केला आहे.
प्रकल्‍पात तालुकानिहाय ग्रामपंचायतीची संख्‍या पुढील प्रमाणे आहे: भोकर - 67, बिलोली - 73, देगलूर - 96, हदगाव - 125, हिमायतनगर - 52, किनवट - 134, लोहा - 118, माहूर - 63, मुदखेड - 51, मुखेड -127, उमरी–58. या 11 तालुक्यात 3 हजार 807 किमी अंतर केबल टाकून 964 ग्रामपंचायाती जोडण्यात येणार असून हे  काम जिल्‍ह्यात पूर्ण करण्‍यासाठी शासनाव्‍दारे स्‍टरलाईट या कंपनीची निवड केलेली आहे.
या शुभारंभ कार्यक्रमास लोहा गटविकास अधिकारी प्रभाकर फाजेवड, विस्तार अधिकारी श्री. धर्मेकर, प्रकल्प प्रमुख कुलदीप जोशी, ज्ञानेश्‍वर रांजणे, सय्यद वाजीदअली, राजेश वाघमारे, असीम अलवी, व्‍यवस्‍थापक स्‍टेरलाईट कंपनी आदी मान्यवर तसेच किरोडा गावचे सरपंच देखिल या कार्यक्रमास उपस्थित होते. प्रास्‍ताविक जिल्‍हा प्रकल्‍प व्‍यवस्‍थापक निरज धामणगावे यांनी केले तर आभार पंचायत समितीचे कक्ष अधिकारी सतीश चोरमाले यांनी मानले.
00000


अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील
युवकांसाठी सैन्य पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण 

नांदेड, दि. 27 :- सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील युवक-युवतींसाठी सैन्य पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण कार्यक्रम मंजुर करण्यात आला आहे. प्रक्षिणाचा कालावधी तीन महिन्याचा असुन हे प्रशिक्षण श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथे होणार आहे. प्रशिक्षणासाठी  राहणे, भोजन, गणवेश, मैदानी चाचणीचे प्रशिक्षण लेखी चाचणीचे प्रशिक्षण मोफत देण्यात येते.
पुढील प्रशिक्षण सत्र 1 जोनवारी 2019 पासुन सुरू होणार आहे. त्यानुसार प्रशिक्षणासाठी  प्रशिक्षणार्थीची निवड करावयाची आहे. अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील युवक युवतींसाठी सैन्य पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणासाठी पात्रतेच्या अटी शर्ती पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार हा महाराष्ट्रातील अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील असावा. उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्ष असावे. उंची - पुरुष = (165 सेमी) महिला = (155 सेमी) असावी. छाती फुगवता - पुरुष = (79 सेमी) फुगवुन = (84 सेमी) असावी. शैक्षणिक पात्रता इयत्ता 12 वी पास. उमेदवार हा शारीरिक मानसिक दृष्टया निरोगी असावा.
आवश्यक कागदपत्रे- जातीचे प्रमाणपत्र,रहिवाशी दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, ओळखपत्राची सत्यप्रत देणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील युवक / युवतींन28 डिसेंबर 2018 सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, अर्धापुर रोड, ग्यानमाता हायस्कुल समोर, नांदेड येथे मुळ कागपत्रासह साक्षांकित प्रतीसह अर्ज सादर करावा स्वत: उपस्थित राहावे. हजर राहणाऱ्या उमेदवारांना जाण्या- येण्याचा भत्ता दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी, असे आवाहन  तेजस माळवदकर, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड यांनी केले आहे.
00000

  वृत्त क्र.   389   लोकसभा निवडणुकीसाठी आज नांदेड जिल् ‍ ह्यात मतदान   प्रशासन सज् ‍ ज ; मोठ्या संख् ‍ येने मतदान करण् ‍ याचे ...