Thursday, December 27, 2018


माळेगाव यात्रेत पशुसंवर्धन कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड, दि. 27 :- लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रा 4 ते 7 जानेवारी 2019 या कालावधीत भरणाऱ्या भव्य खंडोबा यात्रेनिमित्त जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या यात्रेत शुक्रवार 4 जानेवारी रोजी पशुसंवर्धन विषयक प्रदर्शनी स्टॉलचे उद्घाटन व दुग्धस्पर्धा. शनिवार 5 जानेवारी 2019 रोजी भव्य पशु प्रदर्शन. रविवार 7 जानेवारी 2019 रोजी बक्षीस वितरण. पशुप्रदर्शनासाठी पुढील प्रमाणे मार्गदर्शक सुचना सहभागी होणाऱ्या पशुपालकांसाठी देण्यात येत आहेत. पशुप्रदर्शनात भाग घेण्यासाठी प्रत्येक पशुपालकाने आपल्या जनावरांची नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीची वेळ सकाळी 8 ते 11 अशी राहील. नोंदणी शिवाय रिंगमध्ये प्रवेश दिल्या जाणार नाही याची नोंद घ्यावी. निवड समितीचा निकाल अंतिम राहील. बक्षीस पात्र पशुपालकांना बक्षीसांसोबत प्रशस्तीपत्र दिले जाईल. प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय व तृतीय व उत्तेजनार्थ बक्षीसे दिली जातील. पशुपालकांनी येतांना आधार कार्ड व बँक पासबुकची झेरॉक्स प्रत यासोबत आणावी, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी कळविले आहे.  
0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 409   वादळी वारे वाहण्याची ,   विजेच्या कडकडाटासह , ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता   नांदेड दि.  6  मे :-   प्रादेशिक ...