Thursday, December 27, 2018


वैध मापन शास्त्र यंत्रणेचे आवाहन

नांदेड, दि. 27 :- पॅकबंद आवेष्टीत वस्तूवर वैध मापन शास्त्र अधिनियम 2009 व त्याअंतर्गत नियमानुसार आवश्यक तरतूदी पुढीलप्रमाणे आहेत.
अधिकतम किरकोळ विक्री किंमत (सर्व करांसहित) लिहिने आवश्यक, नसल्यास तो गुन्हा. एमआरपीवर खाडाखोड करणे हा गुन्हा आहे. छापिल किंमतीपेक्षा जास्त किंमत आकारणे हा गुन्हा आहे. आवेष्टीत वस्तूवर उत्पादकाचे, पॅकरचे किंवा आयातदाराचे नाव व पूर्ण पत्ता आवश्यक, नसल्यास तो गुन्हा. उत्पादनाचा, आवेष्टनाचा, आयातीचा महिना व वर्षे लिहिणे आवश्यक नसल्यास गुन्हा. ग्राहक तक्रार संपर्कासाठी संबंधीत व्यक्तीचे नाव, पत्ता, दुरध्वनी क्रमांक व ईमेल पत्ता आवेष्टीत वस्तूवर लिहिणे आवश्यक नसल्यास गुन्हा. ग्राहकांना वजनात / मापात कमी माल दिल्यास गुन्हा होतो. सोने-चांदीच्या व्यवहारामध्ये केवळ वर्ग अ / वर्ग- ब चे दांडी तराजु किंवा वर्ग-1 / वर्ग-2 अचुकता असलेले अस्वयंचलीत तोलन उपकरणांचा वापर करता येईल. साखर कारखान्यातील वाहन काटा अथवा व्यापाऱ्याकडील तोलन उपकरणांबाबत शंका असल्यास त्यांचेकडे उपलब्ध असणे बंधनकारक असलेल्या वजनाद्वारे वाहन काटा अथवा तोलन उपकरण बरोबर असल्याची खातरजमा ग्राहकाना करता येते. पेट्रोल पंपावर 5 लिटर क्षमतेचे प्रमाणित माप उपलब्ध असणे बंधनकारक असल्याने वितरणांबाबत शंका असल्यास या मापाद्वारे ग्राहकांना खातरजमा करता येईल.
वरील कायदेशीर तरतुदीचे उल्लंघन आढळून आल्यास पुढील दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा अथवा ई-मेलद्वारे aclmnanded@yahoo.in यावर तक्रार नोंदविता येईल. कार्यालय सहाय्यक नियंत्रक, वैध मापन शास्त्र बंदा घाट रोड वजिराबाद नांदेड दूरध्वनी क्रमांक 02462-233881 वर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक नियंत्रक, वैध मापन शास्त्र नांदेड यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव

  8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव नांदेड दि.   7   :-   सन 2019-2020 मधील मौ. सांगवी व मेळगांव परिसरातील अवैध उत्खननातून 4647.83 ब्रास जप...