जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध
नांदेड (जिमाका), दि. 5 :- जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड येथील जुन्या वर्तमानपत्राची रद्दी, कालबाह्य अन्य नियतकालिके इत्यादींची आहे त्या परिस्थितीत विक्री करावयाची आहे. ज्यांना रद्दी घ्यावयाची असेल त्यांना कार्यालयीन वेळेत रद्दी पाहावयास मिळेल. त्यासाठी खरेदीदार संस्थाकडून प्रती किलो प्रमाणे खरेदी दरपत्रकाची निविदा मंगळवार 16 डिसेंबर 2025 पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दाखल करावीत. इच्छूकांनी आपले लिफाफा बंद दरपत्रक ‘जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, पार्वती निवास, खुरसाळे हॉस्पिटल, यात्री निवास रोड, बडपूरा, नांदेड 431601’ या पत्यावर कार्यालयीन वेळेत दाखल करावेत. या संदर्भातील अटी व शर्ती या कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात आल्या आहेत, असे जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड यांनी कळविले आहे.
रद्दी विक्रीचे दरपत्रक मंजूर करणे अथवा रद्द करणे हे सर्व अधिकार जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड यांना राहतील.
00000
वृत्त क्रमांक 1278
नागरिकांनी आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
· आधार हॉस्पिटला भेट देऊन रुग्ण-नातेवाईकांना योजनेच्या लाभाबाबत केली विचारपूस
नांदेड दि. 5 डिसेंबर :- जिल्ह्यातील नागरिकांनी आयुष्यमान को-ब्रान्डेड कार्ड, वयवंदना कार्ड काढून घेऊन गरजेनुसार एकत्रित प्रधानमंत्री जन आरोग्य योजना- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांनी गुरूवार 4 डिसेंबर रोजी नांदेड शहरातील आधार हॉस्पिटल येथे आकस्मिकरित्या भेट देऊन पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सदर रुग्णालयात या एकत्रित प्रधानमंत्री जनआरोग्य योजना- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत दाखल होणाऱ्या रुग्ण व नातेवाईक यांची विचारपूस केली आणि रुग्णालय व्यवस्थापन यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून योजनेच्या कामकाजाबाबत, लाभ घेण्याकरिता येत असलेल्या अडचणी तसेच प्रत्यक्ष रुग्ण दाखल होत असताना रुग्णालयातील आरोग्य मित्राच्या ऑनलाईन रुग्णनोंदणी प्रक्रियेबाबत आढावा घेतला. रुग्ण व नातेवाईकांना या सदर योजनेबाबत काही अडचणी निर्माण होत आहेत का याबाबत विचारपूस केली.
आधार हॉस्पिटल येथे एकत्रित प्रधानमंत्री जन आरोग्य योजना- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची समाधानकारक अंमलबजावणी करण्यात येत असल्याबाबत समाधान व्यक्त केले. तसेच यापुढे देखील रुग्णालय व्यवस्थापन व आरोग्य मित्र यांनी सदर योजनेतून जास्तीत जास्त गरजू रुग्णांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या.
नांदेड जिल्ह्यात एकत्रित प्रधानमंत्री जन आरोग्य योजना- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेशी एकूण 72 रुग्णालये संलग्नित असून त्यात 21 शासकीय रुग्णालये आणि विविध स्पेशालिटी असलेल्या 51 खाजगी रुग्णालयांचा समावेश आहे. त्यामुळे या सर्व रुग्णालयात सामान्य नागरिकांना सुलभरीत्या योजनेचा लाभ व्हावा याकरिता जनतेस सदर योजनेची आदर्श कार्यपद्धती व त्याचा प्रक्रियादर्शक तक्ता आणि व्हिडिओ तयार करून प्रदर्शित करण्याचे व रुग्णालयांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड यांना यावेळी देण्यात आल्या.
0000


.jpeg)
.jpeg)

.jpeg)