Saturday, August 4, 2018


अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी
शिष्यवृत्ती योजनेची अर्ज प्रक्रिया सुरु
नांदेड दि. 4 :- अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी मा. पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या पंधरा कलमी कार्यक्रमानुसार  सन 2018-19  साठी अल्पसंख्याक समाजातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनची ऑनलाईन अर्ज  भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
          सन 2018-19 या वर्षासाठी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांचे  केंद्र शासनाच्या  www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर अर्ज केवळ ऑनलाईन भरावयाचे आहेत. सन 2018-19  या वर्षी ज्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांचे  अर्ज नुतनीकरण विद्यार्थी   म्हणून भरावयाचे आहेत. तसेच नवीन विद्यार्थ्यांचे  अर्ज नवीन विद्यार्थी नवीन विद्यार्थी म्हणून भरावयाचे आहेत. प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरावयाची मुदत नवीन विद्यार्थ्यांसाठी  व नुतनीकरण  विद्यार्थ्यांसाठी  30 सप्टेंबर 2018 पर्यंत राहील. शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची आहे. याबाबत सर्व मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी व जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी (मा.)  यांनी केले आहे.
000000


बालकांची काळजी घेणाऱ्या संस्थांना
ऑनलाईन प्रमाणपत्र नोंदणीसाठी मुदतवाढ
संस्था चालकांसाठी सोमवारी बैठकीचे आयोजन  
नांदेड दि. 4 :- बाल न्याय अधिनियमांतर्गत बालकांची काळजी घेणाऱ्या संस्थांना ऑनलाईन नोंदणी प्रमाणपत्राचे प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ गुरुवार 30 ऑगस्ट 2018 पर्यंत देण्यात आली आहे.
महिला व बाल विकास विभागांतर्गत सर्व संस्था चालकांची बैठक सोमवार 6 ऑगस्ट रोजी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, शास्त्रीनगर, भाग्यनगर कमानीचे आत नांदेड येथे दुपारी 3.30 वा. आयोजित करण्यात आली आहे. संबंधीत संस्था चालकांनी बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.   
बाल न्याय (मुलांची काळजी व सरंक्षण) अधिनियम 2015 च्या कलम 41 अंतर्गत बालकांची काळजी घेणाऱ्या संस्थांना ऑनलाईन नोंदणी प्रमाणपत्र देण्याबाबतचे प्रस्तावासाठी महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे यांचे स्तरावरुन करण्यात आलेल्या नोंदणी प्रमाणपत्र प्रस्तावाच्या छाननी पत्राची प्रत महिला व बाल विकास विभागाच्या womenchild.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर बातम्या व सूचना या सदराखाली उपलब्ध आहे. संस्थांनी यापुर्वी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहेत अशा संस्थांनी संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या संस्थेशी संबंधित छाननी पत्रात नमूद त्रुटींची पुर्तता करुन त्रुटी पुर्तता अहवाल आयुक्त महिला व बाल विकास 28 राणीचा बाग पुणे 411 001 यांचेकडे हस्ते पोहोच किंवा पोस्टाने 30 ऑगस्ट 2018 पर्यंत पोहचतील या पध्दतीने सादर करावा. कोणत्याही संस्थांना त्रुटीबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येणार नाही आणि मुदतीनंतर कोणत्याही संस्थेचा त्रुटी पुर्तता अहवाल स्विकारला जाणार नाही .
ज्या संस्थांनी यापुर्वी प्रस्ताव सादर केले नाही अशा संस्था 30 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करु शकतील. अर्ज शासनाच्या womenchild.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आल आहे. तसेच नविन अर्ज केलेल्या संस्थांनी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची प्रत आवश्यक त्या कागदपत्रांसह महिला व बाल विकास आयुक्तालयास दि. 3 सप्टेंबर 2018 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000


गुरुव्दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळ निवडण  
मतदार नोंदणीसाठी जनजागृती करण्याबाबत बैठक संपन्न
नांदेड दि. 4 :- शीख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळाच्‍या तीन सदस्‍यांना निवडन देण्‍यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. या निवडणूकीसाठी मतदार यादी कार्यक्रम व पात्र मतदारांना मतदार यादीत नाव नोंदणी करण्‍यासाठी 20 जुलै 2018 पासून मतदार नोंदणी कार्यक्रमाची प्रत्‍यक्ष अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्‍याअनुषंगाने नांदेड तालुक्‍यातील शिख धर्मीय मतदारांना मतदार यादीत अधिकाधिक नाव नोंदणीबाबत जनजागृती करणेच्‍या अनुषंगाने जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांचे कक्षात बैठक आयोजीत करण्‍यात आली होती.   
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी बैठकीत पुढील प्रमाणे सुचना दिल्या. निवडणूकीसाठी अधिसूचनेनुसार मतदार यादीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. त्यानुसार मतदार नोंदणीसाठी प्रत्‍येक संबंधीत तहसील कार्यालयात स्‍वतंत्र कक्षाची स्‍थापना केली आहे. तसेच नांदेड तालुक्‍यातील मतदारांच्‍या नोंदणीसाठी सर्व मंडळ अधिकारी कार्यालये, नांदेड गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब येथे अतिरिक्‍त मतदार नोंदणी कक्ष स्‍थापन करण्‍यात येत आहे. जे मतदार 20 जुलै 2018 ते 18 ऑगस्‍ट 2018 या कालावधीत फॉर्म 1 भरुन मतदार यादीत नावे नोंदवितील, त्‍यांचीच नावे मतदार यादीत नोंदविल्‍या जातील. सन 2012 च्‍या मतदार यादीत नावे असलेले मतदारांनी सुध्‍दा नव्‍याने नाव नोंदणी करावयाची आहे. सन 2012 ची मतदार यादी ही सदर निवडणूकीसाठी ग्राह्य धरल्‍या जाणार नाही.  महाराष्‍ट्र विधासभेसाठी दि. 1 जुलै 2018 रोजी अस्तित्‍वात असलेल्‍या मतदार यादीत ज्‍या मतदारांची नावे आहेत त्‍यांनाच सदरील मतदार नोंदणी फॉर्म भरता येईल. या निवडणूकीसाठी नव्‍याने मतदार नोंदणी करावयाची आहे. जे मतदार नव्‍याने नाव नोंदणी करणार नाहीत, त्‍यांची नावे 2018 च्‍या मतदार यादीत स‍माविष्‍ट केली जाणार नाहीत. प्रत्‍येक जिल्‍ह्याला 2012 च्‍या निवडणूकीच्‍या मतदार यादी माहितीस्‍तव पाठविली आहे. परंतू या निवडणूकीसाठी सर्वच शिख धर्मीय नागरिकांना नव्‍याने मतदार यादीत नोंदणी करावयाची आहे. ज्‍यांची नावे सन 2012 च्‍या मतदार यादीत आहेत, परंतू या निवडणूकीसाठी ज्‍यांनी मतदार नोंदणी न केल्‍यास त्‍यांची नावे मतदार यादीत समाविष्‍ट केली जाणार नाहीत. तसेच सन 2012 ची मतदार यादी सदर निवडणुकीसाठी ग्राह्य धरली जाणार नाही.

मतदार नोंदणीचे फॉर्म 1 व त्‍याची पोचपावती सर्व जिल्‍हाधिकारी सर्व तहसिलदार यांना पाठविले आहेत. संबंधित तहसिल कार्यालयातून फॉर्म 1 घेऊन योग्‍य पध्‍दतीने भरुन, संबंधित तहसिल कार्यालयात / मतदार नोंदणी कक्षात दाखल करावेत व पोच पावती घ्‍यावी. मतदार नोंदणीवरील प्रारुप मतदार यादी प्रसिध्‍दीनंतर मतदार यादीतील आक्षेप आणि दुरुस्‍तीसाठी फॉर्म नमुना नं.- 2 व त्‍याची पोच पावती सर्व जिल्‍हाधिकारी व सर्व तहसिलदार यांना पाठविले आहेत. मतदार नोंदणीचा फॉर्म सोबत मतदार ओळखपत्र / मतदार यादीचे मतदाराचे नाव असलेले पेज (1 जुलै 2018 च्‍या विधानसभेच्‍या मतदार यादीचे) जोडावे. इतर धर्मातून शिख धर्म स्विकारला असल्‍यास अमृतपानाचे प्रमाणपत्र जोडावे. परंतू सदरील बाबी बंधनकारक नसून, केवळ मतदारांची नोंदणी करणे सोपे होण्‍यासाठी  आहेत. मतदार नाव नोंदणीचा कार्यक्रमाची मुदत दि.18 ऑगस्‍ट 2018 रोजी पर्यंत आहे. सदर कालावधीतच मतदारांनी नाव नोंदणी करावयाची आहे. याबाबत सर्वच नागरिकांनी विशेषत: शिख समाजातील नागरिकांनी जनजागृती करावी. तसेच जास्‍तीत जास्‍त मतदारांनी यादीत नावे नोंदविण्‍यासाठी सर्वच नागरिकांनी प्रयत्‍न करावेत, अशा सुचना देण्यात आल्या.
यावेळी  उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी प्रदिप कुलकर्णी, गुरुव्‍दारा सचखंड बोर्डाचे अधीक्षक जी. एस. वाधवा, प्रशासकीय अधिकारी डी. पी. सिंघ, जिल्‍हा व सत्र न्‍यायालयाचे सरकारी अभियोक्‍ता अ‍मरिकसिंघ वासरीकर,  नगरसेवक गाडीवाले संदिपसिंघ शंकरसिंघ, श्रीमती गाडीवाले मनमितकौर नरेंद्रसिंघ, गाडीवाले विरेंद्रसिंघ जगतसिंघ, श्रीमती सोडी गुरप्रितकौर दिलीपसिंघ, श्रीमती प्रकाशकौर सुरजितसिंघ खालसा, नवाब गुरमितसिंघ बरयामसिंघ, नायब तहसिलदार श्री नांदगावकर, मुगाजी काकडे, श्रीमती स्‍नेहलता स्‍वामी, गुरुव्‍दारा सचखंड बोर्डाचे सदस्‍य, व्यवस्थापन समिती आदी उपस्थित होते.
00000


एमपीएससीमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा
आज जिल्हा प्रशासनातर्फे नागरी सत्कार
नांदेड दि. 4 :- "उज्ज्वल नांदेड" या मोहिमेंर्गत जिल्हाधिकारी कार्यालय सेतू समिती, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने रविवार 5 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 10.30 वा. डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम परिसर नांदेड येथे एमपीएससी यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने 23 24 सप्टेंबर 2017 या दोन दिवसात प्रतिरुप मुलाखाती (mock Interview) घेण्यात आले होते. त्यातील जवळपास 30 विद्यार्थ्यांची पोलिस उपनिरीक्षक या पदावर निवड झाली आहे. तसेच शासनाच्या इतर काही विभागात विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. अशा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकासह नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रास प्रमुख अतिथी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, प्रा. मनोहर भोळे व औरंगाबादचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.
000000

  वृत्‍त क्र.   36 6 एमएच-सीईटी परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश   नांदेड , दि.   19   : - एमएच-सीईटी परीक्षा-2024     ही 2...