Monday, March 21, 2022

 

धान्य महोत्सवात शेती पुरक उद्योगातून

महिलाही घेत आहेत भरारी

 

नांदेड, (जिमाका) दि. 21  :- विकेल ते पिकेल अभियानातर्गंत येथील जिल्हाधिकारी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या धान्य महोत्सवात शेतीपुरक उद्योगातून बचतगट आणि स्वव्यवसायातून महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रत्येक स्टॉलला आज भेट देवून महिलांना प्रोत्साहन दिले.

गोपाल चावडी येथील बालाजी महिला बचत गट व कांताबाई संग्राम इंगळे या महिला शेतकऱ्यांनी जात्यावर तयार केलेली मुगडाळ, उडीद डाळ, हिरवे मुग हे ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. दालमिल मधील दाळीची चव व दगडी जात्यावर हाताने भरडलेल्या दाळीची चव यात कमालीचा फरक लक्षात येतो. पुर्णत: नैसर्गिक पध्दतीने केलेली ही डाळ व इतर उत्पादने मागील पाच वर्षापासून विक्री करत आहेत.

 

बोरगाव जि.नांदेड येथील भाग्यश्री महिला बचत गटातील संगीता गंगाराम कंदारे यांनी अगरबत्ती व्यवसाय गेल्या 1 वर्षापासून सुरू केला आहे. या बचतगटामध्ये काम करण्यासाठी महिलांची संख्या मोठी आहे.अगरबत्तीसाठी लागणारा कच्चामाल हे बचत गट  नागपूर येथुन आणतात. सुवासिक लाकूड, मुळ्या, साली, पाने, चंदन, अगरू, कोळसा, लवंग, दालचिनी, निलगिरी, गुलाब, मोगरा, चमेली, रातराणी अर्क, धूप, कापूर, केवडा, कंकोळ, तुळस, अटामसी, मारवा, नागरमोथा, बुक्का, भाताचे तूस, व्हाईट ऑईल, ग्रीस, लुबिकेटिंग ऑईल, सोरा डिंक, गोंद-खळ, स्टार्च बांबू किंवा वेळूच्या कामट्या आदी कच्चा माल आता या महिलांच्या रोजच्या सरावातील झाला आहे.  

 

माधवनगर पूर्णारोड येथील सविता पावडे या मागील पाच वर्षापासून नैसर्गिक शेती करतात. पाच एकर शेतामध्ये विविध प्रकारचे भाजीपाला विक्रीसह चिकू, मोसबी , पेरू या फळाचे उत्पादन त्या घेतात.त्यांनी एक एकरमध्ये काळ्या गव्हाचे पिक घेतले आहे.  कुठल्याही रासायनिक खताचा वापर न करता एक एकर जागेमध्ये त्यांनी काळा गहु पिकविला आहे. काळा गहू मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. या गव्हामध्ये व्हिटॅमिन, खनिज, प्रोटीन व फायबरयुक्त असून शरीरासाठी उत्तम आहे.शरीरात ॲटीऑक्सीडेंटची मात्रा वाढविण्यास प्रभावी आहे.सामान्य गव्हापेक्षा अधिक पोषक तत्वे यामध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

00000

 

 

 

नांदेड जिल्ह्यात आज एकही कोरोना बाधित नाही

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 575 अहवालापैकी निरंक अहवाल कोरोना बाधित आले आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 795 एवढी झाली असून यातील 1 लाख 95 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 8 रुग्ण उपचार घेत आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. आज नांदेड मनपा अंतर्गत विलगीकरण 1, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 असे एकुण 2 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.

 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 6, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 2 असे एकुण 8  व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 91 हजार 175

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 71  हजार 264

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 795

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 95

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.37 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-05

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-8

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक

 

कोरोना विषाणुची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000

 महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची

प्रभावी अंमलबजावणी व्हावी

- जिल्हाधिकारी  डॉ. विपीन इटनकर

 

नांदेड, (जिमाका) दि. 21  : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 या कायदयान्वये राज्याच्या नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. या सेवा नागरिकांपर्यंत पोहविण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयाने आपल्या कार्यालयातील पोर्टल अपडेट ठेवणे आवश्यक आहे. कुठल्याही माहिती पासून नागरिक वंचित राहणार नाहीत याची  दक्षता सर्व विभागप्रमुख यांनी घ्यावी  असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी  दिले.

 

नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लोकसेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर-घुगेउपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळेमनपा आयुक्त सुनील लहाने तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

नांदेड जिल्ह्यात एकूण 1310 ग्रामपंचायती असून 1596 गावे असून यापैकी 796 ठिकाणी आपले सरकार केंद्र स्थापित करून सेवा पुरविण्यात आल्या आहेत. शहरी भागामध्ये 265 केंद्र स्थापित करण्यात आली आहे.लोकसेवा अधिनियम 2015 नुसार शासनाच्या विविध विभागाच्या एकुण 420 सेवा आपले सरकार व्दारे नागरिकांना सेवा पुरवित आहेत.या सेवे अंतर्गत शाळा/महाविद्यालयामध्ये कॅम्प आयोजित करून विद्यार्थ्यांना एकच वेळी एकाच ठिकाणी जातरहिवाशी  प्रमाणपत्रउत्पनाचे प्रमाणपत्र त उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

000000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...