Wednesday, February 5, 2020


अनुसूचित जातींच्या स्वयंसाहाय्यता बचतगटांना
90 टक्के अनुदानावर मिनि ट्रॅक्टरची योजना
अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी 14 फेब्रुवारीची मुदत
नांदेड दि. 6 :-  अनुसूचित जातींच्या स्वयंसाहय्यता बचतगटांना 90 टक्के अनुदानावर मिनि ट्रॅक्टर योजना अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी संपूर्ण मूळ कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ज्ञानमाता शाळेसमोर नांदेड येथे प्रस्तुत शाखेस 14 फेब्रुवारी 2020 पर्यंत सादर करावीत, असे आवाहन तेजस माळवदकर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.    
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे  अनुसूचित जाती व नवबौद्ध  घटकांच्या  स्वयंसाहय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर  9 ते 18 अश्वशक्तीचे  मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने  यांचा पुरवठा करण्याची योजना कार्यान्वित झाली आहे. शासन निर्णय 8 मार्च 2017 अन्वये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसाहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्यासाठी लाभाचे हस्तांतर रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
या वर्षात ज्या बचत गटांनी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने मिळविण्यासाठी अर्ज केला  होता त्या सर्व अर्जांची तपासणी केली असता अर्जात त्रुटी आढळून आल्या आहेत. या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी समाज कल्याण कार्यालयाकडून यापूर्वीच दोन वेळेस सर्व बचत गटांना त्रुटी पूर्ततेची संधी देण्यात आली होती. ज्या काही बचतगटांनी त्रुटीची पूर्तता अद्याप पर्यंत केली नाही अशा बचत गटांची  यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर दर्शनी ठिकाणी लावण्यात आली आहे.
बचतगटांनी  त्रुटींची पूर्तता करण्यासाठी  नांदेड जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार ज्या बचत गटांनी त्रुटी पूर्तता करावयाची राहिली आहे त्या सर्व बचत गटांनी 7 ते 14 फेब्रुवारी 2020 या कालावधीत त्रुटींची पूर्तता करण्यासाठी अंतिम संधी देण्यात आली आहे. मुदतीनंतर आपला अर्ज अपात्र ठरवून ईश्वर चिट्ठीने निवड प्रक्रियेत आपल्या बचत गटाचा सहभाग नसेल तसेच आपला कुठलाही दावा, तक्रार किंवा विनंती मान्य करण्यात येणार नाही.      
00000



दहावी, बारावी परीक्षेसाठी हेल्पलाईन
नांदेड, दि. 6 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर इयत्ता दहावीसाठी 02382- 251633 व इयत्ता 12 वीसाठी 02382- 251733 ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.
विद्यार्थी पालक व शाळा प्रमुखांनी आपल्या अडीअडचणी विषयी दूरध्वनी क्रमांकावर किंवा समुपदेशकाचे नाव बी. एम. कच्छवे 9371261500 व बी. एम. कारखेडे 9860212898 या क्रमांवर संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी केले आहे.
00000


अखिल भारतीय व्यवसाय
परिक्षेचे वेळापत्रक जाहीर
नांदेड दि. 6 :-  अखिल भारतीय व्यवसाय परिक्षा 110 वी प्रक्रिया (शिकाउ उमेदवारी योजना) गुरुवार 6 फेब्रुवारी 2020 पासून सुरु झाली आहे.  या परिक्षेचे ऑनलाईन अर्ज व शुल्क 6 ते 20 फेब्रुवारी 2020 या कालावधीत भरुन आस्थापनेमार्फत बी. टी. आर. आय. विभागात विहित कालमर्यादेत सादर करावे. ऑनलाईन परिक्षा 20 ते 22 मार्च 2020 या कालावधीत होणार आहे.
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी बी. टी. आर. आय. केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे क. प्र. सल्लागार एस. एस. ठक्के (भ्रमणध्वनी क्र. 9420541404) यांचेशी संपर्क करावा, असे आवाहन सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड यांनी केले आहे. 
00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...