Monday, June 12, 2017

जिल्हा रुग्णालयातील समुपदेशकाच्या
प्रसंगावधानाने अपघातग्रस्ताचे वाचले प्राण  
नांदेड, दि. 12 :-  छत्रपती चौक ते मोर चौक या रस्त्यावर रविवारी 11 जुन रोजी रात्री 9.30 वा. दरम्यान  दुचाकीस्वार विजय राम वाघमारे, एकतानगर यांचा वाहन घसरुन अपघात झाला. या अपघातात प्रसंगावधान राखून जिल्हा रुग्णालय येथील समुपदेशक सदाशिव सुवर्णकार यांनी मदतीचा हात पुढे केला. यामुळे दुचाकीस्वाराचा प्राण वाचला.
छत्रपती चौक ते मोर चौक या रस्त्यावर दुचाकीस्वाराचा वाहन घसरुन अपघात झाल्याचे श्री सुवर्णकार यांच्या लक्षात येताच त्यांनी कोणत्याही प्रकारचा विलंब न करता 108 या रुग्णवाहिकेमार्फत संबंधीत जखमी श्री. वाघमारे यांना जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी विष्णुपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यामुळे वाघमारे यांना प्रथपोचार तात्काळ मिळाल्याने त्यांचा प्राण वाचला. सध्या त्यांची प्रकृती स्थीर आहे. अपघाताच्या घटनेप्रसंगावधान राखून मदत करणाऱ्या सुवर्णकार जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांने कौतूक केले. जखमी वाघमारे यांच्या वरील उपचारासाठी रुग्णालयातील कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकारी, तसेच ईएमएस समन्वयक सचिन कोताकोंडावर यांनी सहकार्य केले.

000000
दहावीचा निकाल आज जाहीर होणार
नांदेड, दि. 12 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च 2017 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंगळवार 13 जून 2017 रोजी दुपारी 1 वा. ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे, असे जाहीर प्रकटन शिक्षण मंडळाच्यावतीने प्रसिद्धीस देण्यात आले आहे.  
या प्रकटनात म्हटले आहे की, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी मार्च 2017 परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण www.mahresult.nic.in, www.sscresult.mkcl.org, www.maharashtraeducation.com, www.knowyourresult.com, www.rediff.com/exams, www.jagranjosh.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. या परीक्षेचा निकाला एसएमएस सेवेद्वारे मोबाईल फोनवरुन देखील उपलब्ध होणार असल्याचे मंडळाने म्हटले आहे.

000000
जिल्हाधिकारी कार्यालयात
आज पेन्शन अदालत
नांदेड, दि. 12 :- जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी 13 जून 2017 रोजी पेन्‍शन अदालत आयोजीत करण्‍यात आली आहे. जिल्‍ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्‍त झालेले अधिकारी, कर्मचारी यांच्‍या अडचणी निवारण्‍यासाठी या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत उपस्थित राहन तक्रारीचे निवेदने दयावीत, असे आवाहन नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्‍यात आले आहे.

000000
जिल्ह्यात गत 24 तासात
 एकूण 64.26 मि.मी. पाऊस
          नांदेड, दि. 12 - जिल्ह्यात सोमवार 12 जून 2017 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात एकुण 64.26 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात सरासरी 4.02  मिलीमीटर पाऊस झाला आहे.  तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 70.36 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे.
जिल्ह्यात 12 जून 2017 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय पुढील  प्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस : नांदेड- 0.13 (46.52), मुदखेड- 4.50 (56.95), अर्धापूर- 7.33 (66.32) , भोकर- 12.50  (111.25) , उमरी- निरंक (27.00), कंधार-2.00 (55.50), लोहा-2.00 (72.66), किनवट-3.86 (139.28), माहूर-0.50 (36.50), हदगाव-0.57 (218.32), हिमायतनगर-1.33 (63.49), देगलूर- निरंक  (43.47), बिलोली- 4.60 (32.60), धर्माबाद- निरंक (53.00), नायगाव-5.80  (34.00), मुखेड-19.14 (68.88) आज  अखेर  पावसाची सरासरी 70.36 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 1125.74) मिलीमीटर आहे.
00000000


  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...