Tuesday, September 15, 2020

 

जिल्ह्यातील ज्या विद्यार्थ्यांकडे प्रगत माध्यमे नाहीत

त्या विद्यार्थ्यांनाही शिक्षणाच्या प्रवाहात आणू

-         शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड 

नांदेड (जिमाका) दि. 15:- जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्गाचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ई-संवादाच्या माध्यमांद्वारे शिक्षण देण्यात येत आहे. इंटरनेट, मोबाईल, दुरदर्शन, आकाशवाणी,       यु-टयूब, व्हॉटसप या माध्यमांचा वापर आता ग्रामीण भागातही शिक्षक आणि विद्यार्थी अत्यंत प्रभावीपणे करत आहेत. मात्र ज्या विद्यार्थ्यांकडे यासुविधा उपलब्ध नाहीत असा एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये याचे नियोजन शिक्षण विभागाकडून केले जात असून जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यत शिक्षण पोहचावे यासाठी आम्ही प्रयत्नरत असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले. 

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनात आयोजित शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, सर्वश्री आमदार अमर राजूरकर, भिमराव केराम, राजेश पवार, मोहन हंबर्डे, बालाजी कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, शिक्षण सभापती संजय बेळगे व माध्यमिक शिक्षणाधिकारी बी. आर. कुंडगिर व प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

ग्रामीण भागात कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. या परिस्थितीत शाळा सुरु करणे शक्य नसल्यामुळे ऑनलाईन शिक्षण देण्यावर भर देण्यात येत आहे. काही जिल्ह्यांमध्ये विविध सेवाभावी संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांनी, सेवानिवृत्त शिक्षकांनी शासनाचे निकष पाळून मोकळ्या जागेत आपआपल्या भागातील मुलांना शिकविण्याचे प्रयोग सुरु केले आहेत. या धर्तीवर सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून जर कुठे कोणी प्रयत्न करत असेल तर त्यातील उदात्त दृष्टिकोण आपण लक्षात घेतला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

ग्रामीण भागात जिथे इंटरनेटची सुविधा नसेल तेथे शिक्षणमित्र व विद्यार्थीमित्र तयार करुन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट करत शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहता कामा नये याची नियोजन शिक्षण विभागाने करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. 

जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या अनुषंगाने आमदार अमर राजूरकर, आमदार भिमराव केराम, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहन हंबर्डे यांनी विविध अडचणी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या निदर्शनास आणून दिल्या. जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा एकत्रित आढावा माध्यमिक शिक्षणाधिकारी बी. आर. कुंडगिर व प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी उपस्थितांसमोर मांडला.

0000



 

213 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

345 बाधितांची भर तर तीन जणांचा मृत्यू    

नांदेड (जिमाका) दि. 15 :- मंगळवार 15 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 213 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 345 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 58 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 287 बाधित आले. 

आजच्या एकुण 1 हजार 485 अहवालापैकी  940 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 12  हजार 182 एवढी झाली असून यातील 7  हजार 909 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 889 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 51 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.  

या अहवालात मंगळवार 15 सप्टेंबर रोजी हडको नांदेड येथील 76 वर्षाच्या एक महिलेचा, कुंडलवाडी बिलोली येथील 64 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णपुरी नांदेड येथे तर गवळीपुरा नांदेड येथील 80 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा  रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 321 झाली आहे.    

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 8, किनवट कोविड केंअर सेंटर 1, लोहा कोविड केंअर सेंटर 5, धर्माबाद कोविड केंअर सेंटर 14, माहूर कोविड केंअर सेंटर 19, मुखेड कोविड केंअर सेंटर 28, खाजगी रुग्णालय 24, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड 25, हदगाव कोविड केंअर सेंटर 20, एनआरआय / पंजाब भवन / महसूल भवन / होमआयसोलेशन 44, कंधार कोविड केंअर सेंटर 4, मुदखेड कोविड केंअर सेंटर 3, नायगाव कोविड केंअर सेंटर 17, लातूर येथे संदर्भित केलेले 1 असे 213 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 29, अर्धापूर तालुक्यात 1, किनवट तालुक्यात 2, बिलोली तालुक्यात 3, हिंगोली 7, नांदेड ग्रामीण 3, हिमायतनगर तालुक्यात 4, मुखेड तालुक्यात 5, परभणी 4 असे एकुण 58 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 94,  हदगाव तालुक्यात 14, अर्धापूर तालुक्यात 15, किनवट तालुक्यात 11, बिलोली तालुक्यात 9, मुखेड तालुक्यात 23, धर्माबाद तालुक्यात 5, उमरी तालुक्यात 9, हिमायतनगर तालुक्यात 2, नांदेड ग्रामीण 6, मुदखेड तालुक्यात 3, लोहा तालुक्यात 40, कंधार तालुक्यात 35, भोकर तालुक्यात 4, देगलूर तालुक्यात 6, माहूर तालुक्यात 2, नायगाव तालुक्यात 7, हिंगोली 1, आदिलाबाद 1 असे  एकुण 287 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 3 हजार 889 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 298, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन, होम आयशोलेशन एकत्रित  1 हजार 836, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 84, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवीन इमारत) 24, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 142, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 101, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 188,  देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 66, लोहा कोविड केअर सेंटर येथे 114, हदगाव कोविड केअर सेंटर 41, भोकर कोविड केअर सेंटर 29, कंधार कोविड केअर सेंटर येथे 59,  किनवट कोविड केअर सेंटर येथे 210, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 48, मुदखेड कोविड केअर सेटर 74,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 19, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 51, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 52, उमरी कोविड केअर सेंटर 95, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 11, बारड कोविड केअर सेंटर 21, खाजगी रुग्णालयात 324 बाधित,  औरंगाबाद 1 व निजामाबाद 1  संदर्भित झाले आहेत.  

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 67 हजार 10,

निगेटिव्ह स्वॅब- 51 हजार 283,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 345,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 12 हजार 182,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-19,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 14,

एकूण मृत्यू संख्या- 321,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 7 हजार 909,

आज रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 889,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 1 हजार 592, 

आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 51,

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 67.03 टक्के  

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

00000

 

माझे कुटूंब-माझी जबाबदारी

 

काळजी घ्या काहीही कमी पडू देणार नाही

-         पालकमंत्री अशोक चव्हाण

पालकमंत्र्यांनी साधला शिवनगरच्या कुटुंबाशी संवाद

डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात

नवीन 80 खाटाच्या आयसीयू वार्डाची भर   

नांदेड (जिमाका) दि. 15 :- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात मी स्वत: शासन पातळीवरुन दक्ष असून शासनाकडून कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू देणार नाही फक्त तुम्ही स्वत: काळजी घेत आरोग्य विभागाच्या तपासणीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्याला सहकार्य करा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले.   

माझे कुटूंब-माझी जबाबदारी या मोहिमेच्या शुभारंभानिमित्त त्यांनी नांदेड येथील प्रभाग क्रमांक 10 च्या शिवनगर येथील स्थानिक रहिवासी दत्ता इंगळे व श्रीमती कुसूमबाई दराडे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुनिल लहाने, मनपा सभागृह नेता विरेंद्रसिंघ गाडिवाले, उपायुक्त अजितपालसिंघ संधू, प्रभागीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी मो. बदीयोद्यीन, आशा वर्कस व इतर उपस्थित होते. 

दिवसेंदिवस कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य यंत्रणेची परिक्षा पणाला लागली आहे. जिल्ह्यातील आरोग्याच्या प्रश्नाबाबत माझ्या वारंवार प्रशासनाशी आढावा बैठका घेत असून आरोग्य सेवासुविधेची कुठलीही कमतरता पडणार नाही यासाठी नियोजन करीत आहे. आपल्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नुकतेच आपण 80 खाटाचे दोन आयसीयू वार्ड अद्यावत केले आहे. यात 64 खाटा या आयसीयूच्या तर 16 खाटा या ऑक्सिजनच्या तयार केल्या आहेत. पुर्वीच्या 170 आयसीयू खाटांमधून ही नवी भर पडली असून आता अतीगंभीर जे बाधित आहेत त्यांच्यावर येथे प्राधान्याने उपचार केले जातील, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. काही प्रमाणात ऑक्सिजनचा वाहतुकीमुळे थोडा प्रश्नही निर्माण झाला होता. तथापि ऑक्सिजनचा कुठलाही तुटवडा नसून वाढत्या संख्येच्या प्रमाणात त्याचे योग्य व्यवस्थापन जिल्हा प्रशासनामार्फत आता अधिक प्रभावीपणे केले जाईल असेही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी श्रीमती कुसूमबाई दराडे यांच्याशी संवाद साधतांना सांगितले.

00000




 

आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी

महिला शक्ती आपले सामर्थ्य लावेल पणाला

-         जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर 

माझे कुटूंब-माझी जबाबदारी मोहिमेचा भोसी ग्रामपंचायतीतून शुभारंभ 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- अडचणीच्या काळात कुटुंबाला सावरण्यास आणि आहे त्या परिस्थितीवर मात करीत कुटुंबाला उभे करण्याचे जन्मजात सामर्थ्य महिलांमध्ये दडलेले आहे. वेळोवेळी महिलांने हे आपले सामर्थ्य सिद्ध करुन दाखविले आहे. कोरोनासारख्या महामारीच्या या काळात आता पुन्हा एकदा घरातील सर्व सदस्यांसमवेत महिलांना सज्ज होऊन कुटुंब सावरण्याची जबाबदारी आली असून माझे कुटूंब-माझी जबाबदारी या मोहिमेत त्या आपले भरीव योगदान देतील अशी खात्री जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांनी व्यक्त केली. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेल्या माझे कुटूंब-माझी जबाबदारी या मोहिमेचा प्रातिनिधीक शुभारंभ नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील भोसी येथे झाला. यावेळी उद्घाटनपर भाषणात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब कदम, पंचायत समिती सभापती श्रीमती निता राऊलवाड, जिल्हा परिषद सदस्य प्रकाशराव भोसीकर, भोसीचे सरपंच श्रीमती रत्‍नमाला शिंगेवाड, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य डॉ. शिवशक्‍ती पवार उपस्थित होते. 

मागील सहा महिन्यांपासून शासनाचा आरोग्य विभाग, महसूल विभाग, पोलीस विभाग व ग्रामीण भागासाठी असलेली सर्व यंत्रणा जीवाचे राण करुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम करीत आहे. आपल्या आशा वर्कर पासून जिल्हा पातळीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आपल्या कुटुंबाला विसरुन जे योगदान दिले आहे त्याला तोड नाही. आरोग्याची ही यंत्रणा जर आपल्याला सक्षम ठेवायची असेल तर प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबाने आपआपली जबाबदारी आणि कर्तव्य ओळखून आपले वर्तण हे माझे कुटूंब-माझी जबाबदारी या न्यायासाठी सिद्ध केले पाहिजे, असे सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांनी स्पष्ट केले. आपली गावपातळीवरील काम करणारी अंगणवाडी सेविका असो, आशाताई वर्कर असो ही सर्व महिला शक्ती या मोहिमेला केवळ सरकारी उपक्रमाच्या दृष्टिकोणाने पाहणार नाही तर आजवर त्यांनी ज्या गावाला आपले कुटुंब मानले आहे त्या कर्तव्यपूर्तीतून यात योगदान देतील. मी एक महिला म्हणून आमच्या आशाताईला एकटे पडू न देता त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी पुढे सरसावेल असेही त्यांनी स्पष्ट केले. 

माझे कुटूंब-माझी जबाबदारी ही मोहिम  प्रत्येक कुटुंबाला सुरक्षिततेचा मंत्र देणारी असून यात प्रत्येक गावातील लोकसहभाग अधिकाधिक कसा घेता येईल यासाठी जिल्हा परिषदेचे आणि ग्रामपंचायतीचे सर्व प्रतिनिधी आपले योगदान देतील अशी ग्वाही जिल्हा परिषदेच्या कृषि व पशुसंवर्धन विभागाचे सभापती  बाळासाहेब कदम यांनी दिली. 

कोविडचा प्रादुर्भाव आता ग्रामीणस्तरावर मोठ्या प्रमाणात होण्याच्या मार्गावर आहे. आजही ग्रामीण भागातील जनता याचा प्रसार रोखण्यासाठी जी त्रीसुत्री सांगितली आहे त्याचा वापर करतांना दिसत नाही. मास्क वापरणे, सतत हाताला स्वच्छ करणे, एकमेंकांपासून प्रत्येकांनी सुरक्षित अंतर ठेवणे याबद्दल ग्रामीण भागातील जनतेने कटाक्षाने काळजी घेतली पाहिजे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांनी सांगितले. या मोहिमेसाठी जिल्हा परिषदेच्यावतीने ज्या वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत त्याप्रमाणे नियोजन करीत प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवरील सरपंच, सदस्य, ग्रामसेवकांपासून तालुका पातळीवर गटविकास अधिकारी यांनी ही मोहिम प्रत्येक घराघरात कशी रुजेल यासाठी स्वत:ला जोकून देऊन काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले. 

प्रारंभी पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ग्रामस्थांना या मोहिमेच्या उद्घाटनानिमित्त जो संदेश दिला होता त्याचे वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांनी केले. जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी या मोहिमेचा उद्देश स्पष्ट करीत लोकसहभागाचे महत्व विशद केले. 

भोसी गावातील ज्येष्ठ नागरिक पांडुरंग इरन्ना सिंगेवाड व उद्धव पांडुरंग साबणे या दोन ज्येष्ठ नागरिकांचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब कदम यांनी तापमान व ऑक्सिजन मोजून प्रातिनिधीक शुभारंभ  केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त जिल्हा आरोग्य डॉ. शिवशक्ती पवार यांनी तर आभार सुभाष खाकरे यांनी मानले.

000000

Add caption




  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...