Tuesday, August 22, 2023

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतीसाठी उद्योजकता प्रशिक्षणाचे आयोजन

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतीसाठी उद्योजकता प्रशिक्षणाचे आयोजन नांदेड (जिमाका) दि. 22 :- मिटकॉन आयोजित व जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत सर्वसाधारण गटातील व अनुसूचित जाती, जमातीतील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी पेपर बॅग मेकिंग, डेटा एंट्री ऑपरेटर, इन्व्हर्टर रिपेरिंग, बनाना चिप्स मेकिंग, मोबाईल रिपेरिंग, मोटार रिवाइंडिग, टू व्हीलर रिपेरिंग इत्यादी वर आधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहेत. प्रशिक्षण प्रवेशासाठी किमान सातवी पास, वय 18 ते 45 असावे, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक खाते असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणासाठी निवड करताना अपंग, महिला, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य, भूमिहिन शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. इच्छूकांनी सर्व कागदपत्र नांदेड येथे मिटकॉन कार्यालयात सादर करावे. अधिक माहितीसाठी जिल्हा समन्वयक मिटकॉन यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मिटकॉनचे जिल्हा समन्वयक आर.एस. दस्तापुरे यांनी केले आहे. 00000

राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश सुर्यकांत ढवळे यांचा दौरा कार्यक्रम

राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश सुर्यकांत ढवळे यांचा दौरा कार्यक्रम नांदेड (जिमाका) दि. 22 :- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश सुर्यकांत ढवळे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. बुधवार 23 ऑगस्ट 2023 रोजी मुंबई येथून खाजगी वाहनाने नांदेड येथे सकाळी 9.30 वा. आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे रवाना. सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे अप्पर जिल्हाधिकारी तथा जिल्हा तक्रार निवारण अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या समवेत (Aepds) अंतर्गत नियतन, उचल व वाटपाचा आढावा. दुपारी 12.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे शिक्षणाधिकारी प्राथ. व प्रशासकीय अधिकारी शा.पो.आ.मनपा याचे समवेत पोषण आहार योजनेअंतर्गत माहे एप्रिल 2022 ते जुलै 2023 पर्यत नियतन, उचल वाटपाचा आढावा. दुपारी 2 वा. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा कार्यक्रम अधिकारी व प्रकल्प अधिकारी शहर व ग्रामीण यांचे समवेत महिला व बालविकास योजना अंतर्गत कच्चे धान्याचा माहे एप्रिल 2022 ते जुलै 2023 पर्यत नियतन, उचल व वाटपाचा आढावा. दुपारी 3 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा कृषि अधिक्षक यांचे समवेत नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांवर चर्चा. दुपारी 3 ते 6 या कालावधीत शासकीय धान्य गोदामे, शालेय पोषण आहार पुरवठादार गोदामे, महिला व बाल विकास सेवा योजना पुरवठादार गोदामांना भेटी तसेच अंगणवाडी, स्वस्त धान्य दुकानांना भेटी. सायं. 6 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे मुक्काम. गुरुवार 24 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10.30 ते 5.30 या कालावधीत शासकीय धान्य गोदामे, शालेय पोषण आहार पुरवठादार गोदामे, महिला व बाल विकास सेवा योजना पुरवठादार गोदामांना भेटी तसेव अंगणवाडी, स्वस्त धान्य दुकानांना भेटी. सायं. 6 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे मुक्काम. शुक्रवार 25 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10.30 ते 5.30 या कालावधीत शासकीय धान्य गोदामे, शालेय पोषण आहार पुरवठादार गोदामे, महिला व बाल विकास सेवा योजना पुरवठादार गोदामांना भेटी तसेच अंगणवाडी, स्वस्त धान्य दुकानांना भेटी. सायं 6. वा. खाजगी वाहनाने मुंबईकडे प्रयाण करतील. 00000

इतर मागासवर्गीय विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी संपर्क साधण्याचे आवाहन

इतर मागासवर्गीय विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी संपर्क साधण्याचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 22 :- राज्यातील ओबीसी प्रवर्गातील लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वयंरोजगाराला चालना देण्याच्या उद्देशाने शासनाने बहुजन कल्याण विभागांतर्गत इतर मागासवर्गीयांसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत कृषी संलग्न, लघु उद्योग, सेवा उद्योग इत्यादी नवीन व्यवसाय किंवा व्यवसाय वाढीसाठी वित्त पुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. इतर मागास वर्गीय प्रवर्गातील इच्छुक व गरजू व्यक्तींनी अधिक माहितीसाठी महामंडळाच्या कार्यालयाचा दूरध्वनी 02462-220865 या क्रमांकावर किंवा www.msobcfdc.org.in या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस.एन.झूंजारे नांदेड यांनी केले आहे. बीज भांडवल कर्ज योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत बीज भांडवल कर्ज योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करण्यात येईल. महामंडळाचा सहभाग 20 टक्के, लाभार्थी सहभाग 5 टक्के व बँकेचा सहभाग 75 टक्के राहील. महामंडळाच्या रक्कमेवर द.सा.द.शे. 6 टक्के व्याज दर असून परतफेडीचा कालावधी 5 वर्षे आहे. बँकेच्या रक्कमेवर बँक नियमानुसार व्याज दर आकारण्यात येईल. थेट कर्ज योजना थेट कर्ज योजनेतर्गत महामंडळाकडून व्यवसायानुसार महत्तम एक लक्ष रुपयापर्यंत कर्ज देण्यात येते. या योजनेत लाभार्थी सहभाग नाही. अर्जदाराचा सिबिल क्रेडिट स्कोअर किमान 500 इतका असावा. नियमित 2 हजार 85 रुपये 48 समान मासिक हप्त्यांमध्ये मुद्दल परतफेड करणाऱ्या लाभार्थीना व्याज द्यावे लागणार नाही परंतु थकीत झालेल्या हप्त्यांवर दसादशे 4 टक्के व्याजदर आकारण्यात येईल. वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना गरजू व कुशल व्यक्तींना व्यवसायाकरिता बँकेमार्फत वैयक्तिक कर्ज देण्यात येते. व्यवसायानुसार कर्ज रक्कम 1 ते 10 लाख रुपयापर्यंत बँकेमार्फत कर्ज देण्यात येते. कर्ज रकमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम महत्तम 12 टक्क्यांच्या मर्यादित व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरुपात बँक प्रामाणिकरणानुसार लाभार्थीच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. लाभार्थीने ऑनलाईन वेबपोर्टलवर उद्योग सुरु असल्याचे किमान दोन फोटो अपलोड करावे. गट कर्ज व्याज परतावा योजना महामंडळाच्या निकषानुसार विहित केलेल्या निकषांनुसार वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांच्या बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी (कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत) (LLP, FPO) अशा शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्था बँकेतर्फे स्वयंरोजगार, उद्योग उभारणीसाठी कर्ज दिले जाईल. त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणिकरणानुसार महामंडळकडून अदा करण्यात येईल. शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना उच्च शिक्षणासाठी राज्य, देशाअंतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरीता इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी / विद्यार्थींनींना बँकेमार्फत उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक कर्ज रक्कमेवरील व्याजाचा परतावा करणे. अभ्यासक्रमासाठी 10 लक्ष रुपये व परदेशी अभ्यासक्रमासाठी 20 लक्ष रुपये इतके महत्तम कर्ज अदा करण्यात येईल. विद्यार्थ्यांचे वय 17 ते 30 वर्षे असावे व तो इमाव प्रवर्गातील महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.ही योजना या बँकेमार्फत ऑनलाईन पध्दतीने राबविल्या जात असून महामंडळाच्या www.msobcfdc.org.in या संकेतस्थळावर स्वत: च्या लॉगीन आयडी तयार करुन अर्ज करावा, असे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ नांदेडचे जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. 00000

बस चालकांना मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन

बस चालकांना मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 22 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील सर्व बस चालकांसाठी 20 जुलै 2023 पासून मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन शासकीय रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नांदेड येथे सकाळी 9 ते दुपारी 12 या कालावधीत करण्यात आले आहे. तरी सर्व बसचालकांनी या मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे. देशात रस्ते अपघात ही एक गंभीर समस्या असून रस्ता सुरक्षितता ही परिवहन विभागाची महत्वाच्या जबाबदारी पैकी एक आहे. रस्ते अपघाताचे विश्लेषण केले असता बहुतांश अपघातास वाहनचालक कारणीभूत असतात. वाहनचालकांच्या वाहन चालविण्याच्या कौशल्यात त्यांचे आरोग्य तसेच वाहन चालकांच्या दृष्टीस अनन्यसाधारण महत्व आहे. चालकाला कुठल्याही प्रकारची व्याधी अथवा दृष्टीदोष असेल तर वाहन चालविताना त्याला अडचणी निर्माण होतात. परिणामी अशा परिस्थितीत अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने जिल्ह्यात सर्व बस चालकांची आरोग्य व दृष्टी तपासणी 20 जुलै पासून करण्यात येत आहे. या तपासणी शिबिरात माहे जुलै महिन्यात एकूण 97 वाहनचालकांची नेत्र व आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. नेत्र तपासणी दरम्यान एकूण 52 वाहनचालकांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले. ऑगस्ट महिन्यात 202 वाहनचालकांची नेत्र व आरोग्य तपासणी करण्यात आली. नेत्र तपासणी दरम्यान एकूण 93 वाहनचालकांना परिवहन विभागाच्यावतीने मोफत चष्म्याचे व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या शिबिरात चष्मा लागलेल्या वाहन चालकास मोफत चष्मे वाटप करण्यात येत आहेत. तरी बस चालकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे प्रादेशिक परिवहन विभागाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. 00000

जिल्ह्यातील सर्व न्यायालयात 9 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

 जिल्ह्यातील सर्व न्यायालयात

9 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

 

नांदेड, (जिमाका) दि. 21 :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांच्यावतीने शनिवार 9 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा न्यायालयात व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय नांदेड येथे ही राष्ट्रीय लोकअदालत संपन्न होईल. सर्व संबंधित पक्षकारांनी या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रकरणे ठेवावीत, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष ना.वि.न्हावकर व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा न्यायाधीश श्रीमती डी. एम. जज यांनी केले आहे.

 
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये
 प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणेदिवाणी प्रकरणेमोटार अपघात नुकसान भरपाईचे प्रकरणेभूसंपादन प्रकरणेधनादेश अनादरीत झाल्याबाबतची प्रकरणे तसेच कौंटुबीक न्यायालयातील तडजोड होण्यायोग्य प्रकरणेग्राहक तक्रार निवारण मंचसहकार न्यायालय व कामगार न्यायालयातील प्रकरणे इत्यादी प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय या लोकअदालतीत  दाखलपूर्व प्रकरणे जसे थकीत मालमत्ता करथकीत विद्युत बिलथकीत टेलीफोन बिलविविध बॅंकांचे कर्ज वसुलीचे प्रकरणथकीत पाणी बिल इत्यादी प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढल्या जातील.

 

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये झालेल्या निवाडयाविरुद्ध अपील नाही. प्रलंबीत प्रकरणात भरलेली कोर्ट शुल्काची रक्कम शंभर टक्के परत मिळते. नातेसंबंधात कटुता निर्माण होत नाही अशा प्रकारे लोकन्यायालयाच्या माध्यमातून सुलभजलद व मोफत न्याय मिळतो. पक्षकारांनी येतांना आपले अधिकृत ओळखपत्र घेवून यावे. या लोकअदालतीत मोठया संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावेअसेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 ग्रामीण गुंठेवारी प्रस्‍ताव स्विकारण्‍यास 31 डिसेंबर 2023 पर्यत मुदतवाढ

नांदेड (जिमाका) दि. 21 :- गुंठेवारीचे बरेच प्रस्‍ताव दाखल करावयाचे शिल्‍लक आहेत. सदर प्रस्ताव दाखल करुन घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय नांदेड (चिखलवाडी कॉर्नर नांदेड) येथे गुंठेवारी कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. तरी ग्रामीण भागातील गुंठेवारीचे प्रस्‍ताव दाखल करण्‍यास आता 31 डिसेंबर 2023 पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे.

 

महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम (नियमाधीन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) अधिनियम 2021 अंतर्गत महाराष्ट्र शासनाने 31 डिसेंबर 2020 पूर्वीचे अनधिकृत भुखंड / अनधिकृत भुखंडावरील बांधकाम नियमाधीन करण्यास मान्यता दिली. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत हद्दीअंतर्गत क्षेत्रवगळून उर्वरित ग्रामीण भागातील 31 डिसेंबर 2020 पूर्वी अस्तित्वात असलेले अनधिकृत भुखंड / अनाधिकृत भुखंडावरील बांधकाम नियमाधिन करण्यासाठी नगररचना विभाग (शाखा कार्यालय नांदेड) यांच्याकडे नोंदणीकृत परवानाधारक आर्किटेक्ट / इंजिनियर यांच्यामार्फत छाननी शुल्‍कासह प्रस्‍ताव दाखल करुन गुंठेवारीची सनद निर्गमित करण्यासाठी उपविभागीय अधिकारी नांदेड यांना प्राधिकृत करण्यात आलेले आहे. तरी नागरिकांनी दिलेल्या मुदतवाढीत ग्रामीण गुंठेवारीचे प्रस्ताव दाखल करावेत, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्राधिकृत अधिकारी (गुंठेवारी कक्ष) तथा उपविभागीय अधिकारी, नांदेड यांनी कळविले आहे.

00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...