Sunday, October 20, 2019

लेख -


मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

·         पुरुष मतदार 13 लाख 20 हजार 285, स्त्री मतदार 12 लाख 26 हजार 246, इतर 73
·         एकूण 25 लाख 46 हजार 604, 18 ते 19 वर्ष वयोगटातील 63 हजार 562  
नांदेड जिल्ह्यात एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ असून नुकत्याच झालेल्या मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रमानंतर जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघात एकूण 25 लाख 46 हजार 604 मतदार आहेत. यामध्ये 13 लाख 20 हजार 285 पुरुष आणि 12 लाख 26 हजार 246 स्त्री मतदार व इतर 73 मतदारांची संख्या आहे.
नांदेड उत्तर मतदार संघात सर्वाधिक 3 लाख 13 हजार 369 मतदार आहेत. त्याखालोखाल देगलूर (अ.जा) मतदारसंघात 2 लाख 91 हजार 690 मतदार आहेत. किनवट मतदारसंघातील मतदार संख्या सर्वात कमी 2 लाख 59 हजार 456 इतकी आहे. नांदेड उत्तर मतदारसंघात स्त्री मतदारांची संख्या सर्वाधिक 1 लाख 51 हजार 45 इतकी आहे. तर किनवट मतदारसंघात ती सर्वात कमी 1 लाख 25 हजार 844 इतकी आहे. जिल्ह्यातील विधानसभा मतदान केंद्रांची संख्या 2 हजार 955 इतकी आहे. यात देगलूर मतदारसंघात सर्वाधिक 346 मतदान केंद्र आहेत. नांदेड दक्षिण मतदारसंघात सर्वात कमी 307 मतदान केंद्र आहेत.   
मतदारसंघ
मतदान केंद्र संख्‍या
सहायकारी मतदान केंद्र
एकुण
मतदार
एकूण
18 ते 19 वर्ष वयोगट
पुरुष
स्‍त्री
इतर
83-किनवट
328
---
328
133605
125844
07
259456
6022
84-हदगाव
319
---
319
146149
133082
01
279232
6814
85-भोकर
324
---
324
143860
134905
06
278771
7352
86-नांदेड उत्‍तर
336
05
341
162279
151045
45
313369
7640
87-नांदेड दक्षिण
307
---
307
147319
137579
---
284898
6634
88-लोहा
312
02
314
141554
131858
05
273417
8089
89-नायगाव
342
---
342
146727
136460
02
283189
7236
90-देगलूर(अ.जा)
346
---
346
150602
141088
---
291690
6296
91-मुखेड
341
---
341
148190
134385
7
282582
7470
एकूण
2955
07
2962
1320285
1226246
73
2546604
63562
मतदान यंत्रे

प्रत्येकी एक मतदान केंद्रात
प्रत्येकी दोन मतदान केंद्रात
प्रत्येकी तीन मतदान केंद्रात
राखीव
बॅलेट युनिट
2962
341
614
789
कंट्रोल युनिट
2962
0
0
597
व्हीव्हीपॅट
2962
0
0
894
विविध उपक्रमातून जाणीवजागृती
मतदार संघात नांदेड स्वीप कक्षामार्फत विविध उपक्रमातून जाणीव जागृती करण्यात करण्यात आली. महिला, दिव्यांग मतदारांना विशेषत: उद्-बोधित करण्यात आले. नवरात्र उत्सवापासून विविध दुर्गा मंडळामध्ये स्वीपने मतदार जागृती केली. त्यानंतर कोजागिरी पोर्णिमानिमित्त महिलांना मतदारांना मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले. तसेच पथनाट्य, विविध शाळेतून चुनाव पाठशाला उपक्रम,रांगोळी, नाटिका, चित्रफिती फिरत्या वाहनातून गावखेड्यात आदिवासी भागात जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात नांदेड शहरातील पदयात्रेत नागरिक महिला, विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. या सर्व उपक्रमातून प्रशासनाने मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत.

-           श्रीमती मीरा ढास,
प्र. जिल्हा माहिती अधिकारी नांदेड
0000

वृत्‍त क्र.   384   देगलूर तहसील कार्यालयासमोरील वाहतूक वळण रस्यात बदल   नांदेड दि. 24 एप्रिल- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने...