Sunday, November 17, 2019

ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत शाळा आणि अंगणवाडी
यांच्या पायाभूत सुविधांचा सखोल, परिपूर्ण अभ्यास करण्यास सुरुवात करा
                                       - जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
         
नांदेड दि. 17 :- महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत  ग्रामपरिवर्तक काम करत असलेल्या  26 गावांमध्ये शाळा आणि अंगणवाडी यांच्या पायाभूत सुविधांचा बारकाईने अभ्यास करण्यासाठी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी लेट्स इंडॉर्स या सामाजिक संस्थेसोबत एक दिवसीय कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे घेतली.
        या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करीत गावस्तरावर काम करत असलेल्या ग्रामपरिवर्तकांना  लोकसहभागातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबाबत तसेच शाळा आणि अंगणवाड्यांचा पायाभूत गरजांचा अभ्यास करून त्यांना सर्वांगाने सक्षम करण्यासाठी मार्गदर्शन केले.
    
अभियानातील सहभागी असलेल्या गावांमध्ये सामाजिक उत्तरदायित्व कंपनी लेट्स इंडॉर्स यांच्या मार्फ़त डिजिटल साधने वापरून शाळा व अंगणवाडीच्या गरजांचा अभ्यास करून त्यांना आवश्यक ती मदत सामाजिक उत्तरदायित्वातुन मिळविण्यासाठी ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन व  जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी लागणारी सखोल व परिपूर्ण माहिती जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या ग्राम परिवर्तक यांनी संकलित करावी, असे या प्रशिक्षण कार्यशाळेत सांगितले.
     या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक वरून कश्यप लेट्स इंडॉर्स सामाजिक संस्था हे होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान नोडल अधिकारी श्री सुपेकर व श्री. मराठे यांनी केले.
00000

  वृत्‍त क्र.   36 6 एमएच-सीईटी परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश   नांदेड , दि.   19   : - एमएच-सीईटी परीक्षा-2024     ही 2...