Wednesday, May 27, 2020


कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घेत
प्रादेशिक परिवहन कार्यालयातील निवडक कामांना अनुमती 

नांदेड, (जिमाका), दि. 27 :- राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनातर्फे आवश्यक ती खबरदारी व कार्यवाही केली  जात आहे. याच बरोबर शासनस्तरावरील जनतेची असलेली कामे सुरुळीत सुरु व्हावीत. यासाठी शासनाने परिवहन कार्यालय सुरु करण्याबाबत निर्देश दिले आहेत. सद्यस्थितीत राज्याची जिल्हानिहाय रेडझोन व रेडझोन व्यतिरिक्त अशी विभागणी केली असून नांदेड येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात पुढील कामे होतील. मात्र शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्ती  या विषयक कामे होणार नाहीत.
यात नवीन वाहनांची नोंदणी, वाहन विषयक कामे जसे- वाहन हस्तांतरण, कर्ज बोजा चढविणे- उतरविणे इत्यादी, योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण, परवाना विषयक कामे, अनुज्ञप्ती विषयक इतर कामे जसे  दुय्यमीकरण, नुतनीकरण इत्यादी, अंमलबजावणी विषयक मो  ही कामे केली जातील. 
सदर कामे करतांना पुढील बाबींच्या पुर्ततेची खातरजमा झाल्यानंतरच कामे करण्याबाबत सूचित केले आहे.
1)     सर्व वाहनधारकांनी मोटार वाहन कर अनिवार्यपणे ऑनलाईन पद्धतीने भरणा करावयाचा आहे.
2)     रेड झोन वगळून इतर कार्यक्षेत्रामध्ये वाहन विषयक व कामांकरिता ऑनलाईन अपाइमेंट (स्लॉट) ची पध्दतीने अर्ज घेण्याबाबत सूचित केले आहे.
3)     त्यानुसार नमूद सूचित केलेले कामकाजाचे अर्ज हे ऑनलाईन अपाइमेंट (स्लॉट) ज्या दिनाकांस प्राप्त झाली आहे, त्याच दिवशी अर्जदाराचे अर्ज कार्यालयात स्विकारण्यात येणार आहेत. दोन व्यक्तीमध्ये किमान 6 फुटाचे अंतर ठेवण्यात यावे. एका व्यक्तीकडून एकच अर्ज स्विकारण्यात येणार आहे. प्राप्त झालेली कागदपत्रे ही निर्जतुकीकरण (सॅनिटाईज) केल्यानंतर व कमीतकमी हाताळण्याबाबत सूचित केले असल्यामुळे नमूद कामकाजासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयास प्राप्त झालेले अर्ज हे विहित कालमर्यादेमध्ये होणार असल्यामुळे अर्जदारांनी
4)   कार्यालयामध्ये गर्दी करु नये असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच याकरिता दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फुटांचे अंतर ठेवावे लागेल.
5)    एका व्यक्तींकडून एकच अर्ज स्विकारण्यात येईल.
6)     प्राप्त झालेली कागदपत्रे ही निर्जतुकीकरण (सॅनिटाईज) केल्यानंतरच व कमीत कमी हाताळण्याबाबत सुचित केलेले असल्यामुळे वरील कामकाजासाठी या कार्यालयास प्राप्त झालेले कागदपत्रे हे विहीत कालमर्यादेमध्ये होणार असल्यामुळे अर्जदारांनी कार्यालयामध्ये गर्दी करु नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
7)    कार्यालयामध्ये योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी येणाऱ्या वाहनांचे निर्जतुंकीकरण ( सॅनिटाईज) पूर्णत: वाहनमालकाच्या / धारकाच्या खर्चाने करुन वाहन योग्यता प्रमाणपत्राच्या नुतणीकरणासाठी सादर करावयाचे आहे.
8)    याबाबींच्या पुर्ततेची खात्री झाल्यानंतर कार्यालयातील कामे सुरु होणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
00000

शासकीय अध्यापक महाविद्यालयात
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या
 बी.एड.अभ्यासक्रमाचे ऑनलाईन अभ्यास सत्र सुरु
नांदेड (जिमाका) दि. 27 :- येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयातील अभ्यास केंद्रात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा बी.एड. अभ्यासक्रमासाठी प्रवेशित प्रशिक्षणार्थी शिक्षकांचे द्वितीय संपर्क सत्र ऑनलाईन पद्धतीने नुकतेच सुरु करण्यात आले असून या सत्राचे उद्घाटन ऑनलाईन झूम मिटींग ॲपद्वारे 26 मे रोजी पार पडले.
यावेळी प्राचार्या डॉ. सुनंदा रोडगे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले. समन्वयक डॉ. व्ही. जी. घोनशेटवाड यांनी 22 दिवसाच्या संपर्क सत्रातील अभ्यास कार्याचा परिचय करुन दिला. या कार्यक्रमात समंत्रक प्रा. डॉ. शेख हारुण, प्रा. डॉ. संजिवनी राठोड, प्रा. डॉ. मंजुषा भटकर, प्रवेशित सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक सहभागी झाले होते. दुपारी 12 वा. पासून नियोजित वेळापत्रकानुसार ऑनलाईन अध्यापन-अध्ययनाला चांगल्या पद्धतीने सुरुवात झाली. संपर्क सत्राच्या पहिल्याच दिवशी प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रतिक्रिया समाधानकारक आल्या असून नवीन पद्धतीने वर्ग हो असल्याने प्रशिक्षणार्थ्यांमध्ये वेगळी आवड व जिज्ञासा दिसून आली.  या संपर्क सत्राचा समारोप 14 जून 2020 रोजी होणार असून पुन्हा या प्रशिक्षणार्थ्यांच्या व समंत्रकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात येतील, असे प्राचार्या डॉ. सुनंदा रोडगे यांनी समारोपात नमूद केले आहे.
0000

कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर
प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामे घोषित
अर्जदारांनी कार्यालयात गर्दी करु नये
नांदेड, (जिमाका), दि. 27 :- कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घोषित केलेल्या विविध झोनमधील प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये करावयाच्या कामकाजाची यादी घोषित केली असून ही कामे करतांना नमूद बाबींच्या पुर्ततेची खात्री झाल्यानंतर कार्यालयातील कामे सुरु होणार असून अर्जदारांनी कार्यालयात गर्दी करु नये, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
राज्या कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत असून याबाबत निर्देश जारी करण्यात आले आहे. सद्य:स्थितीमध्ये राज्याची जिल्हानिहाय विभागणी रेड झोन रेड झोन व्यतिरिक्त अशी करण्यात आली आहे. परिवहन आयुक्त यांच्या आदेशानुसार परिवहन कार्यालय सुरु करण्याबाबत निर्देश प्राप्त झाले आहेत.
राज्य शासनाने घोषित केलेल्या विविध झोनमधील कार्यालयांमध्ये करावयाच्या कामकाजाची यादी पुढीलप्रमाणे दिली आहे. कंसाबाहेर काम तर (कंसात रेड झोन वगळून इतर क्षेत्रामधील कार्यालय) नवीन वाहनांची नोंदणी (होय), वाहन विषयक कामे जसे- वाहन हस्तांतरण, कर्ज बोजा चढविणे- उतरविणे इत्यादी (होय), योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण (होय), परवाना विषयक कामे (होय), शिकाऊ अनुज्ञप्ती (नाही), पक्की अनुज्ञप्ती (नाही), अनुज्ञप्ती विषयक इतर कामे जसे- दुय्यमीकरण, नुतनीकरण इत्यादी (होय), अंमलबजावणी विषयक मो. (होय). ही कामे करतांना पुढील बाबीच्या पुर्ततेची खात्री झाल्यानंतर कामे करण्याबाबत सूचित केले आहे.
सर्व वाहनधारकांनी मोटार वाहन कर अनिवार्यपणे ऑनलाईन पद्धतीने भरणा करावयाचा आहे. रेड झोन वगळून इतर कार्यक्षेत्रामध्ये वाहन विषयक कामांकरिता ऑनलाईन अपाइमेंट (स्लॉट) ची पध्दतीने अर्ज घेण्याबाबत सूचित केले आहे. त्यानुसार नमूद सूचित केलेले कामकाजाचे अर्ज हे ऑनलाईन अपाइमेंट (स्लॉट) ज्या दिनाकांस प्राप्त झाली आहे, त्याच दिवशी अर्जदाराचे अर्ज कार्यालयात स्विकारण्यात येणार आहेत. दोन व्यक्तीमध्ये किमान 6 फुटाचे अंतर ठेवण्यात यावे. एका व्यक्तीकडून एकच अर्ज स्विकारण्यात येणार आहे. प्राप्त झालेली कागदपत्रे ही निर्जतुकीकरण (सॅनिटाईज) केल्यानंतर कमीतकमी हाताळण्याबाबत सूचित केले असल्यामुळे नमूद कामकाजासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयास प्राप्त झालेले अर्ज हे विहित कालमर्यादेमध्ये होणार असल्यामुळे अर्जदारांनी कार्यालयामध्ये गर्दी करु नये असे आवाहन करण्यात येत आहे. कार्यालयामध्ये योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी येणाऱ्या वाहनाचे निर्जतुकीकरण (सॅनिटाईज) पुर्णत: वाहन मालकाच्या / धारकाच्या खर्चाने करुन वाहन योग्यता प्रमाणपत्राच्या नुतनीकरणासाठी सादर करावयाचे आहे. याबाबींच्या पुर्ततेची खात्री झाल्यानंतर कार्यालयातील कामे सुरु होणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
00000


दिलासादायक परिस्थिती : सात रुग्ण बरे तर कोरोनाचा नवीन रुग्ण नाही
आतापर्यंत 86 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी तर 44 रुग्णांवर औषधोपचार सुरु 
नांदेड (जिमाका) दि. 27 :-  कोरोना विषाणु संदर्भात बुधवार 27 मे 2020 रोजी सायंकाळी 5 वा. पुढीलप्रमाणे माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली आहे. आज प्राप्त झालेल्या एकूण 149 अहवालापैकी 144 निगेटीव्ह अहवाल प्राप्त झाले असून आज एकही नवीन रुग्ण पॉझीटीव्ह आढळला नाही. आजपर्यत नांदेड जिल्हयातील कोराना रुग्णांची एकूण संख्या 137 एवढी आहे.
बुधवार 27 मे रोजी एनआरआय भवन व यात्री निवास कोविड सेंटर येथील 7 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत 137 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 86 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे तर उर्वरीत 44 रुग्णांवर औषधोपचार सुरु असून त्यातील दोन महिला (वय-52 व 55 वर्षे )रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.  
बुधवार 27 मे  रोजी कोरोना संशयीत व कोविड रुग्णांची संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे. सर्वेक्षण- 1 लाख 36 हजार 132, घेतलेले स्वॅब 3 हजार 502, निगेटिव्ह स्वॅब 3 हजार 85, आज रोजी पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- निरंक, एकुण पॉझिटिव्ह रुग्ण 137, स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या 140, स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या 14, मृत्यू संख्या 7, रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या 86, रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण 44, स्वॅब तपासणी चालू रुग्ण संख्या 122 एवढी आहे.
काल मंगळवार 26 मे  रोजी पाठविण्यात आलेल्या 122 स्वॅब तपासणी अहवाल रात्री उशिरा पर्यंत प्राप्त होतील. तर बुधवार 27 मे  रोजी 42 रुग्णांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. त्यांचे अहवाल उद्या संध्याकाळीपर्यंत प्राप्त होतील.
एकुण 137 रुग्णांपैकी 7 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे व 86 रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. 44 रुग्णांपैकी 8 रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड. पंजाब भवन कोवीड केअर सेंटर, यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे 21 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे 5, ग्रामीण रुग्णालय भोकर येथे 1 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय बिलोली येथे 1 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय माहूर येथे 1 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय गोंकुदा येथे 1 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय उमरी येथे 4 रुग्ण असून 2 रुग्ण मुंबई येथे संदर्भित करण्यात आले आहे.  सर्व रुग्णांवर औषध उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्य:स्थितीत स्थिर आहे.
जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करण्यास मदत करते, असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
नांदेड जिल्हा : कोरोना विषाणू संसर्गाबाबत
बुधवार 27 मे रोजी सायं. 5 वाजेपर्यंतची आकडेवारी 
 आत्तापर्यंत एकूण संशयित  3 हजार 511,• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या-3 हजार 197,• क्वारंटाईन कालावधी पूर्ण  1 हजार 682,• अजून निरीक्षणाखाली असलेले  221,• पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 45• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले -3 हजार 152,•  आज घेतलेले नमुने  42,• एकुण नमुने तपासणी- 3 हजार 502,• एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 137,• पैकी निगेटीव्ह  3 हजार 85,• नमुने तपासणी अहवाल बाकी- 122,• नाकारण्यात आलेले नमुने  14,• अनिर्णित अहवाल – 140,• कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले  86,• कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 7,• जिल्ह्यात  बाहेरून आलेले एकूण प्रवासी 1 लाख 36 हजार 132 जणांना घरी राहण्याचा सल्ला दिलेला आहे तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत, अशी माहिती नांदेडचे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली आहे.
00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...