Saturday, August 22, 2020

तुमच्या आगमनाने सर्वांना सुख समाधान परत मिळू दे !

पालकमंत्री अशोक चव्हाण यांची गणेशाला प्रार्थना 

नांदेड (जिमाका), दि. 22 :-  सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड येथील निवासस्थानी सपत्नीक गणेशाची प्रतिष्ठापना केली. "हे गणपती बाप्पा, तुम्ही सुखकर्ता आहात, दुःखहर्ता आहात, विघ्नहर्ता आहात. यंदाचे तुमचे आगमन संपूर्ण जगावरील कोरोनाच्या महामारीचे निर्मूलन करणारे ठरो आणि तुमच्या भक्तजनांच्या आयुष्यातले हरवलेले सुख-समाधान परत आणणारे ठरो" या शब्दात पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सर्वांच्या आरोग्यदायी जीवनासाठी प्रार्थना केली.

0000

 

आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना

शिकाऊ उमेदवार भरतीबाबत गुगल फॉर्म भरणे आवश्यक

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- जिल्हयातील सर्व आयटीआय मधून परीक्षा सत्र जुलै 2017, जुलै 2018 , जुलै 2019 मध्ये उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांसाठी शिकाऊ उमेदवार म्हणून संधीबाबत Google Form भरण्याचे आवाहन प्राचार्य एम. बी. कुलकर्णी यांनी केले आहे. 

मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राद्वारे नांदेड औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्यावतीने औद्योगिक महामंडळ, पॅरामेडीकल सेक्टरमध्ये शिकाऊ उमेदवारांची भरती करण्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांनी पुढीलप्रमाणे Google Form भरण्यासाठी  लिंक देण्यात आली आहे. त्या लिंकवर प्रशिक्षणाथ्यांनी 27 ऑगस्ट 2020 पर्यंत स्वत: फॉर्म भरावा तो फॉर्म ऑनलाईन सादर करावा असेही आवाहन  प्राचार्य एम.बी. कुलकर्णी यांनी केले आहे. Link for Google form -https:/docs.google.com/forms/d/e/1FalpQLSegmDAM6YXO5ou1f_cRFIL4gyDBWM9Yj2pHQYWpz89tj5b6zQ/viewform?usp=sf_Link

00000

 

 

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी

जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या अतिरिक्त मार्गदर्शक सुचना

 

नांदेड (जिमाका), दि. 22 :- जिल्ह्यातील गणेशोत्सव सण साजरा होत असतांना या काळात लोकांनी अधिकाधिक स्वत:ची सुरक्षितता घेऊन कोरोनाच्या सार्वत्रिक प्रसाराला रोखण्यासाठी जबाबदारीने सर्व शासकीय नियमांचे पालन केले पाहिजे. याबाबत शासनाने वेळोवेळी सुचना व निर्देश असणारे आदेश निर्गमीत केले आहेत. दिनांक 8 ऑगस्ट अन्वये निर्गमीत करण्यात आलेल्या सुचनांमध्ये आता पुढील सुचना या समाविष्ट करण्यात येत आहेत. 

जिल्ह्यातील सर्व घरगुती व सार्वजनिक गणपतीचे विसर्जन हे शक्य तो स्थानिक स्वराज्य संस्थांनी जसे महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायत इत्यादींनी गणपती विसर्जनासाठी तयार केलेल्या कृत्रिम तलाव / हौदामध्ये विसर्जनासाठी आपापल्या गणेशमुर्ती या संकलन केंद्राकडे सुपुर्द / जमा कराव्यात. याचबरोबर सार्वजनिक गणेश मंडळांच्या ठिकाणी व मुर्ती संकलन केंद्राच्या ठिकाणी 50 वर्षावरील नागरिकांना व दहा वर्षाखालील मुलांना प्रवेश असणार नाही. कोविड-19 या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने व जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने वेळोवेळी निर्गमीत केलेले आदेश / निर्देश याचे पालन करणे बंधनकारक राहिल, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे.

00000

 

मोहरम साध्‍या पद्धतीने पाळण्याबाबत

गृह विभागाच्या मार्गदर्शक सुचना

 

नांदेड (जिमाका), दि. 22 :- कोव्हीड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करुन मोहरम साध्या पध्दतीने पाळण्याबाबत गृह विभागाने मार्गदर्शक सूचना निर्गमीत केल्या आहेत. या सुचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन शासनाने केले आहे. 

मातम मिरवणकू : केंद्र व राज्य शासनाकडून सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणूकीला परवानगी देता येणार नाही. खाजगी मातम देखील शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून घरीच करावेत. सोसायटीमधील नागरिकांनी देखील एकत्रित मातम / दुखवटा करु नये. वाझ / मजलीस हे कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करून ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात यावेत. ताजिया/ आलम काढण्यास परवानगी देता येणार नाही. ताजिया / आलम घरीच, घराशेजारी बसवून तेथेच शांत / विसर्जन करण्यात यावेत.  सबील / छबील बांधण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. त्या ठिकाणी दोन पेक्षा अधिक व्यक्तींनी उपस्थित राहू नये. या ठिकाणी बंद बाटलीनेच पाण्याचे वाटप करण्यात यावे. सबीलच्या ठिकाणी स्वच्छता राखावी व सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. कोणत्याही कार्यक्रमात चार पेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी नसल्याचे मार्गदर्शक सुचनांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. 

कोविड-19 च्या परिस्थितीचा विचार करता रक्तदान, प्लाज्मा, आरोग्य  शिबिरे असे उपक्रम राबविण्यात यावेत. या उपक्रमांमध्ये स्वच्छते विषयक जनजागृती करावी. याचबरोबर कोविड-19 या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष मोहरम सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, असेही गृह विभागाने दिलेल्या सुचनांमध्ये म्हटले आहे.

0000

दोनशे कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

122 बाधितांची भर तर नऊ जणांचा मृत्यू   

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- शनिवार22 ऑगस्ट 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 200 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 122 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 38 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 84 बाधित आले. 

आजच्या एकुण 787 अहवालापैकी  621 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 4 हजार 943 एवढी झाली असून यातील 3 हजार 47 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 632 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 118 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.  

शुक्रवार 21 ऑगस्ट 2020 रोजी जिल्ह्यातील बाधित मृत्त रुग्णांमध्ये संगमित्र कॉलनी नांदेड येथील 51 वर्षाचा एक पुरुष, असर्जन नांदेड येथील 90 वर्षाचा एक पुरुष, तामसा येथील 42 वर्षाची एक महिला, भावसार चौक नांदेड येथील 70 वर्षाचा एक पुरुष शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णपुरी नांदेड येथे तर माद्री कॉलनी नांदेड येथील 60 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. शनिवार 22 ऑगस्ट 2020 रोजी विसावानगर नांदेड येथील 68 वर्षाचा एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात तर छोटीगल्ली कंधार येथील 62 वर्षाचा एक पुरुष, लोहा येथील 33 वर्षाचा एक पुरुष, कंधार येथील 53 वर्षाचा एका पुरुषाचा शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5, नांदेड जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 1, बिलोली कोविड केअर सेंटर 4, मुखेड कोविड केअर सेंटर 5, हैदराबाद येथे संदर्भित 1, पंजाब भवन कोविड केअर सेंटर नांदेड 144, धर्माबाद कोविड केअर सेंटर  34, खाजगी रुग्णालय 4, नायगाव कोविड केअर सेंटर 2 असे एकुण 200 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.    

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 16, नांदेड ग्रामीण 2, हदगाव तालुक्यात 4, किनवट तालुक्यात 4, कंधार तालुक्यात 1, लोहा तालुक्यात 2, माहूर तालुक्यात 1, मुखेड तालुक्यात 3, मुदखेड तालुक्यात 1, नायगाव तालुक्यात 1, हिंगोली 2, निजामाबाद 1 असे एकुण 38 बाधित आढळले. 

 

तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 38, नांदेड ग्रामीण 2, अर्धापूर तालुक्यात 1, भोकर तालुक्यात 2, बिलोली तालुक्यात 1, हदगाव तालुक्यात 3, देगलूर तालुक्यात 1, कंधार तालुक्यात 5, माहूर तालुक्यात 4, मुदखेड तालुक्यात 2, धर्माबाद तालुक्यात 13, मुखेड तालुक्यात 12 असे एकुण 84 बाधित आढळले.  

जिल्ह्यात 1 हजार 632 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 187, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 749, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 46, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 39, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 34, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 109,  देगलूर कोविड केअर सेंटर येथे 44, लोहा कोविड केअर सेंटर येथे 43, हदगाव कोविड केअर सेंटर 37, भोकर कोविड केअर सेंटर 16,  कंधार कोविड केअर सेंटर येथे 15, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 81, किनवट कोविड केअर सेंटर येथे 21, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 7, मुदखेड कोविड केअर सेटर 24,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 9, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 22, बारड कोविड केअर सेंटर 3, उमरी कोविड केअर सेंटर 18, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 2, खाजगी रुग्णालयात 121 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 4, निजामाबाद येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

सर्वेक्षण- 1 लाख 50 हजार 984,

घेतलेले स्वॅब- 34 हजार 89,

निगेटिव्ह स्वॅब- 37 हजार 368,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 122,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 4 हजार 943,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-14,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 02,

एकूण मृत्यू संख्या- 177,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 3 हजार 47,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 632,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 80, 

आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 118.  

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

00000


  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...