Friday, January 15, 2021

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूका सुरळीत सांयकाळी 5-30 पर्यंत 75 ते 87 टक्क्यापर्यंत पोहचले मतदान !

 

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूका सुरळीत

सांयकाळी 5-30 पर्यंत 75 ते 87 टक्क्यापर्यंत पोहचले मतदान !  

 

नांदेड,दि.15(जिमाका): - जिल्ह्यात 16 तालुक्यातील एकूण 907 ग्रामपंचातीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान आज शांततेत पार पडले. हिमायतनगर तालुक्यात 75 टक्के तर मुदखेड तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 85 टक्के एवढे मतदान आज शांततेत पार पडले. तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. नांदेड -78.05 टक्के, अर्धापूर -83 टक्के, भोकर -83.57 टक्के , मुदखेड-85 टक्के, हदगाव 79 टक्के, हिमायतनगर -75 टक्के, माहूर -81.35 टक्के, धर्माबाद -83 टक्के , उमरी -84.21 टक्के, बिलोली - 82.46 टक्के , नायगाव -87 टक्के, देगलूर - 84 टक्के, मुखेड -80 टक्के, लोहा -80 टक्के, कंधार-81.37 टक्के एवढे मतदान झाले आहे. किनवट येथे दुपारी 3-30 पर्यंत 71.98 टक्के एवढे मतदान झाले होते.

 

00000

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात नांदेड जिल्ह्यात लसीकरणाच्या मोहिमेस होणार प्रारंभ

 

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात

नांदेड जिल्ह्यात लसीकरणाच्या मोहिमेस होणार प्रारंभ 

 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- ज्या लसीची सर्वस्तरातून प्रतिक्षेने वाट पाहिली जात होती त्या एैतिहासिक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ नांदेड जिल्ह्यात जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात दिनांक 16 जानेवारी, 2021 रोजी केला जात आहे. पहिल्या फेरीत शासनाच्या धोरणाप्रमाणे  जिल्ह्यातील सुमारे 17 हजार 99 हेल्थ वर्करना ही लस दिली जाणार आहे. यात 631 वैद्यकीय अधिकारी, 1 हजार 489 परिचारिका, 1 हजार 530 अशा वर्कर्स ,5 हजार 632 अंगणवाडी सेविका, 1 हजार 845 बहुउद्देशीय कर्मचारी, 2 हजार 957 फ्रंटलाईन वर्कर, 1 हजार 323 पॅरामेडिकल, 1 हजार 302 सहाय्यक कर्मचारी, 390 कार्यालयीन संबंधित कर्मचारी यांचा समावेश आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री या एैतिहासिक लसीकरणाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागाशी समन्वय साधून झुमद्वारे सहभागी होत आहेत.

0000

39 कोरोना बाधितांची भर तर एकाचा मृत्यू 34 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

 

39 कोरोना बाधितांची भर तर एकाचा मृत्यू  

34 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 15 :- शुक्रवार 15 जानेवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 34 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 27 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 12 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 34 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

 

आजच्या 674 अहवालापैकी 628 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 22 हजार 23 एवढी झाली असून यातील 20 हजार 887 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 356 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 12 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 579 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.    

 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 16,बिलोली तालुक्यातंर्गत 1,हैद्राबाद येथे संदर्भित 1, हदगाव कोविड रुग्णालय 2, मुखेड कोविड रुग्णालय 4, खाजगी रुग्णालय 5 असे एकूण 34 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.84 टक्के आहे.  

 

गुरुवार, दिनांक 14 जानेवारी, 2021 रोजी मुखेड तालुक्यातील राजूरा येथील 50 वय वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णूपुरी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 19, कंधार तालुक्यात 2, हिंगोली 3, नांदेड ग्रामीण 1, माहूर 1, परभणी 1 असे एकुण 27 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 8, मुखेड तालुक्यात 1, परभणी 1, बिलोली 1, उमरखेड 1, असे एकुण 12 बाधित आढळले.  

 

जिल्ह्यात 356 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 26, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 19, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 32, मुखेड कोविड रुग्णालय 8, हदगाव कोविड रुग्णालय 2, महसूल कोविड केअर सेंटर 28, किनवट कोविड रुग्णालय 2, देगलूर कोविड रुग्णालय 8, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 140, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 56, खाजगी रुग्णालय 35 आहेत.  

 

शुक्रवार 15 जानेवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 162, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 63 एवढी आहे.  

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 94 हजार 306

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 68 हजार 120

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 22 हजार 23

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 20 हजार 887

एकुण मृत्यू संख्या-579

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.84 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-2

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-2 

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-395

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-356

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-12.           

00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...