Friday, January 25, 2019

धर्माबाद येथे दिनांक 25 जानेवारी 2019 रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला.
धर्माबाद दि 25/01/2019 
राष्ट्रीय मतदार दिवसाच्या अनुषंगाने धर्माबाद शहरात जि.प हायस्कुल,हुतात्मा पानसरे हायस्कुल व केशव प्राथमीक विद्यालय आदी शाळेने सहभाग घेऊन प्रभातफेरी काढण्यात आली धर्माबाद तालुक्यातील प्रत्येक गावात मतदार जनजागृती प्रभातफेरी काढण्यात आली. येथील धर्माबाद तालुक्यातील मुख्य कार्यक्रमात मा.उपविभागीय अधिकारी धर्माबाद डॉ.सचिन खल्लाळ यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमात सर्वांना राष्ट्रीय मतदार दिनानिमीत्त मतदारासाठीची प्रतिज्ञा देण्यात आली.कार्यक्रमाच्या वेळी तहसिलदार धर्माबाद श्रीमती ज्योती चौहान,नगर पालिका मुख्याधिकारी मंगेश देवरे,मंडळ अधिकारी तालुक्यातील सर्व तलाठी ,सर्व मतदान केंद्र स्तरिय अधिकारी,आशा वर्कर,अंगनवाडी सेविका,दिव्यांग मतदार,शिक्षक,प्राध्यापक,तहसिल कार्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग,विद्यार्थी उपस्थित होते.  
धर्माबाद तालुक्यातील उत्कृष्ठ मतदान केंद्र स्तरिय अधिकारी(बिएलओ) एम आर पडगी, व्ही व्ही भंडारे,जी एल कौडेवार,एस व्ही चिलकेवार,एस के भोसले,बी के तोटावाड,बी ए जोगदंड़,एम पी गिरगावकर,के एम वाघमारे,बी एल पुलकंठवार, आदींना प्रमाणपत्र देण्यात आले. एस एस वाघमारे यांना उत्कृष्ठ बिएलओ व व्हिडीओ क्लिप तयार करुन व मतदार जनजागृती केल्याबदल प्रमाणपत्र देण्यात आले.वक्तृत्व स्पर्धेत निवड झालेले वैष्णवी अनिल आरगुलवार,मणिषा बाभळे,जजगेकर अल्का,निकीता रामराव येवले,सादीया खाजामियॉ शेख ,वैष्णवी प्रकाश पुय्यड,तृप्ती किशनराव हानमुळे,वैष्णवी दादाराव ताटे,रेणुका बालाजी जाधव,रांगोळी स्पर्धेत नांदगावकर विद्या गंगाधर,फुलारी दुर्गा दिलीप,टेकमवार दुर्गा दिलीप,पेकमवार गितांजली गणेशराव,खैरगावे अनुसया हाणमंत,नाईकवाड साक्षी बालाजी,हिवराळे अनुसया नरहारी आदि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.स्पर्धेत धर्माबाद येथील लाल बहादुर शास्त्री महाविद्यालय,हुतात्मा पानसरे हायस्कुल जिजामाता कन्या शाळा,गुरुकुल विद्यालय,तसेच कारेगाव येथील छत्रपती शिवाजी विद्यालय आदि शाळेतील विद्यार्थ्यानी सहभाग घेतला.  
निवडणूक विभागातील नायब तहसिलदार सुनिल माचेवाड,लिपीक मिलींद टोणपे,ऑपरेटर मोहन शेषेराव भंडरवाड यांना उत्कृष्ठ कार्याबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
                                               तहसिलदार धर्माबाद

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी
नांदेड, दि. 25 :- जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय,नांदेड येथे आझाद हिंद सेनेचे जनक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रकल्प अधिकारी श्री.अभिनव गोयल(IAS),जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, प्राताप सुर्यवंशी, संजय कर्वे,  के. एम. गाडेवाड व विदयार्थ्यी उपस्थित होते.
0000


संकटग्रस्त महिलांसाठी निवारा केंद्रातील
कामकाजासाठी अर्ज करण्याचे आवाहन
 नांदेड दि. 25 :- संकटग्रस्त महिलांसाठी निवारा केंद्राचे दैनंदिन कामकाज  हाताळण्यासाठी पात्रताधारक स्वयंसेवी संस्थेकडून प्रस्ताव मागविण्यात येत असून इच्छूकांना विहीत नमुन्यातील अर्ज गुरुवार 31 जानेवारी 2019 पर्यंत जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय गणेशकृपा शास्त्रीनगर (भाग्यनगर जवळ) नांदेड येथे उपलब्ध राहील, असे आवाहन जिल्हा महिला बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
नांदेड जिल्ह्यातील नमुद मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थांकडून 5 फेब्रुवारी 2019 अखेर अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्हा महिला बालविकास कार्यालयाचे प्रमाणित केलेल्या अर्जाच्या प्रतींचा निवड प्रक्रीयेदरम्यान विचारात घेतल्या जाणार आहेत.
केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून नांदेड जिल्ह्यासाठी संकटग्रस्त महिलांसाठी निवारा केंद्र मंजूर करण्यात आले आहे. हे केंद्र तात्पुरत्या स्वरुपात लाल बहादुर शास्त्रीनगर नांदेड येथे नारायण कामाजी गोरे यांची इमारत रविदास निवास येथे जिल्ह्यातील संकटग्रस्त महिलांना  वैद्यकीय सुविधा, पोलीस मदत, समुपदेशन व कायदेशिर मदत इत्यादी तातडीने उपलब्ध होईल यासाठी कार्यान्वीत करण्यात आले आहे.
या केंद्राचे दैनंदिन कामकाज प्रभावीपणे चालविण्यासाठी केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या संकटग्रस्त महिलांसाठी निवारा केंद्राच्या  मार्गदर्शक सुचनेप्रमाणे, पात्रताधारक एजन्सीची निवड करावयाची आहे. योजनेच्या मार्गदर्शक सुचनेमध्ये नमुद केल्यानुसार नांदेड जिल्ह्यातील महिलांविषयक कायदे व योजनांवर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराच्या विरोधात कार्यरत असणारी स्वयंसेवी संस्था, अशा स्वयंसेवी संस्थांमधून पात्रताधारक संस्थेची निवड करण्यात येणार आहे, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000


शासकीय तंत्रनिकेतन येथे
गुरुगोविं सिंघजी जयंती उत्साहात साजरी
नांदेड, दि. 25 :- येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे श्री गुरुगोविंद सिंघजी यांची 352 जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ज्ञानी विजेंद्रसिंघजी कथाकार गुरुद्वारा यांनी मुलांना श्री गुरु गोविंद सिंघजी यांच्या त्यागाची मानव धर्माच्या शिकवणीची जाणीव करुन दिली. महाराजांचे जीवन डोळयासमोर ठेवून आपल्या जीवनात चांगल्या गुणांचा अवलंब करावा. ंय धैर्य ठेवावे असे सांगत महाराजांचे जीवन संघर्षमय असतांना त्यांनी दाखवलेली एकाग्रता, संयम, विरता याची जाणीव सर्वांनी ठेवावी असे आवाहन केले.
संपुर्ण मानवतावादी विचारवंत असलेल्या श्री गुरुगोविंदस सिंघजी यांच्या विचारांची आजही संपुर्ण जगाला आवश्यकता असल्याचे सांगून त्यांच्या त्यागाची बलीदानाची जाणीव ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख परविंदर कौर कोल्हापुरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य डॉ. जी. व्ही. गर्जे हे होते.
            परविंदर कौर यांनी श्री गुरुगोविंद सिंघजी यांच्या कार्याचे महत्व विशद करतांना सद् गु विवेक हे गुण जीवनात किती उपयोगी आहेत हे सांगितले. श्री गुरुगोविंदसिंघजी यांनी सर्व धर्मातील लोकांना समानतेचे ज्ञान दिले. शस्त्राचा वापर हिंसेसाठी नसून, अहिंसेसाठी शांततेच्या मार्गाने करावयास सांगितला. शिस्त या शब्दाचा अर्थ शिकणे होय असे सांगितले.
अध्यक्ष समारोपात संस्थेचे प्राचार्य  डॉ. गर्जे यांनी  विविध धर्म गुरुनी आपल्याला मोलाची  शिकवण दिली आहे. ती आपण आचरनात आणली पाहिजे. कठिण परिस्थितीत गुरु गोविंदसिंघजी यांनी केलेले कार्य नक्कीच आपणा सर्वांना प्रेरणादायी आहे. एक योध्दा, तत्वज्ञ असलेल्या महाराजांनी शिख समाजाचे प्रतिधीत्व जगाच्या इतिहासात गाजवून टाकले. एक टक्का जरी श्री गुरु गोविंदसिंघजी यांचा आदर्श आपण स्विकारला तरी आपल्या जीवनाचे सार्थक होवू शकते असेही ते म्हणाले.
संपुर्ण मानवतावादी विचारवंत असलेल्या श्री गुरुगोविंदससिंघजी यांच्या 352 व्या जयंती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तेजिंद्रकौर तिवाना, पुनम कौर बासरीवाले, तेजिंद्र कौर दुकानदार, स. गुरुसिमरन सिंघ, स. गगनदिप सिंघ यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किरणज्योत कौर संघ, तरण ज्योत कौर, कुंजीवाले या विद्यार्थीनीने केले. यावेळी संस्थेतील. पी. डी. पोपळे, प्रा. एस. पी. कुलकर्णी, डॉ. एस. टी. कांबळे, प्रा. एल. टी. जाधव, प्रा. के. एस. कळसकर, डॉ. जी. एम. डक, डॉ. ए. ए. जोशी तसेच अधिकारी, कर्मचारी विद्यार्थी यांची उपस्थित मोठया प्रमाणावर होती.
00000


मंडप / पेंडॉल तपासणी पथक गठीत
तक्रारी असल्यास संपर्क साधावा
नांदेड दि. 25 :- मुंबई उच्च न्यायालय येथे उपस्थित जनहित याचिका क्र. 173 / 2010 संदर्भात सार्वजनिक सण, उत्सव, समारंभ याप्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडप / पेंडॉलच्या तपासणीच्या अनुषंगाने दिलेल्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्यातंर्गत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड हद्दीतील मंडप / पेंडॉल तपासणी करण्याबाबत पुढील प्रमाणे पथक / पथके गठित करण्यानत आलेले आहे. सदर तपासणी पथकाची माहिती खालीलप्रमाणे आहे.
.क्र.
तपासणी पथक सदस्‍याचे नाव
पदनाम
कार्यालयीन दुरध्‍वनी क्र.
मोबाईल क्रमांक
पथक क्र.01 क्षेत्रिय कार्यालय क्र.01(तरोडा सांगवी) कार्यक्षेत्र नांवाशमनपा क्षेत्रीय कार्यालय क्र.01 अंतर्गत संपूर्ण क्षेत्र
1
संजय जाधव
पथक प्रमुख सहा.आयुक्‍त नांवाशमनपा नांदेड
9011000939
2
पंडीत कच्‍छवे
पो.नि.पो.स्‍टे.विमानतळ नांदेड
02462– 221100
9011320100
3
अनिरुध्‍द काकडे
पो.नि.पो.स्‍टे.भाग्‍यनगर नांदेड
02462 -261364
9923131121
4
नितीन तोरणेकर
प्र.कार्यालय अधिक्षक
8888801952
5
.सुनिल कोटगीरे
वसुली पर्यवेक्षक
9890084332
6
बळीराम बी.एंगडे
वसुली पर्यवेक्षक
8605586531
7
.साहेबराव ढगे
लिपीक
8888801975
पथक क्र. 2 क्षेत्रिय कार्यालय क्र. 2 अशोक नगर कार्यक्षेत्र नांवाशमनपा क्षेत्रीय कार्यालय क्र.02 अंतर्गत संपूर्ण क्षेत्र
1
सुधीर इंगोले
पथक प्रमुख सहा.आयुक्‍त नांवाशमनपा नांदेड
9011001017
2
अनिरुध्‍द काकडे
पो.नि.पो.स्‍टे.भाग्‍यनगर नांदेड
02462 -261364
9923131121
3
पंडीत कच्‍छवे
पो.नि.पो.स्‍टे.विमानतळ नांदेड
02462– 221100
9011320100
4
संभाजी एम.कास्‍टेवाड
प्र.कार्यालय अधिक्षक
02462-247077
9421757463
5
मल्‍हार मोरे
वसुली पर्यवेक्षक
02462-247077
9822982699
6
रतन एम.रोडे
प्र.स्‍व.निरीक्षक
02462-247077
8888801917
7
अ.नईम अ.गफुर
प्र.स्‍व.निरीक्षक
02462-247077

8
रणजित नारायण पाटील.
लिपी, नांवाशमनापा नांदेड
02462-247077

पथक क्र. 3 क्षेत्रिय कार्यालय क्र. 3 शिवाजी नगर कार्यक्षेत्र नांवाशमनपा क्षेत्रीय कार्यालय क्र. 3 अंतर्गत संपूर्ण क्षेत्र
1
शिवाजी डहाळे
पथक प्रमुख सहा.आयुक्‍त नांवाशमनपा नांदेड

9011027190
2
मछिंद्र सुर्वसे
पो.नि.पो.स्‍टे.शिवाजी नगर नांदेड
02462 -256520
9823721305
3
अनिरुध्‍द काकडे
पो.नि.पो.स्‍टे.भाग्‍यनगर नांदेड
02462 -261364
9923131121
4
वामन भानेगावकर
प्रभारी कार्यालय अधिक्षक

7620568868
5
परसराम गाढे पाटील
वसुली पर्यवेक्षक नांवाशमनपा नांदेड

8888801918
6
ज्ञानचंद्र चामे
वसुली पर्यवेक्षक नांवाशमनपा नांदेड

8888801930
7
सुरेश पी.पाशमवाड
स्‍वच्‍छता निरीक्षक

9011000974
8
जीलानी पाशा
स्‍वच्‍छता निरीक्षक

9011000971
पथक क्र.04 क्षेत्रिय कार्यालय क्र.04 वजिराबाद कार्यक्षेत्र नांवाशमनपा क्षेत्रीय कार्यालय क्र.04 अंतर्गत संपूर्ण क्षेत्र
1
अविनाश अटकोरे
पथक प्रमुख सहा.आयुक्‍त नांवाशमनपा नांदेड

9011000940
2
एस.एस.शिवाळे
पो.नि.पो.स्‍टे.वजिराबाद
02462 -236500
9821692261
3
एस.डी.नरवाडे
पो.नि.पो.स्‍टे.इतवारा नांदेड
(02462)236510
9561045306
4
राजेंद्र देशपांडे
प्र.कार्यालय अधिक्षक

9822292862
5
संभाजी पाशमवाड
वसुली पर्यवेक्षक


6
अजहर अली जुल्‍फेकार अली
वसुली पर्यवेक्षक

8888801988
7
वसीम तडवी
स्‍वच्‍छता निरीक्षक नांवाशमनपा

8888847122
8
अन्‍सारी अतिक अहेमद
स्‍वच्‍छता निरीक्षक नांवाशमनपा

9011000973
9
.संजय जगदकर
स्‍वच्‍छता निरीक्षक नांवाशमनपा

8380046629
पथक क्र. 5 क्षेत्रिय कार्यालय क्र. 5 इतवारा कार्यक्षेत्र नांवाशमनपा क्षेत्रीय कार्यालय क्र. 5 अंतर्गत संपूर्ण क्षेत्र
1
मीर्झा फरहतउल्‍ला बेग
पथक प्रमुख सहा.आयुक्‍त नांवाशमनपा नांदेड

9011000950
2
एस.डी.नरवाडे
पो.नि.पो.स्‍टे.इतवारा नांदेड
(02462)236510
9561045306
3
चिखलीकर डी.जी.
पो.नि.पो.स्‍टे.नांदेड (ग्रा)
(02462)226373
9822458411
4
अब्‍दुल हबीब अ.रशीद
प्र.कर निरीक्षक नांवाशमनपा नांदेड

8888801998
5
जी.जी.तोटावाड
प्र.कर निरीक्षक नांवाशमनपा नांदेड

9921986989
6
सय्यद जाफर
प्र.स्‍वच्‍छता निरीक्षक नांवाशमनपा

8380046631
7
दयानंद कवले
स्‍वच्‍छता निरीक्षक नांवाशमनपा

9011000975
पथक क्र. 6 क्षेत्रिय कार्यालय क्र. 6 सिडको कार्यक्षेत्र नांवाशमनपा क्षेत्रीय कार्यालय क्र. 6 अंतर्गत संपूर्ण क्षेत्र
1
पंडीत जाधव  
पथक प्रमुख सहा.आयुक्‍त नांवाशमनपा नांदेड

8888801932
2
चिखलीकर डी.जी.
पो.नि.पो.स्‍टे.नांदेड (ग्रा)
(02462)226373
9822458411
3
भालचंद्र चामे
वसुली पर्यवेक्षक नांवाशमनपा नांदेड

8888847095
4
हिराचंद भूरेवार
वसुली पर्यवेक्षक

9960127610
5
आनंद कांबळे
वसुली पर्यवेक्षक नांवाशमनपा नांदेड

9834891153
6
किशन वाघमारे
प्र.स्‍व.निरीक्षक

8888801992
नागरीकांनी सार्वजनिक सण, उत्‍सव, समारंभ याप्रसंगी उभारण्‍यात येणा-या मंडप / पेंडॉलच्‍या संदर्भात कोणतीही तक्रार असल्‍यास  विवरणपत्रामधील नमूद तपासणी पथक सदस्‍याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000

  वृत्त क्र.   389   लोकसभा निवडणुकीसाठी आज नांदेड जिल् ‍ ह्यात मतदान   प्रशासन सज् ‍ ज ; मोठ्या संख् ‍ येने मतदान करण् ‍ याचे ...