Friday, January 25, 2019


शासकीय तंत्रनिकेतन येथे
गुरुगोविं सिंघजी जयंती उत्साहात साजरी
नांदेड, दि. 25 :- येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे श्री गुरुगोविंद सिंघजी यांची 352 जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ज्ञानी विजेंद्रसिंघजी कथाकार गुरुद्वारा यांनी मुलांना श्री गुरु गोविंद सिंघजी यांच्या त्यागाची मानव धर्माच्या शिकवणीची जाणीव करुन दिली. महाराजांचे जीवन डोळयासमोर ठेवून आपल्या जीवनात चांगल्या गुणांचा अवलंब करावा. ंय धैर्य ठेवावे असे सांगत महाराजांचे जीवन संघर्षमय असतांना त्यांनी दाखवलेली एकाग्रता, संयम, विरता याची जाणीव सर्वांनी ठेवावी असे आवाहन केले.
संपुर्ण मानवतावादी विचारवंत असलेल्या श्री गुरुगोविंदस सिंघजी यांच्या विचारांची आजही संपुर्ण जगाला आवश्यकता असल्याचे सांगून त्यांच्या त्यागाची बलीदानाची जाणीव ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख परविंदर कौर कोल्हापुरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य डॉ. जी. व्ही. गर्जे हे होते.
            परविंदर कौर यांनी श्री गुरुगोविंद सिंघजी यांच्या कार्याचे महत्व विशद करतांना सद् गु विवेक हे गुण जीवनात किती उपयोगी आहेत हे सांगितले. श्री गुरुगोविंदसिंघजी यांनी सर्व धर्मातील लोकांना समानतेचे ज्ञान दिले. शस्त्राचा वापर हिंसेसाठी नसून, अहिंसेसाठी शांततेच्या मार्गाने करावयास सांगितला. शिस्त या शब्दाचा अर्थ शिकणे होय असे सांगितले.
अध्यक्ष समारोपात संस्थेचे प्राचार्य  डॉ. गर्जे यांनी  विविध धर्म गुरुनी आपल्याला मोलाची  शिकवण दिली आहे. ती आपण आचरनात आणली पाहिजे. कठिण परिस्थितीत गुरु गोविंदसिंघजी यांनी केलेले कार्य नक्कीच आपणा सर्वांना प्रेरणादायी आहे. एक योध्दा, तत्वज्ञ असलेल्या महाराजांनी शिख समाजाचे प्रतिधीत्व जगाच्या इतिहासात गाजवून टाकले. एक टक्का जरी श्री गुरु गोविंदसिंघजी यांचा आदर्श आपण स्विकारला तरी आपल्या जीवनाचे सार्थक होवू शकते असेही ते म्हणाले.
संपुर्ण मानवतावादी विचारवंत असलेल्या श्री गुरुगोविंदससिंघजी यांच्या 352 व्या जयंती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तेजिंद्रकौर तिवाना, पुनम कौर बासरीवाले, तेजिंद्र कौर दुकानदार, स. गुरुसिमरन सिंघ, स. गगनदिप सिंघ यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किरणज्योत कौर संघ, तरण ज्योत कौर, कुंजीवाले या विद्यार्थीनीने केले. यावेळी संस्थेतील. पी. डी. पोपळे, प्रा. एस. पी. कुलकर्णी, डॉ. एस. टी. कांबळे, प्रा. एल. टी. जाधव, प्रा. के. एस. कळसकर, डॉ. जी. एम. डक, डॉ. ए. ए. जोशी तसेच अधिकारी, कर्मचारी विद्यार्थी यांची उपस्थित मोठया प्रमाणावर होती.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 409   वादळी वारे वाहण्याची ,   विजेच्या कडकडाटासह , ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता   नांदेड दि.  6  मे :-   प्रादेशिक ...