Sunday, December 10, 2023

वृत्त क्र. 849

सहा जोडप्यांनी लोकन्यायालयाच्या माध्यमातून एकत्र नांदण्याचा घेतला निर्णय

 

·         विविध प्रकरणांत  15 कोटी 6 लाख 38 हजार 336 रुपये रक्कमेबाबत तडजोड

·         नांदेड जिल्ह्यात एकुण 5 हजार 704 प्रकरणे सामोपचाराने निकाली

·         ग्रामपंचायत अंतर्गत घरकुलची 868 प्रकरणे तडजोडीने निकाली 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर यांच्या उपस्थितीत नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार 9 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकुण 31 प्रकरणातील 6 जोडप्यांनी एकत्र नांदण्याचा निर्णय घेत आपआपसातील तडजोड व सामंजस्याचे महत्त्व अधोरेखीत केले. 6 व्यतिरिक्त अन्य प्रकरणे आपसात तडजोडीने मिटविण्यात आली. या जोडप्यांना आपली प्रकरणे तडजोडीने मिटवून घेण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी केले होते. ही लोकअदालत यशस्वी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश, पॅनलवरील न्यायाधीश, पॅनल सदस्य व सर्व विधिज्ञ यांनी जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले. नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय नांदेड येथे या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. 

एकुण 5 हजार 704 प्रकरणे सामोपचाराने निकाली

नांदेड जिल्ह्यात एकुण 5 हजार 704 प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाली. यात 15 कोटी 6 लाख 38 हजार 336 रुपये एवढ्या रक्कमेची विविध प्रकरणात तडजोड झाली. यामध्ये दिवाणी, फौजदारी, एन.आय.ॲक्ट, बॅक प्रकरणे, मोटार वाहन अपघात, भूसंपादन, ग्रामपंचायतीचे घरपट्टी, पाणीपट्टीचे प्रकरणे व इतर तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व सहकार न्यायालय यांच्या प्रलंबित प्रकरणांचा व नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, पंचायत समिती व ग्रामपंचायतींचे वसुली प्रकरणे, विविध बँकांचा, तसेच विद्युत प्रकरणे, दुरसंचार विभागाची टेलिफोन, मोबाईल यांचे दाखलपूर्व प्रकरणांचा यात समावेश होता. याचबरोबर पाच दिवस घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत 999 प्रकरणे निकाली काढण्यात आले आहे. 

या लोकअदालतीच्या निमित्ताने स्टेट बँक ऑफ इंडिया नांदेड विभागीय अधिकारी श्री. कालिदास व श्री. जगताप यांनी त्यांच्या विभागातर्फे नांदेड जिल्हा न्यायालयाच्या ठिकाणी भव्य पेंडालची व्यवस्था केली. याचबरोबर लोकअदालतीसाठी जमलेल्या सर्व पक्षकारांसाठी खिचडी वाटपाची सेवा देऊन सहकार्य केले. या लोकअदालतीच्या निमित्ताने जिल्हा सरकारी वकिल तसेच जिल्ह्यातील सर्व विधिज्ञ आणि भूसंपादन अधिकारी, नांदेड मनपा आयुक्त, महसूल विभाग अधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड व प्रबंध जिल्हा न्यायालय नांदेड, सर्व न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे मोलोच सहकार्य लाभले. 

या लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढून लोकअदालत यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर, नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज, नांदेड मुख्यालयातील व तालुकास्तरावरील सर्व जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश यांनी विशेष प्रयत्न केले.   

सर्व पक्षकार, सर्व न्यायाधीश, विधीज्ञ, न्यायालयीन कर्मचारी यांनी परीश्रम घेतले. ही लोकअदालत यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज यांनी मानले व यापुढेही अशाच सहकार्याची आपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

ग्रामपंचायत अंतर्गत घरकुलची 868 प्रकरणे तडजोडीने निकाली

जिल्ह्यातील एकूण 1 हजार 310 ग्रामपंचायत मार्फत मालमत्ता करवसुली बाबत प्रलंबित असलेली 6 हजार 801 प्रकरणे लोकन्यायालयात दाखल करण्यात आली होती. यात तडजोडअंती 38 लाख 88 हजार 886 एवढी रक्कम वसूल करण्यात आली.  याचबरोबर केंद्र व राज्यामार्फत घरकुलाचा पहिला हप्ता मिळून घरकुल बांधकाम सुरू न केलेली 9 हजार 975 प्रकरणे ग्रामपचायतीतर्फे या लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी तडजोडीअंती 868 प्रकरणे निकाली काढण्यात आली. 

यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी पुढाकार घेऊन सर्व ग्रामपंचायतीची प्रकरणे तडजोडीने निकाली निघण्यासाठी लोकन्यायालयात दाखल करण्याचे निर्देश दिले होते. जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) श्रीमती मंजुषा कापसे यांनी समन्वय साधून ग्रामपंचायतींची जास्तीत जास्त प्रकरणे लोकन्यायालयापुढे ठेवली. जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज यांनी याचे काटेकोर नियोजन केले. नांदेड पंचायत समिती मार्फत एकूण 12 लाख 10 हजार 901 रुपयाची एवढी करवसुली यातून केली. 

ग्रामपंचायत ही एक स्थानिक स्वराज संस्था आसुन तिचा रोजचा व्यवहार चालवण्याकरिता ती संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असावयास हवी त्यावर मालमत्ता कर व पाणीपट्टी कर वसुलीसाठी ग्रामपंचायतींना राष्ट्रीय लोकअदालतीचे मोलाचे सहकार्य होत आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) श्रीमती मंजुषा जाधव (कापसे) यांनी दिली.

0000





 पनवेल महानगरपालिका पदाच्या विविध पदासाठी परीक्षा संपन्न

परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार नाही 

नांदेड, (जिमाका) दि. 10 :- पनवेल महानगरपालिका आस्थापनेवरील गट अ ते ड मधील एकूण 41 संवर्गातील 377 पदांसाठी राज्यातील विविध जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर एकुण 55 हजार 214 एवढे उमेदवार परीक्षा देत आहेत. ही परीक्षा टि.सी.एस कंपनी मार्फत घेण्यात येत आहे. 

आज 8 डिसेंबर 2023 रोजी नांदेड जिल्‍हयातील आयऑन डिजीटल झोन आयडीझेड विष्णुपुरी व संभाजी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट आणि टेक्नालॉजी नांदेड  या परीक्षा केंद्रावर एकूण दोन/तीन सत्रांमध्ये परीक्षा आयोजित करण्यात आली होती.  पहिले सत्र सकाळी 9 ते 11, दूसरे सत्र  दुपारी 1 ते 3 व तिसरे सत्र सायं. 5 ते 7 अशा स्वरुपात ही परीक्षा पार पडली. या परीक्षेमध्ये एकुण 1 हजार 181 एवढ्या उमेदवारांनी सहभाग घेतला होता. 

परीक्षा केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक अधिकारी, एक लिपिक व एक शिपाई नियुक्त करण्यात आले होते. परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी या केंद्रावर दोन पुरुष कॉन्स्टेबल व दोन महिला कॉन्स्टेबल असे एकूण ४ पोलीस कर्मचारी नेमण्यात आले होते. 

परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी कोणत्याही इलेक्ट्रॉनिक डिवाईसचा तसेच मोबाईलचा वापर करु नये याबाबत योग्य ती दक्षता घेणेसाठी, शासन मान्यताप्राप्त मे. ई. सी. आय. एल. (ECIL) या कंपनीची प्रत्येक परीक्षा केंद्रावर जॅमर बसविण्यात आलेले होते. या परीक्षेसाठी पनवेल महानगरपालिका प्रशासनाने नियुक्त केलेल्या अधिकारी/ कर्मचारी यांनी मेहनत घेतली असुन त्यास पोलीस प्रशासनाचे सहकार्य लाभले आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नसून परीक्षा निर्विघ्नपणे पार पडली आहे असे नगर परिषद प्रशासन विभागाचे जिल्हा समन्वयक तथा जिल्हा सह आयुक्त गंगाधर इरलोड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 वृत्त क्र. 848

 

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून

वंचित घटकांनी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- केंद्र शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजनांचा लाभ वंचित घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. यात शिक्षणापासून ते आरोग्यापर्यतस्वयंरोजगारापासून  कृषी पर्यत विविध योजनाचा समावेश आहे. 

 

11 डिसेंबर रोजी या गावात विकसित भारत संकल्प यात्रा

विकसित भारत संकल्प यात्रा उद्या 11 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील लोणी खु.नांदेड तालुक्यातील नाळेश्वरराहाटीभोकर तालुक्यातील धानोरानारवटबिलोली तालुक्यातील अटकळीहुनगुंदादेगलूर तालुक्यातील तुंबरपल्लीशिळवणी तर कंधार तालुक्यातील गोगदरीचिंचोली व किनवट तालुक्यातील मारेगाव बु. मोहपूरलोहा तालुक्यातील हळदवमाहूर तालुक्यातील तुळशीलसनवाडीमुखेड तालुक्यातील अंबुलगालोणाळनायगाव तालुक्यातील अंचोलीनरंगल तर उमरी तालुक्यातील चिंचाळा येथे जाईल. या यात्रेसमवेत पंचायत समिती अंतर्गत अधिकारी-कर्मचारी असतील.

 

या मोहीमेत आरोग्य, कृषी, आवास, आयुष्यमान भारत, पीएम गरीब कल्याण अन्न योजना, पीएम विश्वकर्मा, जन धन योजना, अटल पेन्शन योजना, बीमा योजना, पीएम पोषण अभियान, दिनदयाल अंत्योदय योजना आदीचा समावेश आहे. तसेच आदीवासी विभागासाठी विशेष योजना, स्कॉलरशिप योजना, वंदन योजना, उज्वला योजना, उजाला योजना अशा विविध विभागाच्या योजनाचा यात समावेश असणार आहे. या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान विविध योजनाचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

नांदेड जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ 15 नोव्हेंबर रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते किनवट येथे झाला. 15 जानेवारी 2024 पर्यत नांदेड जिल्ह्यातील अनेक गावामध्ये ही यात्रा पोहोचणार आहे. या यात्रेचे आगमन 10 डिसेंबर 2023 रोजी कंधार तालुक्यातील गुट्टेवाडीकालकाकिनवट तालुक्यातील दुंड्रारामपूरलोहा तालुक्यातील देऊळगावमुखेड तालुक्यातील लिंगापूर या गावात झाले आहे.  या यात्रेदरम्यान विविध योजनामध्ये लाभार्थ्याचे फॉर्मअर्ज भरुन घेण्यात आले आहे. तसेच मान्यवरांच्या हस्ते आयुष्यमान कार्डचे वितरण करण्यात आले.

0000



  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...