Monday, January 17, 2022

 लोकशाही बळकट करण्यासाठी

मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :-  जिल्ह्यातील नायगावअर्धापूर व माहूर नगरपंचायतीच्या एकूण 11 जागांसाठी 18 जानेवारी 2022 रोजी मतदान होणार आहे. या मतदानासाठी  9 हजार 832 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेतसर्व मतदारानी लोकशाही बळकट करण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

नगरपंचायत अर्धापूरनायगाव व माहूर या नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीची मतमोजणी 19 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजता संबंधित तहसिल कार्यालयात होणार आहेमतमोजणीच्या ठिकाणी कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच कोव्हिड 19 च्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने शासनाकडील मार्गदर्शक सूचना व आदेशाचे पालन करण्यासाठी मतमोजणीनंतर राजकीय पक्षांनीलोकप्रतिनिधी व उमेदवार व इतर कोणत्याही व्यक्तींना मिरवणूका रॅली इचे आयोजन करता येणार नाहीतरी सर्व नागरिकांनी कोव्हिड अनुरूप व्यवहार करून प्रशासनास सहकार्य करावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

0000

 नारीशक्ती पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका)दि. 17:-  महिला  व बाल विकास विभागातर्गत व्यक्ती व संस्थांना नारी शक्ती पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी पात्र संस्था अथवा व्यक्ती अशा अर्जदारांनी अर्ज, नामनिर्देशन योग्य त्या कागदपत्रांसह ऑनलाईन www.awards.gov.in या वेबसाईटवर 31 जानेवारी 2022 पर्यत भरावेत. पात्र व इच्छूकांनी केंद्र शासनाच्या नारीशक्ती या पुरस्कारासाठी मार्गदर्शन सूचनेनुसार आवेदन व अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. अब्दुल रशिद शेख यांनी केले आहे.

0000

 नांदेड जिल्ह्यात 420 व्यक्ती कोरोना बाधित

तर 201 कोरोना बाधित झाले बरे

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 253 अहवालापैकी 420 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 385 तर अँटिजेन तपासणीद्वारे 35 अहवाल बाधित आले आहेत.  जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 94 हजार 205 एवढी झाली असून यातील 88 हजार 584 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 2 हजार 966  रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 276, नांदेड ग्रामीण 41, भोकर 2, देगलूर 4, धर्माबाद 6, हिमायतनगर 1, कंधार 2, किनवट 22, लोहा 2, मुदखेड 2, मुखेड 5, नायगाव 1, उमरी 2, बिलोली 2, अर्धापूर 3, परभणी 2, उदगीर 4, हैदराबाद 1, यवतमाळ 1, वर्धा 1, जयपूर 1, हिंगोली 3, मुंबई 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 20, नांदेड ग्रामीण 2, देगलूर 6, धर्माबाद 7 असे एकूण 420 कोरोना बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 164, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 3, खाजगी रुग्णालय 6, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 26 कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली.  

 

आज 2 हजार 966 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 29, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 7, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 601, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 2 हजार 309,  खाजगी रुग्णालय 17, हदगाव कोविड रुग्णालय 1, बिलोली कोविड रुग्णालय 2 अशा एकुण 2 हजार 966 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 19 हजार 817

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 11 हजार 273

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 94 हजार 205

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 584

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.3 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-22

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-111

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-2 हजार 966

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3

 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. “मिशन कवच कुंडल” अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...