Thursday, May 12, 2022

 एक कोरोना बाधित तर एकाला सुट्टी   

नांदेड (जिमाका) दि. 12 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 135 अहवालापैकी 1 अहवाल पॉझिटिव्ह आढळला. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 808 एवढी झाली असून यातील 1 लाख 113 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे.  

 

आरटीपीसीआर आज तपासणीद्वारे माहूर तालुक्यात 1 बाधित आढळला. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणातील एका बाधिताला बरे झाल्याने आज सुट्टी देण्यात आली. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात 1शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 1नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरणात 1 असे एकुण 3 बाधित उपचार घेत आहेत.  

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

 

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 1 हजार 472

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 81 हजार 434

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 808

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 113

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.37 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-3

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-1

000000

 प्रधानमंत्री कुसूम घटक- योजनेअंतर्गत

लाभार्थी हिस्सा भरण्यासाठीची मुदतवाढ 

नांदेड दि. 12, (जिमाका) :- राज्यातील लाभार्थी शेतक-यांस -पोर्टलवर अर्ज करण्यासलाभार्थी हिस्सा भरण्यास  इतर अंमलबजावणी संदर्भात अडी-अडचणी असल्यास महाऊर्जाच्या खालील दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत सकाळी 9:45 ते सायंकाळी 6:15 वापर्यंत संपर्क साधावा.  तसेच योजनेअंतर्गत लाभार्थी हिस्सा भरण्यासाठीची सुधारित अंतिम मुदत दि. 31 मे, 2022 पर्यंत वाढविण्यात येत आहे.  तरी लाभार्थ्यांने दि. 31 मे, 2022 पर्यंत लाभार्थी हिस्सा जमा करावा.

राज्यातील महाकृषी अभियानाअंतर्गत प्रधानमंत्री कुसूम घटक- योजनेअंतर्गत सौर कृषी पंप आस्थापित करण्यासाठी महाऊर्जाच्या -पोर्टलवर प्राप्त झालेल्या अर्जदारांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी एस.एम.एसव्दारे कळविण्यात आलेले आहेत्यानुसार लाभार्थी शेतक-यांनी ऑनलाईन / धनाकर्षाव्दारे लाभार्थी हिस्सा भरावयाचा असल्यास -पोर्टलवर धनाकर्षाची (डिमांड ड्राफ्टप्रत अपलोड करुन नजीकच्या महाऊर्जाच्या कार्यालयास भेट देऊन जमा करावा

तसेच असेही निदर्शनास आले आहे कीजिल्ह्यातील सौर कृषी पंपाचा सर्वसाधारण लाभार्थी कोटा संपल्यानंतर काही सर्वसाधारण गटातील शेतकरी अनुसूचित जाती / अनुसूचित जमातीच्या घटकांमधून चुकीचे जातीचे प्रमाणपत्र -पोर्टलवर अपलोड करुन अर्ज सादर करीत आहेत.   संबंधित अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर संबंधित लाभार्थी अनुसूचित जाती / अनुसूचित जमातीच्या घटकामधील नसून सर्वसाधारण लाभार्थी म्हणून लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी महाऊर्जाच्या संबंधित विभागीय कार्यालयांमध्ये भेट देऊन अर्ज स्विकारण्यासाठी तगाता लावत आहेत.

तेव्हा सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांनीअनुसूचित जाती / अनुसूचित जमातीच्या घटकांचा लाभार्थी म्हणून सौर कृषी पंपाची -पोर्टलवर चुकीचे जातीचे प्रमाणपत्र अपलोड करुन नोंद केल्यास त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईलयाची कृपया नोंद घ्यावी.

पीएम-कुसुम योजनेअंतर्गत 50000 सौर कृषिपंप आस्थापित करण्याचे सद्य:स्थितीत उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून अहमदनगरऔरंगाबादबीडबुलढाणाधुळेहिंगोलीजळगांवजालनालातूरनंदुरबारनाशिकउस्मानाबादनांदेडपरभणीपुणेसोलापूरवाशिम  यवतमाळ जिल्ह्यातील उपरोक्त उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.  तसेच अकोलाअमरावतीभंडाराचंद्रपूरगडचिरोलीगोंदियाकोल्हापूरनागपूरपालघररायगडरत्नागिरीसांगलीसातारासिंधुदुर्गठाणे  वर्धा या जिल्ह्यांमध्ये सौर कृषिपंप उपलब्ध असून लाभार्थ्यांनी खालील संकेतस्थळावर नोंदणी करावी.

https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B 

मुख्यालय दूरध्वनी क्रमांक - 02035000456, 020-3500045


 

 

.क्र.

विभागीय कार्यालयाचे नाव

कार्यक्षेत्रात समावेश असणारे जिल्हे

संपर्क दूरध्वनी क्रमांक

1.

विभागीय कार्यालयनागपूर

नागपूरभंडारागोंदियावर्धाचंद्रपूरगडचिरोली

मो.नं. 9423113865

0712-2531602

2.

विभागीय कार्यालयअमरावती

अमरावतीअकोलायवतमाळवाशिमबुलढाणा

मो.नं7030927337

0721-2661610

3.

विभागीय कार्यालयलातूर

लातूरनांदेडबीडउस्मानाबाद

मो.नं. 9511684703

02382-226680

4.

विभागीय कार्यालयऔरंगाबाद

औरंगाबादपरभणीहिंगोलीजालना

मो.नं.-7030927268

0240-2653595

5.

विभागीय कार्यालयनाशिक

नाशिकजळगावधुळेनंदुरबार

मो.नं.-7030927279

0253-2598685

6.

विभागीय कार्यालयमुंबई

मुंबईठाणेपालघररायगड

मो.नं.- 9021219479

022-22876436

7.

विभागीय कार्यालयकोल्हापूर

कोल्हापूररत्नागिरी

मो. न.  7030927301

0231-2680009

8.

विभागीय कार्यालयपुणे

पुणे,सोलापूरसातारा

मो.नं.-7030927255

020-35000454

 

***** 

 वाहतुकीस कोणताही अडथळा होऊ नये यासाठी नांदेड शहरात पर्यायी मार्ग 

·         14 मे रोजी सकाळी ते दुपारी वाजेपर्यंत असेल बदल

 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- नांदेड शहरात शनिवार 14 मे 2022 रोजी गोदावरी अर्बन बँकेचा उद्घाटन सोहळा तसेच भगीरथनगर येथील जाहीर सभेच्या अनुषंगाने मुख्य रस्त्यावरील वाहनांच्या वाहतूक व्यवस्थेत तात्पुरत्या स्वरुपात पर्यायी मार्गावरील वाहतुकीस वळण देऊन बदल करण्यात आला आहे. याबाबत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी अधिसूचना निर्गमीत केली आहे. ही अधिसूचना शनिवार 14 मे 2022 रोजी सकाळी ते दुपारी वाजेपर्यंत लागू राहिल.

 

शेतकरी चौकदिपनगरछत्रपती चौकाकडे जाण्या-येण्याचा रस्ता हा पूर्णपणे बंद राहिल. या रस्त्यावरील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग शेतकरी चौक- कॅनाल रोड- छत्रपती चौक तसेच शासकीय विश्रामगृह- पावडेवाडी चौक- मोर चौक- छत्रपती चौक पर्यंतछत्रपती चौक- मौर चौक- पावडेवाडी नाका हा राहिल. शनिवार 14 मे रोजी वाहुकीस कोणताही अडथळा होऊ नये यासाठी पर्यायी मार्गाची ही अधिसुचना निर्गमीत करण्यात आली आहे.

000000

युवा मंडळ / महिला मंडळानी 

क्रीडा साहित्यासाठी नेहरू युवा केंद्रात अर्ज करावेत 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- नेहरु युवा केंद्र नांदेड युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्यावतीने सन 2021-22 या वर्षासाठी जिल्ह्यातील संलग्नीत युवा मंडळ/महिला मंडळ यांना कार्यालयातर्फे क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात येत आहे.  युवा मंडळ व महिला मंडळानी क्रीडा साहित्यासाठी नेहरू युवा केंद्रात अर्ज करावेत, असे आवाहन नेहरु युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी चंदा रावळकर यांनी केले आहे.

00000 

 व्यावसायिक कर नोंदणी प्रमाणपत्र

दाखल करण्यास 31 मे पर्यत मुदत 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- व्यावसायिक कर नोंदणी प्रमाणपत्र पीटीआरसी धारकांनी ई-विवरणपत्रके 31 मे 2022 रोजी किंवा त्यापूर्वी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाच्या www.mahagst.gov.in संकेतस्थळावर करावेतअसे आवाहन व्यवसायकर अधिकारी गौ. म. स्वामी यांनी केले आहे. 

महाराष्ट्र व्यवसायकर कायदा-1975 अंतर्गत व्यावसायिक कर नोंदणी प्रमाणपत्र पीटीआरसी धारकांना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाच्या स्वयंचलित पध्दतीतील तांत्रिक अडचणीमुळे नियोक्त्यांना व्यवसायकराचा भरणा किंवा विवरण दाखल (अपलोड) करता आले नाही. मार्च-2022 पर्यंतच्या कोणत्याही कालावधीचे विवरणविनिर्दिष्ट केलेल्या विवरणावर देय असणारे संपूर्ण विलंब शुल्कात सुट देण्यात आली आहे. तसेच अंतर्गत व्याजाचा भरणा विवरण दाखल करण्यापूर्वी करावा, असेही प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास 

महामंडळाच्या विविध योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 12 :-  वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाअंतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रर्वगातील लोकांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील इच्छूक लाभार्थ्यांनी www.vjnt.in   या संकेतस्थळावर अर्ज करावेत. या योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय वसंतराव नाईक वि.जा.भ.ज विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नांदेड येथे संपर्क करावा, असे आवाहन अतिरिक्त जिल्हा व्यवस्थापक पी. एम.  झोंबाडे यांनी केले आहे. योजनेची माहिती पुढील प्रमाणे आहे.

 

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना : या योजनेमध्ये कर्ज व्याज परतावा मर्यादा 10 लाख पर्यंत असून अर्जदार हा विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष दरम्यान असावे. अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. ही योजना ऑनलाईन असून यासाठी आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. तसेच रहिवाशी दाखला, उत्पनाचे प्रमाणपत्र, जातीचा दाखला, शाळेचा दाखला, संबंधित व्यवसायाचे कोटेशन व प्रकल्प अहवाल, मूळ कागदपत्रासह वेबसाईटवर अपलोड करणे आवश्यक आहे.

 

 गट कर्ज व्याज परतावा योजना : या योजनेसाठी कर्जाची मर्यादा 10 ते 50  लाख रुपये पर्यत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत गट असावा व गटातील सदस्य हे विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा. गटातील सदस्याचे वय 18 ते 45 वर्षा पर्यंत असावे. गटातील लाभार्थ्यांचे कर्ज खाते हे आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. गटातील सर्व सदस्यांचे सिबिल क्रेडिट स्कोअर किमान 500 इतका असावा. उत्पन्नाची मर्यादा नॉन क्रिम्रीनलकरीता 8 लाख रुपयाची मर्यादा असावी. ही योजना ऑनलाईन असून याकरिता सदस्यांचे जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, शाळेचा दाखला, संबंधित व्यवसायाचे कोटेशन प्रकल्प अहवाल सोबत सर्व मूळ कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करणे आवश्यक आहे.

 

रुपये 1 लाख थेट कर्ज योजना : या योजनेत महामंडळाकडून रुपये 1 लाख थेट  कर्ज दिले जाते. योजनेसाठी दोन जामिनदार व गहाणखत, बोझा नोंद करून देणे महत्वाचे आहे. याकरिता जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला 1 लाख रुपया पर्यंत मर्यादा, रेशन कार्ड, आधार कार्ड, रहिवाशी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, इत्यादी कागदपत्रासह व्यवसायानुसार कागदपत्रे जाडणे आवश्यक आहे. या योजनेचे अर्ज महामंडळाकडून जातीचा मूळ दाखला व आधार कार्ड दाखवून रितसर नोंद करून अर्जदारास मिळेल.

 

बीज भांडवल योजना : बीज भांडवल योजना ही बँकेमार्फत राबविली जाते. अर्जदाराने महामंडळाकडून जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, रहिवासी, पॅनकार्ड, व्यवसायानुसार आवश्यक सर्व कागदपत्रे जोडून कार्यालयात दाखल करावेत. यापूर्वी लाभार्थ्यांनी कर्जाचा लाभ घेतला असल्यास त्यांना परत कर्ज प्रस्ताव दाखल करता येणार नाही.

वरील योजना सन 2022- 2023 या आर्थिक वर्षाकरिता राबविण्यात येत आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना  (IR-1) 50, गट कर्ज व्याज परतावा योजनेचे (IR-2), बीज भांडवल कर्ज योजना 50, रुपये 1 लाख थेट कर्ज योजना 100 असे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. वरील योजनेचा जास्तीत-जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

0000000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...