Wednesday, July 1, 2020


वृत्त क्र. 598   
कोरोनातून 9 व्यक्ती बरे तर 16 नवीन बाधित
नांदेड (जिमाका) दि. 1 :- कोरोना आजारातून पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील  7  बाधित व्यक्ती, मुखेड कोविड केअर सेंटर येथील 1 बाधित आणि औरंगाबाद येथील संदर्भित झालेला 1 बाधित व्यक्ते असे एकुण 9 बाधित व्यक्ती आज बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत 391 बाधितांपैकी एकुण 292  व्यक्ती कोरोनातून बरे झाले आहेत. यातील 82 बाधित व्यक्ती हे रुग्णालयात उपचार घेत आहेत तर 17 व्यक्तींचा इतर आजारासह कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
बुधवार 1 जुलै रोजी सायं 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकुण 87 अहवालापैकी 56 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले. यात 16 नवीन बाधित व्यक्ती आढळले. या बाधितांमध्ये बाफना परिसरातील 28 व 64 वर्षाचे 2 पुरुष, आंबेडकर नगर येथील 5 वर्षाची बालिका व 33 वर्षाचा 1 पुरुष, आसर्जन येथील 4 बाधित व्यक्तींपैकी  10, 11 व 37 वर्षाच्या 3 महिला, 42 वर्षाचा 1 पुरुष, विनायकनगर येथील 34 वर्षाची 1 महिला, वसंतनगर येथील 52 वर्षाची 1 महिला, गाडीपुरा येथील 54 वर्षाची 1 महिला, आनंदनगर परिसरातील 36 वर्षाची 1 महिला, अनिकेतनगर भावसार चौक येथील 65 वर्षची 1 महिला, कंधार तालुक्यातील सोमला तांडा उमरज येथील 65 वर्षाची 1 महिला, मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील 20 वर्षाचा 1 पुरुष व 38 वर्षाच्या एका महिलेचा यात समावेश आहे. सद्यस्थितीत या सर्व बाधित व्यक्तींची प्रकृती स्थिर आहे. 
उपचार घेत असलेल्या 82 बाधितांवर औषधोपचार चालू असून यातील 13 बाधितांची (7 महिला आणि 6 पुरुष बाधित ) प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.
नांदेड जिल्ह्यात 82  बाधितांपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 30, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 42, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 1, हदगाव कोविड केअर सेंटर येथे 1 तसेच जिल्हा रुग्णालय येथे 1 बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तर 6 बाधित  औरंगाबाद आणि 1 बाधित व्यक्ती सोलापूर येथे संदर्भित झाले. बुधवार 1 जुलै रोजी 84  व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- 1 लाख 46 हजार 787,
घेतलेले स्वॅब- 6 हजार 522,
निगेटिव्ह स्वॅब- 5 हजार 652,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 16,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 391,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 9,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 5,
मृत्यू संख्या- 17,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 292,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 82,
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या 84 आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000


वृत्त क्र. 597
 जिल्हा परिषदेत कृषि ‍दिन उत्साहात साजरा
नांदेड (जिमाका) दि.  1 :- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त जिल्हयातील कृषिनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्या समवेत विविध फळ पिकांची  रोपे जसे चिंच, पेरु, लिंब, आवळा इत्यादी देवून नाविन्यपूर्ण पध्दतीने जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात कृषि दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, कृषि पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर यांच्या संकल्पेनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मगाराणी अंबुलगेकर, शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, समाज कल्याण सभापती रामराव नाईक, कृषि पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर,  महिला बालकल्याण सभापती सौ. सुशिलाताई बेटमोगरेकर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राविशंकर चलवदे, माजी कृषि संचालक सुरेश अंबुलगेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल ठोंबरे, कृषि विकास अधिकारी संतोष नादरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शिवाजी पवार, कार्यकारी अभियंता श्री. रायभोगे, जि. प. सदस्य सौ. प्रणिताताई देवरे, श्री. शिंदे, बास्टेवाड, के. सी. सुर्यवंशी, श्री. सरोदे, श्री. मोरे, श्री. कल्याणे, श्री. सावतकर  उपस्थितीत होते.
जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांनी शेती व्यवसाय हा पुर्णत: निसर्गावर अवलंबून असल्याचे सांगून त्यावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी कराव असे मार्गदर्शन केले. येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये जिल्हा परिषद र्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिल कृषि विभागाच्या विविध योजना राबविण्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करुन दिला जाईल असेही त्यांनी सांगितले.  
प्रास्ताविकात कृषि सभापती बाळासाहेब रावणगावकर यांनी कृषि पशुसंवर्धन विभागामार्फत नव्याने राबविण्यात येणाऱ्या सद्यस्थितीत चालू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. जिल्हा परिषद सदस्या सौ. प्रणिताताई देवरे यांनी कै. वसंतराव नाईक यांच्या जीवनावर प्रकाश टाकतांना रोजगार हमी योजनेचा प्रामुख्याने उल्लेख केला. सुरेश अंबुलगेकर यांनी शेतकऱ्यांनी व्यापारी दृष्टीकोन पुढे ठेवून शेती केली पाहिजे असे सांगितले. कृषिभुषण शेतकरी रामराव कदम यांनी कै. वसंतरावजी नाईक यांच्या मंत्रीमंडळातील स्वर्गीय शंकराव चव्हाण यांनी राबविलेल्या सिंचन योजनामुळेच संपुर्ण महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम झाला असल्याचे सांगितले.
विद्यापीठ शास्त्रज्ञ श्री पांडागळे यांनी  विविध तणनाशकाचा कार्यक्षम वापर याविषयावर माहिती  दिली. देविकांत देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषि दिन बांधावर करण्याची विनंती केली. किटक शास्त्रज्ञ शिवाजीराव तेलंग यांनी विविध किटक, त्यांच्या अवस्था, किटकनाशकाचा कार्यक्षम वापर गुलाबी बोंडअळी नियंत्रण यावर सखोल मार्गदर्शन केले. मोनसॅन्टो इंडिया लि. सतिश काळवाघे यांनी गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी आम्ही शासनासोबत काम करु असे सांगितले. फेरोमन ट्रॅपचा वापर करण्याची विनंती केली. कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना किटक नाशकाची फवारणी करताना वापरावयाच्या सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम कृषि विकास अधिकारी संतोष नादरे यांच्या मार्गदर्शखाली संपन्न झाला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृ.अ. पुंडलीक माने तर आभार जि.कृ.अ. अनिल शिरफुले यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृ.अ. संभाजी कऱ्हाळे, प्रभारी  मो.अ. गजानन हुंडेकर, संजय चंद्रवंशी, श्री. हाळे, श्री. कासराळीकर, श्री. चालीकवार यांनी परिश्रम घेतले.
0000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...