Wednesday, July 1, 2020

वृत्त क्र. 592


क्यार व महा चक्रीवादळामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना
50 कोटी 65 लाख 49 हजार रुपयांची आर्थिक मदत  
पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे विशेष प्रयत्न  
नांदेड (जिमाका) दि. 1 :- मागील वर्षी क्यार व महा या चक्रीवादळामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवेळी पाऊस झाला. या वादळामुळे राज्यातील 34 जिल्ह्यांतर्गत 325 तालुक्यांमधील पिकांचे नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले त्यांना मदत देण्यासंदर्भात मा. राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली 16 डिसेंबर 2019 रोजी झालेल्या बैठकीत निर्णय झाला होता. या निर्णयानुसार नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचविण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे प्रयत्नशिल होते.
जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 123 कोटी 14 लाख 23 हजार रुपये एवढा निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारा प्राप्त असून जिल्ह्यातील मागणीच्या प्रमाणात परिगणना करुन तो वितरीत करण्यात आला आहे. यात अद्याप मदत वाटप करावयाची शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांसाठी 50 कोटी  65 लाख 49 हजार रुपये एवढा निधी आता उपलब्ध करण्यात आला आहे.
या निर्णयानुसार नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यासाठी निधी 1 कोटी 42 लाख 84 हजार 280, अर्धापूर 55 लाख 98 हजार 245, मुदखेड तालुक्यासाठी 3 कोटी 45 लाख 55 हजार 208, कंधार 4 कोटी 66 लाख 61 हजार 132, लोहा 8 कोटी 75 लाख, देगलूर 6 कोटी 45 लाख 13 हजार 224 रुपये, मुखेड  4 कोटी 16 लाख 40 हजार 735, नायगाव 3 कोटी 81 हजार 9, बिलोली 2 कोटी 35 लाख 20 हजार 336, धर्माबाद 1 कोटी 18 लाख 85 हजार 121, किनवट 2 कोटी 62 लाख 42 हजार 755, माहूर 1 कोटी 45 लाख 13 हजार 224, हिमायतनगर 2 कोटी 1 लाख 53 हजार 6, हदगाव 4 कोटी 28 लाख 54 हजार 627, भोकर 2 कोटी 41 लाख 69 हजार 216, उमरी 1 कोटी 83 लाख 76 हजार 882 असे एकुण 50 कोटी 65 लाख 49 हजार रुपये उपलब्ध झाला आहे.
क्यार व महा चक्री वादळामुळे नुकताच आलेल्या आदेशामुळे सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यासाठी 50 कोटी 65 लाख 49 हजार एवढा निधी उपलब्ध आहे. यात जिल्ह्यातील सर्व 16 तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.

00000

No comments:

Post a Comment

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

  मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु   नांदेड दि.  9   :-   प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्...