Saturday, April 1, 2023

 भारतीय स्वातंत्र्याऐवढेच मराठवाडा मुक्तीचा लढा तोलामोलाचा

- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवासाठी निधी उपलब्धतेसाठी शासन कटिबद्ध
·बंदाघाट येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी कार्यक्रमाचा शुभारंभ
शाहीर नंदेश उमप यांचे बहारदार सादरीकरण
नांदेड (जिमाका) दि. 1 :- मराठवाड्यातील जनतेला स्वातंत्र्यासाठी दोनवेळेस लढा द्यावा लागला. पहिला लढा हा ब्रिटीशांच्या जोखडातून मुक्त होण्याचा होता. दुसरा लढा हा भारतात जी काही संस्थाने शिल्लक होती, त्यापैकी आपल्या संस्थानाला स्वतंत्र देशात निर्माण करू पाहणाऱ्या निजामाशी लढा द्यावा लागला. निजामाची प्रवृत्ती ही भारताच्या अखंडतेला आव्हान देणारी असल्यामुळे मराठवाडा मुक्तीच्या लढ्याचे मोल हे स्वातंत्र्य लढ्याइतकेच महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य, वने, मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बंदाघाट येथे भव्य व्यासपिठावर आयोजित उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी खासदार तथा समिती अध्यक्ष प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राजेश पवार, ज्येष्ठ साहित्यीक लक्ष्मीकांत तांबोळी, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, प्रवीण साले, दिलीप कंदकुर्ते, चैतन्यबापू देशमुख, समिती सदस्य प्रा. सुनील नेरलकर, शंतनू डोईफोडे, श्रीमती आनंदी विकास, लक्ष्मण संगेवार, बालाजी बच्चेवार व इतर सन्माननीय सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामाच्या सर्व व्युव्हरचनेला वेळीच ओळखले. स्वामी रामानंद तीर्थ यांनी सुरूवातीपासून मराठवाडा मुक्तीसाठी बाळगलेला ध्यास सरदार वल्लभभाई पटेल यांनी ओळखला. निजामशाहीत जे अत्याचार झाले त्याला सिमा नव्हती. लोक शांततेत सारे सहन करत होते. त्याची जुलमशाही जेंव्हा वाढली तेंव्हा लोकांना हत्यार घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही. मराठवाड्याच्या मुक्तीसाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी मिशन पोलो यशस्वी राबवून अखेर मराठवाड्याला मुक्तीचा श्वास दिला. मराठवाड्याच्या मुक्तीचा हा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहचणे तेवढेच आवश्यक आहे. इतिहासाची पाने ही प्रेरणा देणारी असतात हे विसरून चालणार नाही, याची आठवण सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी करून दिली.
पायाभूत सुविधा विकासाएवढेच आपले सांस्कृतिक वैभव व इतिहासाच्या पानात दडलेले वैभव जतन करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. मराठवाडा मुक्तीचा हा लढा नव्या पिढी पर्यंत पोहचविण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही मंत्री मुनगंटीवार यांनी दिली. महाराष्ट्र हा दिल्लीचे तख्त राखणारा असून देशाच्या वैभवात राज्याचे महत्त्व अनमोल असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठवाडा मुक्ती संग्रामाचे मोल नव्यापिढी पर्यंत पोहचविण्यासाठी समिती वेगवेगळे उपक्रम आखत आहे. अर्जापूर येथे हुतात्मा गोविंद पानसरे यांच्या स्मारकाला अभिवादन करून शासनातर्फे प्रातिनिधिक स्वरूपात जिल्ह्यातील 16 स्वातंत्र सैनिकांचा सन्मान करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. 1 मे रोजी जिल्ह्यातील 6 लाख विद्यार्थी मराठवाडा मुक्तीची ही गाथा वृद्धींगत करण्यासाठी एकाचवेळी राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आपल्या प्रास्ताविकात हाती घेतलेल्या विविध कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.
या कार्यक्रमात मराठवाडा मुक्त्तिसाठी नांदेड जिल्ह्यात झालेल्या विविध महत्त्वपूर्ण घटनांची संक्षिप्त माहिती देणाऱ्या स्मृतीदर्शिकेचे प्रकाशन सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. याचबरोबर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या यशोगाथा पुस्तकाचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते झाले. नांदेड येथील ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत तांबोळी यांचा व मान्यवरांचा यावेळी स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्ती कौसल्ये व बापू दासरी यांनी केले.
000









 चला जाणूया नदीला या उपक्रमात पर्यावरण संवर्धनासाठी

प्रत्येकाने आपले कर्तव्य ओळखून योगदान द्यावे
- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते
मन्याड नदी संवाद व गाळ काढणाऱ्या लोकाभिमुख उपक्रमांचा शुभारंभ
नांदेड (जिमाका) दि. 1 :- अनादी काळापासून नदीचे आणि मानवाचे नाते अधिक दृढ आहे. चांगल्या संस्कृतीचा उदय नदीच्या काठावर झाला आहे. नद्यांचे पावित्र्य राखणे हे प्रत्येकांचे कर्तव्य असून त्यासाठी आपला सहभाग तीतकाच महत्वाचा आहे. नदी संवर्धनासाठी लोकसहभाग अत्यंत महत्वाचा असून लोकसहभागातून प्रत्येक व्यक्तीने पर्यावरण संवर्धनात आपले कर्तव्य ओळखून योगदान द्यावे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
शासनाने “चला जाणुया नदीला” हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत नदी संवाद यात्रा व जलसाठ्यांना गाळातून मुक्त करण्यासाठी जिल्ह्यातील मन्याड नदीचा गाळ काढण्याच्या उपक्रमाचा प्रातिनिधीक शुभारंभ सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते नियोजन भवन येथे करण्यात आला. यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपवनसंरक्षक वाबळे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अविनाश कुमार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, शिवाचार्य बेटमोगरेकर, नाम फाऊंडेशनचे प्रतिनिधी मल्हार नाना पाटेकर, जिल्ह्यातील सर्व सेवाभावी संस्थांचे प्रमुख व प्रतिनिधी हे उपस्थित होते. मांजरा नदी समन्वयक अनिकेत लोहिया, प्रमोद देशमुख, दीपक मोरतळे, सीता नदी समन्वयक बाळासाहेब शेंबोलीकर, नंदन फाटक, लेंडी नदी समन्वयक कैलास येसगे, वसंत रावणगावकर, यादव बोरगावकर, मन्याड नदी समन्वयक प्रमोद देशमुख, शिवाजीराव देशपांडे, दुधाना नदी समन्वयक रमाकांत कुलकर्णी, कयाधू नदी समन्वयक दयानंद कदम, जयाजी पाईकराव, आसना नदी समन्वयक तानाजी भोसले, डॉ परमेश्वर पौळ, वरुणा नदी समन्वयक सुनील परदेशी, राहुल जोरे आदीची उपस्थिती होती.
पाणी ही महत्वाची नैसर्गिक साधन संपत्ती असून या संपत्तीचे संवर्धन करणे हे प्रत्येकांचे कर्तव्य आहे. जिल्ह्यातील मन्याड नदीपात्रातील परिसर पुरमुक्त व दुष्काळमुक्त करण्यासाठी गाळ काढणे आवश्यक असून याचा फायदा त्या भागातील शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना झाला पाहिजे. मराठवाडा मुक्तीचा हा लढा खऱ्या अर्थाने लोकाभिमूख करावयाचा असेल तर शेतकरी, कष्टकऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करणे ही आपली जबाबदारी असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. चला जाणूया अभियाना अंतर्गत देशातील 75 नद्या अमृतवाहीनी करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. यात आता लोकसहभागातून वाढ होवून 117 नद्या अमृतवाहीन्या करण्यावर भर देण्यात येणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
चला जाणूया नदीला या उपक्रमातर्गत आज मन्याड नदीपात्रातून गाळ काढण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाला जनआंदोलनाचे स्वरुप आले असून संस्था व लोकसहभागातून मन्याड नदीतील 20 लाख घनमीटर गाळ काढण्याचे नियोजन असल्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले. यावेळी मी मन्याड या पुस्तिकेचे प्रकाशन झाले. यावेळी जिल्ह्यातील सर्व नद्याच्या पाण्याचे कलश पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुमंत पाडे यांनी केले. यावेळी भुजल गाथा फिल्मचे सादरीकरण करण्यात आले.
0000






  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...