Saturday, June 19, 2021

 

कोविशिल्ड लसीचा पहिला डोस 30 ते 44 वयोगटासाठी

कोविशिल्ड व कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस 45 वर्षावरील व्यक्तींना

जिल्ह्यातील 92 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 92 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. कोविशिल्ड लसीचा पहिला डोस हा 30 ते 44 वर्षावरील वयोगटातील व्यक्तींना दिला जाणार आहे. तर कोविशिल्ड व कोव्हॅक्सीनची लस ही 45 वर्षावरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी देण्यात येणार आहे. दिनांक 20 जून रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या 9 केंद्रावर लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. या केंद्रात श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग,  शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, श्रावस्तीनगर व सिडको या 8 केंद्रावर कोविशील्डचा 30 ते 44 वयोगटासाठी पहिला डोस व 45 वर्षावरील व्यक्तींना दुसरा डोस प्राधान्याने दिला जाईल. या केंद्रांवर दोन्ही वयोगटासाठी प्रत्येकी 100 डोस उपलब्ध केले आहेत.

 

या व्यतिरिक्त कोव्हॅक्सीन ही लस दोन्ही गटासाठी श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालय, शहरी दवाखाना श्रावस्तीनगर या 3 केंद्रावर प्रत्येकी 100 डोस याप्रमाणे उपलब्ध करुन दिली आहेत. स्त्री रुग्णालय, दशमेश हॉस्पिटल येथे प्रत्येकी 80 डोस तर शहरी दवाखाणा हैदरबाग, जंगमवाडी येथे प्रत्येकी 70 डोस उपलब्ध करुन दिली आहेत. याठिकाणी 45 वर्षांवरील दुसऱ्या डोससाठी दिली जाईल.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोविशील्डचे ही लस 30 ते 44 वयोगटावरील व्यक्तींना पहिला डोस व प्राधान्याने 45 वर्षांवरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी दिली जाईल. येथे केंद्रनिहाय दोन्ही वयोगटासाठी प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. 

 

उपजिल्हा रुग्णालय हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी अशा एकुण 15 केंद्रावर कोव्हॅक्सिन ही लस उपलब्ध केली आहे. या प्रत्येक केंद्रांना प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहे. हे डोस 45 वर्षांवरील व्यक्तींच्या दुसऱ्या डोससाठी दिले जातील.

 

जिल्ह्यातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरणासाठी कोविशील्ड ही लस उपलध करुन देण्यात आली असून याठिकाणी 30 ते 44 वर्षावरील व्यक्तींना पहिला डोस तर 45 वर्षावरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी राहील. या सर्व 67 केंद्रांवर प्रत्येकी 100 याप्रमाणे दोन्ही वयोगटासाठी डोस उपलब्ध करुन दिले आहे.

 

जिल्ह्यात 18 जून पर्यंत एकुण 4 लाख 78 हजार 177 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 19 जून पर्यंत कोविड-19 लसीचासाठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 4 लाख 43 हजार 930 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 44 हजार 960 डोस याप्रमाणे एकुण 5 लाख 88 हजार 890 डोस प्राप्त झाले आहेत. कोविशील्डचे डोस 30 ते 44 वर्षावरील व्यक्तींसाठी पहिल्या लसीकरणाला तर कोविशील्ड व कोव्हॅक्सीनचे डोस 45 वर्षावरील व्यक्तींसाठी दुसऱ्या लसीकरणाला उपलब्ध आहे.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्याच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. 19 जून पासून 30 ते 44 वयोगटातील कोविशिल्ड लसीचा पहिला डोस सुरु करण्यात आला आहे. मनपा कार्यक्षेत्रात 30 ते 44 वयोगटासाठी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण केल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. मनपा कार्यक्षेत्रात कोव्हॅक्सीनची लस ऑनलाईन नोंदणीसाठी 50 डोसेस 45 वर्षावरील लाभार्थ्यांना दुसऱ्या डोससाठी उपलब्ध राहतील. तर 50 डोसेस हे एचसीडब्लू व एफएलडब्लू यांच्यासाठी दुसऱ्या डोसकरीता ऑफलाईन / ऑनस्पॉट नोंदणी पद्धतीने उपलब्ध राहतील. एचसीडब्लू व एफएलडब्लू यांनी ओळखपत्र व आधारकार्ड सोबत घेऊन यावे. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

00000

 

नांदेड जिल्ह्यात 24 व्यक्ती कोरोना बाधित

तर 53 कोरोना बाधित झाले बरे  

नांदेड (जिमाका) दि. 19 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 181 अहवालापैकी  24 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 16 तर अँटिजेन तपासणीद्वारे 8 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 91 हजार 81  एवढी झाली असून यातील 88 हजार 328 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 280 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 901 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 8, देगलूर तालुक्यांतर्गत 1, नांदेड ग्रामीण 3, कंधार 1, अर्धापूर 1, लोहा 1, बिलोली 1 तर अँटिजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 5, नांदेड ग्रामीण 1, बिलोली 1, किनवट 1 असे एकूण 24 बाधित आढळले.

आज जिल्ह्यातील 53 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 1,  बिलोली तालुक्यातर्गंत 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 1, हिमायतनगर तालुक्यांतर्गत 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 42, खाजगी रुग्णालयातील 7 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 280 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 9, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  23, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 2,  किनवट कोविड रुग्णालय 8, देगलूर कोविड रुग्णालय 3,  हदगाव कोविड रुग्णालय 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 178, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 45, खाजगी रुग्णालय 11  व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 125, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 129 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 88 हजार 405

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 85 हजार 822

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 91 हजार 81

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 328

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 901

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.97 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-2

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-16

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-163

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-280

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2                    

00000

 

भूशास्त्रीय व भूजलीय विषयावर वेबिनारद्वारे सादरीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- भू.स.वि.यं. सुवर्ण महोत्सवी वर्ष 2021 निमित्त भूजल विषयक तांत्रिक बाबींची संपूर्ण माहिती व जनजागृती होण्यासाठी भूजलाशी निगडीत विविध विषयांवर वेबिनार आयोजित करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील ग्रामपंचायत सरपंच, सदस्य यांचेसाठी आयोजित वेबिनारमध्ये भूशास्त्रीय व भूजलीय या विषयावर वरिष्ठ भूवैज्ञानिक एस. बी. गायकवाड यांनी नुकतेच सादरीकरण केले. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयातील सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, अशा कर्मचारी यांच्यासह जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000

 

                               सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त

डाक विभागामार्फत विशेष रद्दीकरण मोहरचे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- सातवा आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून निमित्त भारतीय डाक विभागाच्यावतीने विशेष रद्दीकरण मोहरचे आयोजन करण्यात आले आहे. हा अनोखा उपक्रम सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या स्मरणार्थ भारतीय डाक विभाग संपूर्ण भारत देशातील 810 मुख्य डाक घरामध्ये चित्रित विशेष रद्दीकरण मोहरचे अनावरण होणार आहे. हे आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या एकाचवेळी फिलाटेलिक स्मरणार्थांपैकी एक ठरणार आहे, अशी माहिती नांदेड विभागाचे डाकघर अधिक्षक यांनी दिली आहे. 

या उपक्रमांतर्गत  नांदेड डाक विभागातील प्रधान डाक घर येथे सोमवार 21 जून 2021 रोजी कार्यालयात सर्व बुक केलेल्या आणि वितरणासाठी आलेल्या टपालावर हे विशेष रद्दीकरण मोहर छापण्यात येणार आहे. ही मोहर विशेष प्रकारे चित्रित असून ती हिंदी आणि इग्रजी भाषेत मुद्रित असेल. यानिमित्त जागरुकता निर्माण करण्यासाठी नांदेड प्रधान डाक घर येथे फिलाटेली संबंधी संकल्पानाची माहिती देण्यात येणार आहे. 

या उपक्रमांतर्गत भारतीय डाक विभागातील मुख्य डाक घरांमध्ये 21 जून 2021 रोजी कार्यालयात सर्व बुक केलेल्या आणि वितरणासाठी आलेल्या टपालावर हे विशेष रद्दीकरण मोहर छापण्यात येणार आहे. ही मोहर विशेष प्रकारे चित्रित असून ती हिंदी आणि इग्रजी भाषेत मुद्रित असेल. साधारणपणे रद्दीकरण मोहोर ही डाक विभागात वापरली जाणारी एक सांकेतिक पद्धत आहे, जी की डाक तिकीट रद्द करण्यासाठी वापरली जाते. जेणेकरून एकदा वापरलेले  डाक तिकीट परत वापरता येणार नाही. अशा प्रकारची रद्दीकरण मोहरीचे संकलन हे संग्रहणीय आणि बहुतेक फिलाटेलिक अभ्यासाचे विषय असतात. 

गेल्या काही वर्षांमध्ये, डाक तिकिटांची  संकलनाची आवड कमी झाली आहे आणि या छंद किंवा कलेचा पुनरुज्जीवन करण्यासाठी भारतीय डाक विभागाने फिलाटेलीस्टसाठी एक योजना चालविली आहे. ते फिलाटेलिक ब्युरोक्समधील कलेक्टर्स आणि नियुक्त केलेल्या पोस्ट ऑफिसमधील काउंटरसाठी डाक तिकिटांचा लाभ घेतात. एक व्यक्ती 200 रुपये जमा करून सहजपणे देशातील कोणत्याही मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये फिलाटेलिक डिपॉझिट खाते उघडू शकते आणि डाक तिकिटे व विशेष लिफाफे सारख्या वस्तू मिळवू शकते. याव्यतिरिक्त, स्मारक तिकिटे फक्त फिल्टेलिक ब्युरोक्स आणि काउंटरवर किंवा फिलाटेलिक ठेव खाते योजना अंतर्गत उपलब्ध आहेत. ते मर्यादित प्रमाणात छापले जातात. 

योग आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस हे वर्षानुवर्षे फिलाटेलिक स्मर्नार्थाचे संकलन करणाऱ्यांसाठी  लोकप्रिय विषय आहेत. सन 2015 मध्ये भारतीय डाक विभागाने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी दोन शिक्क्यांचा संच आणि एक लघु पत्रकाचे अनावरण केले होते. सन 2016  मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वितीय आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या स्मृतीदिनानिमित्त सूर्य नमस्काराची प्रतिकृती असलेले टपाल तिकिटाचे अनावरण केले. सन 2017 मध्ये यूएन पोस्टल प्रशासन (यूएनपीए) ने न्यूयॉर्कमधील आंतरराष्ट्रीय योग दिनाचे स्मरण करण्यासाठी 10 प्रकारचे योग आसने दर्शविणाऱ्या टपाल तिकिटांचा  संच जारी केला. 

आंतरराष्ट्रीय योग दिवस गेल्या सहा वर्षात जगभरात विविध सर्जनशील प्रकारे साजरा केला गेला. भारतात पूर्वीच्या अनेक सुंदर चित्रामध्ये योग दिनाच्या अनोख्या उत्सवाचे चित्रण केले आहे. यामध्ये हिमालयातील बर्फाच्छादित भागात योगाभ्यास करणारे भारतीय सैन्य कर्मचारी, प्रदर्शनात असलेल्या  आयएनएस विराटवर योग करणारे नौदल अधिकारी व कॅडेट्स, आंतरराष्ट्रीय योग दिवस संदेश असलेले वाळू शिल्प तयार करणे, भारतीय नौदलाच्या पाणबुडी आयएनएस 'सिंधुरत्न' मध्ये  योगासने करणारे भारतीय नौदलाचे अधिकारी इत्यादींचा समावेश आहे. सध्याचा फिल्टेली  संकलानासठी पुढाकार आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याच्या विविधतेत भर घालत आहे. 

युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने (यूएनजीए) 11 डिसेंबर 2014 रोजी घेतलेल्या ठरावात 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला. सन 2015 पासून हा दिवस संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. दिवसेंदिवस यामध्ये सभागी होणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढत जात आहे. 

यावर्षी कोविड -19 संसर्गाचा सर्व देशभरात परिस्थितीचा विचार केल्यास बहुतेक कार्यक्रम हे ऑनलाईन पद्धतीने होतील आणि या वर्षाच्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा संदेश योगा बरोबर रहा, घरी रहा असा आहे. देश सावधपणे लॉकडाउनमधून बाहेर पडत असल्याने 800 हून अधिक प्रधान डाक घरामध्ये  संग्रहणीय विशेष रद्दीकरण मोहोर ही विशाल टपाल स्मरणोत्सव बऱ्याच फिलाटेलीक संधी उघडेल आणि कदाचित देशामध्ये टपाल तिकिटांचा संग्रह करणाऱ्या लोकांची चळवळ पुन्हा प्रज्वल्लीत होण्याची शक्यता आहे, अशी माहिती नांदेड विभागाचे डाकघर अधिक्षक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

000000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...