Tuesday, May 4, 2021

1 हजार 44 कोरोना बाधित झाले बरे नांदेड जिल्ह्यात 490 व्यक्ती कोरोना बाधित 15 जणांचा मागील दोन दिवसांत मृत्यू कोरोनाबाबत जनजागृतीसाठी जागरुक नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन

                                    1 हजार 44 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड जिल्ह्यात 490 व्यक्ती कोरोना बाधित

 15 जणांचा मागील दोन दिवसांत मृत्यू

कोरोनाबाबत जनजागृतीसाठी जागरुक नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 77 अहवालापैकी 490 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 347  तर अँटिजेन तपासणीद्वारे 143 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 82  हजार 476 एवढी झाली असून यातील 72  हजार  309  रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला  8  हजार  263 रुग्ण उपचार घेत असून 215 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

दिनांक 3 ते 4 मे या दोन दिवसांच्या कालावधीत 15 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 639 एवढी झाली आहे. दिनांक 3 मे रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी मुखेड येथील 28 वर्षाचा पुरुष, लोहा येथील 70 वर्षाची महिला, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे हदगाव येथील 80 वर्षाचा पुरुष, सिडको नांदेड येथील 83 वर्षाची महिला, जुना कौठा नांदेड येथील 58 वर्षाचा पुरुष, प्रकाश नगर नांदेड येथील 70 वर्षाचा पुरुष, नायगाव येथील 60 वर्षाचा पुरुष, गोदावरी कोविड रुग्णालय येथे वामन नगर नांदेड येथील 60 वर्षाचा पुरुष 4 मे 2021 रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे नांदुसा नांदेड येथील 85 वर्षाचा पुरुष, हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव येथील 50 वर्षाचा पुरुष, शिवाजीनगर नांदेड येथील 55 वर्षाची महिला, देगलूर येथील 44 वर्षाचा पुरुष, अंचोली तालुका नायगाव 60 वर्षाचा पुरुष, किनवट कोविड रुग्णालय किनवट तालुक्यातील मोहापूर येथील 65 वर्षाचा पुरुष, गोदावरी कोविड रुग्णालय येथे देगलूर येथील कळसकर गल्ली येथील 56 वर्षाचा पुरुष यांचा समावेश आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.67 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 147बिलोली 4हिमायतनगर 5, माहूर 1, उमरी 10हिंगोली 3, नांदेड ग्रामीण 12, देगलूर 25, कंधार 11, मुदखेड 5, यवतमाळ 8, निजामाबाद 1, अर्धापूर 6, धर्माबाद 2, किनवट 33, मुखेड 5, परभणी 4, हैद्राबाद 1, भोकर 12, हदगाव 15, लोहा 23, नायगाव 13, बीड 1 असे एकूण 347 बाधित आढळले.

 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात 32, बिलोली 6उमरी 3, माहूर 14, मुदखेड 6, नांदेड ग्रामीण 10, देगलूर 2, कंधार 6, मुखेड 1, लातूर 1, अर्धापूर 24, धर्माबाद 3, किनवट 8, नायगाव 7, यवतमाळ 3, भोकर 2, हदगाव 4, लोहा 3, हिंगोली 8  व्यक्ती असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे 143 बाधित आढळले.

 

आज जिल्ह्यातील 1 हजार 44 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 15, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण 637धमार्बाद तालुक्यातंर्गत 9देगलूर कोविड रुग्णालय 10अर्धापूर तालुक्यातंर्गत 22उमरी तालुक्यातंर्गत 35मालेगाव टीसीयु कोविड रुग्णालय 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 13मुखेड कोविड रुग्णालय 31मुदखेड कोविड सेंटर 10, किनवट कोविड रुग्णालय 12, हिमायतनगर तालुक्यातर्गंत 28बिलोली तालुक्यातंर्गत 6शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 6हदगाव कोविड रुग्णालय 9 कंधार तालुक्यातंर्गत 3मांडवी कोविड केअर सेंटर 3लोहा तालुक्यातंर्गत 33भोकर कोविड केअर सेंटर 20खाजगी रुग्णालय 140 बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली .   

 

आज 8 हजार 263 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय 129, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 77, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ( नवी इमारत) 115, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 47किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 80मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 66देगलूर कोविड रुग्णालय 29जैनब कोविड हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 15बिलोली कोविड केअर सेंटर 85हिमायतनगर कोविड केअर सेंटर 1नायगाव कोविड केअर सेंटर 18, उमरी कोविड केअर सेंटर 27, माहूर कोविड केअर सेंटर 24, भोकर कोविड केअर सेंटर 8, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 32लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 39कंधार कोविड केअर सेंटर 16धर्माबाद कोविड केअर सेंटर 49 मुदखेड कोविड केअर सेंटर 14अर्धापूर कोविड केअर सेंटर 12बारड कोविड केअर सेंटर 25मांडवी कोविड केअर सेंटर 8मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय 5भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 40, एनआरआय कोविड केअर सेंटर 55, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 96  नांदेड मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 3 हजार 397नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 2 हजार 76खाजगी रुग्णालय 1 हजार 678असे एकूण 8 हजार 263 उपचार घेत आहेत. 

 

आज रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 40, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 35, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 51 , भक्ती  जम्बों कोविड केअर सेंटर 25 खाटा उपलब्ध आहेत.

 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 4 लाख 70 हजार 792

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 78 हजार 568

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 82 हजार 476

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 72  हजार 309

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 639

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.67 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-29

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-25

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-370

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 8 हजार 263

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-215

00000

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण

                                                 प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत

पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण

नांदेड (जिमाका) दि. 4 :- कोविड-19 या साथीच्या आजाराच्या अनुषंगाने आपत्कालीन परिस्थितीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना माहे मे  व जून 2021 या महिन्यासाठी नियमित अन्नधान्याबरोबरच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या अन्नधान्याचे वितरण करण्यात येत आहे.

माहे मे 2021 साठी अन्नधान्याच्या दिलेल्या नियमित नियतनानुसार हे वितरण होईल.  अंत्योदय अन्न योजना कुटूंबांतील लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतंर्गत अनुज्ञेय असलेल्या 23 किलो गहू, 12 किलो तांदुळ असे एकूण 35 किलो धान्य व प्राधान्य कुटूंब योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति व्यक्ति 3 किलो गहू, 2 तांदूळ मोफत याप्रमाणे धान्याचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच एपीएल धारक शेतकरी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती गहू 3 किलो व 2 तांदूळ ( गहू दोन रुपये किलो व तांदूळ तीन रुपये किलो ) याप्रमाणे वाटप करण्यात येणार आहे.

 

माहे मे व जून 2021 या दोन महिन्याचे वरिलप्रमाणे नियमित अन्नधान्याचे वाटप झाल्यानंतर त्या-त्या महिन्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतंर्गत (पीएमजीकेएवाय) सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना ज्यामध्ये प्राधान्य कुटूंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रती सदस्य प्रतिमहा पाच किलो ( गहू व तांदूळ) मोफत त्याचबरोबर अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना शिधापत्रिकेतील सदस्य संख्येनुसार प्रति सदस्य पाच किलो प्रमाणे ( गहू व तांदूळ) प्रतिमहा अन्नधान्य ( मोफत) वाटप करण्यात येणार आहे. हे दोन्ही प्रकारचे वाटप पीओएस मशिनमार्फत होणार आहे. साधारणत: प्रत्येक महिन्याच्या पहिल्या पंधरवाडयात नियमित अन्नधान्याचे ( माहे मे 2021 मध्ये अंत्योदय प्राधान्य योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत) वाटप झाल्यानंतर दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे मोफत धान्याचे वितरण होणार आहे. याबाबत सर्व संबंधित तहसीलदार व जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांना वरीलप्रमाणे जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना धान्य वाटप करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. तरी सर्व शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य दुकानात गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन अन्नधान्य प्राप्त करुन घ्यावे, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 


बुरशीजन्य आजाराची अशी आहेत लक्षणे वेळीच काळजी घेण्याचे आवाहन

                                                     बुरशीजन्य आजाराची अशी आहेत लक्षणे

 वेळीच काळजी घेण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- कोव्हिड आजार होवून बरे झाल्यानंतर अनेक रुग्णांमध्ये पोस्ट कोव्हिड म्युकोर्मिकोसिस हा बुरशीजन्य आजार आढळून येत आहे. हा आजार बुरशी (फंगल इन्फेक्शन) या जंतूमूळे होतो. अनियंत्रित मधुमेह व कोव्हिड या आजारामूळे हा आजार उध्दभवतो. या आजाराचे लवकर निदान झाले तर पूर्णपणे बरा होतो.  या जंतुसंसर्गामुळे डोळा गमवावा लागु शकतो किंवा जीवघेणा ही ठरु शकतो. याचे उपचार ही खर्चिक आहेत. त्यामूळे लक्षणाची सुरुवात झाली की लगेच नाक-कान-घसा तज्ञांशी संपर्क साधून वेळीच उपचार घ्यावेत असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य  विभागाने केले आहे. या आजाराची सुरुवात नाकापासून होते. टाळू, डोळे व यानंतर मेंदूपर्यत पसरतो. त्यामूळे कोरोनाबाधित रुग्णांनी वेळीच लक्षणे दिसल्यास काळजी घ्यावी व  नाक कान घसा तज्ञांकडून तपासणी करुन घ्यावी असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

 

या बुरशीजन्य आजाराची लक्षणे अशी आहेत. नाकातला श्वास कोंडणे, काळया बुरशीचा चट्टा, नाक, टाळू येथे आढळणे, दात दुखणे, गाल दुखणे, चेहऱ्याच्या हाडांना असह्य वेदना होणे, डोळा दुखणे, डोळा सुजणे व दृष्टी कमजोर होणे. आजाराचे स्टेज 1 - नाकापर्यंत मर्यादित (नाक व सायनसेस) स्टेज 2- डोळयापर्यंत पसरणे, स्टेज-3- मेंदुपर्यंत पसरणे (बेशुध्द, अर्धांगवायु. इत्यादी) .

 

नाकाची दुर्बीणीद्वारे तपासणी, नाकातील स्त्रावाची बुरशी जंतुसाठी तपासणी  सिटी स्कॅन व एमआरआय डोळे व सायनसमधील बुरशी जंतुसंसर्ग शोधण्यासाठी  या तपासणी कराव्यात. तसेच या बुरशीजन्य आजारावर बुरशीरोधक औषधी इंजेक्शनस ॲम्फोटेरेसीन-बी, फोसॅकोनॅझोल, सर्जीकल उपचार, सौम्य बिटाडीन नाकाचे ड्रॉप हे उपचार करावेत. तरी सर्व नागरिकांनी यापैकी एक किंवा अनेक लक्षणे कोव्हिडनंतर आढळल्यास त्वरीत  नाक,कान, घसा तज्ञ यांना संपर्क करावा. तसेच महानगरपालिका कोव्हिड हेल्प लाईन क्र. 8956306007 यावर संपर्क करावा असेही कळविले आहे.

0000 

लेंडी प्रकल्पग्रस्तांचे होणार स्वेच्छा पुनर्वसन ! अशोक चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश, विजय वडेट्टीवारांनी दिली तत्वतः मान्यता

 

लेंडी प्रकल्पग्रस्तांचे होणार स्वेच्छा पुनर्वसन !

अशोक चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश,
विजय वडेट्टीवारांनी दिली तत्वतः मान्यता

नांदेड (जिमाका) दि. 4 :-  लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या स्वेच्छा पुनर्वसनाच्या प्रमुख मागणीला राज्याचे मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे मागील दहा वर्षांपासून रखडलेला मराठवाड्यातील महत्त्वपूर्ण आंतरराज्यीय लेंडी प्रकल्पाला पुन्हा चालना मिळणार आहे.


प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी मागील १० वर्षांपासून या प्रकल्पाचे काम थांबले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला पुन्हा सुरू करण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण सातत्याने प्रयत्नशील असून, त्यांनी काही काळापूर्वीच प्रकल्पग्रस्तांच्या समितीची बैठक घेतली होती. पुनर्वसनासंदर्भात समितीने केलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने आज मुंबईत आयोजित बैठकीत चर्चा झाली. यावेळी लेंडी प्रकल्पाच्या सद्य:स्थितीचा आढावा घेण्यात आला. श्री. चव्हाण यांनी समितीच्या मागण्या विस्तृतपणे मांडल्या व या आंतरराज्यीय प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेता विशेष बाब म्हणून प्रकल्पग्रस्त समितीच्या मागण्या मान्य करण्याचा आग्रह धरला.


बैठकीअंती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी समितीच्या महत्त्वपूर्ण स्वेच्छा पुनर्वसनाच्या मागणीला तत्वतः मान्यता दिली. या निर्णयानुसार स्वेच्छा पुनर्वसनामध्ये शेतकरी कुटूंब, बिगर शेतकरी कुटुंबांसह वाढीव कुटुंबांचाही समावेश केला जाईल. या स्वेच्छा पुनर्वसनासाठी अंदाजित खर्च सुमारे १६९.७७ कोटी रूपये आहे. ज्या दिवशी याबाबत शासनाचा आदेश जारी होईल, त्या तारखेपर्यंतच्या वाढीव कुटुंबांना स्वेच्छा पुनर्वसनासाठी पात्र धरण्याची मागणी अशोक चव्हाण यांनी याप्रसंगी केली व विजय वडेट्टीवार यांनी ही मागणीसुद्धा मान्य केली आहे.


लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या समितीची स्वेच्छा पुनर्वसनाची प्रमुख मागणी राज्य शासनाने मान्य केल्यामुळे सदरहू धरणाचे काम पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यात या आंतरराज्यीय प्रकल्पावर अंदाजित खर्च सुमारे २ हजार १८३ कोटी रूपये आहे. त्यापैकी ६५ टक्के म्हणजे १ हजार ४४० कोटी रूपयांचा खर्च महाराष्ट्र शासन करणार असून, उर्वरित ३५ टक्के म्हणजे ७४३ कोटी रूपयांचा खर्च तेलंगणा सरकार करणार आहे.


या बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. बिपीन ईटकर, जलसंपदा विभागाचे उपसचिव श्री. बागडे व धरणे, महसूल विभागाचे उपसचिव श्री. बनकर, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री. कुलकर्णी, नांदेड पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता              श्री. सब्बिनवार आदी अधिकारी सहभागी झाले होते.


0000

तांत्रिकदृष्ट्या सक्षम व अत्याधुनिक होणार नांदेडचे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र अशोक चव्हाण यांचे प्रयत्न सार्थकी, विजय वडेट्टीवारांची तत्वतः मंजुरी

 

तांत्रिकदृष्ट्या सक्षम व अत्याधुनिक होणार
 नांदेडचे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र
अशोक चव्हाण यांचे प्रयत्न सार्थकी, विजय वडेट्टीवारांची तत्वतः मंजुरी

नांदेड (जिमाका) दि. 4 :-  नांदेड येथील प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र तांत्रिकदृष्ट्या सक्षम व अत्याधुनिक करण्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे प्रयत्न सार्थकी लागले असून, मदत व पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या मागणीला तत्वतः मंजुरी दिली आहे.

मदत व पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. बिपीन ईटकर आदी प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंगळवारी सायंकाळी मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नांदेड, परभणी व हिंगोली या तीन जिल्ह्यांसाठीचे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र नांदेड येथे आहे. हे केंद्र तांत्रिकदृष्ट्या सक्षम व अत्याधुनिक करण्याच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण प्रयत्नशील आहेत. या केंद्रासाठी पुरेशा पायाभूत सुविधा असलेली इमारत उभारण्यासाठी त्यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात भूखंड देण्यासाठीही पुढाकार घेतला. तसेच हे केंद्र अत्याधुनिक तंत्रज्ञान व उपकरणांनी सुसज्ज असण्याची आवश्यकताही त्यांनी विषद केली.

या मागणीचे महत्त्व व गरज लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रासाठी नवीन इमारत उभारण्यासाठी तात्काळ तत्वतः मंजुरी दिली. नांदेड येथील प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या नवीन इमारतीच्या उभारणीसाठी सुमारे ७ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असून, अत्याधुनिक उपकरणांसाठी सुमारे १९ कोटी रूपयांचा खर्च अंदाजित आहे. याचा फायदा नांदेड, परभणी व हिंगोली या तीन जिल्ह्यांना होणार असून, आपत्ती निवारणासाठी हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास उभय मंत्र्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

0000



 

वैद्यकीय उपकरणांच्या निगा व सुस्थितीसाठी संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण अत्यावश्यक - पालकमंत्री अशोक चव्हाण

                                                   वैद्यकीय उपकरणांच्या निगा व सुस्थितीसाठी

संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण अत्यावश्यक

-         पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड (जिमाका) दि. 4 :- कोरोनाच्या प्रादुर्भावात अडकलेल्या नागरिकांना तात्काळ उपचार व्हावेत, वेळप्रसंगी जी कांही उपचारासाठी अत्याधुनिक यंत्रणा, उपकरणे लागतील त्यांची गरज ओळखून आपण विविध यंत्रसामुग्री खरेदी केली आहे. यात ऑक्सिजन प्रकल्पापासून ते व्हेन्टिलेटर, सिटीस्कॅन, एमआरआय सारख्या उपकरणांचा समावेश आहे. ही सर्व उपकरणे सुस्थितीत राहीली तरच त्याचा सामान्य नागरिकांना लाभ होईल असे स्पष्ट करुन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी वेळप्रसंगी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देवून त्यांना सक्षम करण्याचे निर्देश दिले.

 जिल्ह्यातील कोराना स्थितीची आढावा बैठक पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती मंगाराणी अंबुलगेकरआमदार अमर राजूरकरआमदार राजेश पवार, आमदार श्यामसुंदर शिंदेआमदार मोहन हबर्डे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकरजिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळेजिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर, मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने, अपर जिल्हाधिकारी खुशालसिह परदेशीजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकरजिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालाजी शिंदेअधिष्ठाता दिलीप म्हेसेंकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णीजिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे आदि मान्यवर उपस्थित होते.

कोरोनाचे आव्हान अजूनही संपलेले नाही. जिल्ह्याच्या आरोग्य सेवेसाठी आपण प्रयत्नांची शर्त करुन मोठ्या प्रमाणात विविध महत्वाची यंत्रसामुग्री घेतली आहे. यासाठी आवश्यक असणारे कर्मचारी व डॉक्टर्स उपस्थित असणे तेवढेच आवश्यक आहे. डॉक्टर आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर वाढलेला ताण समजून घेवून त्यावर मार्ग काढला पाहिजे. सप्टेबर-ऑक्टोबर किंवा त्याही अगोदर कोरोनाची तिसरी लाट येणे अपेक्षित धरुन त्यासाठी आतापासूनच जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने सज्ज झाले पाहिजे, असेही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

रेमडेसिव्हिरची कमतरता आहे हे सत्य नाकारता येणार नाही. जो काही साठा सद्या मिळत आहे. तो खऱ्या गरजूवंताना मिळले याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. शासकीय वैद्यकिय महाविद्यालय येथे नर्सिंग कॉलेजलाही मान्यता मिळवून दिलेली आहे. याचबरोबर वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी नव्या इमारतीत अधिकाधिक चांगल्या सुविधा आता आणखी देत आहोत. हे नर्सिंग कॉलेज तात्काळ सुरु करण्याबाबत अधिष्ठाता यांनी खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार राजेश पवार यांनी आरोग्य सुविधेबाबत विविध प्रश्न उपस्थित केले होते.

0000

 

राज्याचा औद्योगिक उत्पादन निर्देशांक वेबपोर्टलचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते उद्घाटन

                                     राज्याचा औद्योगिक उत्पादन निर्देशांक वेबपोर्टलचे

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते उद्घाटन


नांदेड (जिमाका) दि. 4 :- देशाच्या एकूण सकल उत्पन्नामध्ये महाराष्ट्राचा जवळपास 14 टक्के वाटा तर देशाच्या एकूण उत्पादनात 15 टक्के इतका वाटा आहे. उद्योग क्षेत्रात आपण अग्रेसर आहोत. राज्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी वेळोवेळी आढावा घेवून योग्य नियोजन करणे हे आवश्यक असते. यासाठी मात्र औद्योगिक उत्पादन निर्देशांकाची अचूक माहित असणे आवश्यक असते. ही अचूक माहिती वेबपोर्टलच्या माध्यमातून आता सहज उपलब्ध होईल असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. या वेबपोर्टलचे उद्घाटन त्यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्ष सभागृहा ऑनलाईन पध्दतीने संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.

या छोटेखानी समारंभास उद्योग मंत्री ना.श्री सुभाष देसाईउद्योग राज्य मंत्री ना. श्रीमती आदिती तटकरे यांनी ऑनलाईन उपस्थिती दिली. अपर मुख्य सचिव (नियोजन विभाग) देबाशिष चक्रवर्ती, अपर मुख्य सचिव  (उद्योग विभाग) बलदेव सिंहसंचालक  (अर्थ    सांख्यिकी संचालनालय) र.र. शिंगे, केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारीअर्थ व सांख्यिकी संचालनालय व उद्योग संचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते. अपरमुख्यसचिव (नियोजनविभादेबाशिष चक्रवर्ती, ,यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले तर  संचालक  (अर्थ    सांख्यिकी संचालनालय) .शिंगे यांनी प्रास्ताविक केले. 

या प्रकल्पामुळे भविष्यात उद्योग विषयक महत्वाच्या आकडेवारीची उपलब्धता होईल. राज्याच्या औद्योगिक विकासाचे उद्दिष्ट साध्य करणे, राज्याचे औद्योगिक धोरण निश्चित करणे, औद्योगिक विकासाच्या योजना ठरविणे व यासाठी औद्योगिक क्षेत्रातील चढउताराचे मोजमाप या दृष्टीने यासाठी या वेबपोर्टलचा निश्चित उपयोग होईल, असे प्रतिपादन उद्योगमंत्री  सुभाष देसाई यांनी आपल्या मनोगतात केले.

0000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...