Thursday, February 22, 2018


बॅडमिंटन हॉल खेळाडुसाठी उपलब्ध
नांदेड, दि. 22 :- तालुका क्रीडा संकुल समिती सिडको-नांदेड येथे बहुउद्देशीय इनडोअर हॉलचे बांधकाम करण्यात आले आहे. हा इनडोअर हॉल सिडको परिसर व ग्रामीण भागातील खेळाडू व जेष्ठ नागरिकांसाठी बॅडमिंटन खेळासाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. संबंधीत खेळाडुंनी तालुका क्रीडा अधिकारी सिडको-नांदेड यांचेकडे नाव नोंदणी करावी, असे आवाहन तालुका क्रीडा अधिकारी एम. जे. सोनकांबळे  यांनी केले आहे.   
शालेय खेळाडुनी नोंदणी शुल्क 100 व मासीक शुल्क 200 रुपये आकारण्यात येणार असून इतर खेळाडू, सभासदांना नोंदणी शुल्क 250 व मासीक शुल्क 500 रुपये आकारण्यात येणार आहे. इच्छूक खेळाडू व नागरिकांनी तालुका क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा मार्गदर्शक प्रा. डॉ. रमेश नांदेडकर व आनंद जोंधळे यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन तालुका क्रीडा अधिकारी  श्री. सोनकांबळे यांनी केले आहे.
000000


रास्तभाव धान्य दुकानात
तीन महिन्याची साखर उपलब्ध
नांदेड दि. 22 :-सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेअंतर्गत नांदेड जिल्‍हयातील अंत्‍योदय शिधपत्रिकाधारकासाठी शासनाने मार्च, एप्रिल व मे 2018 साठी नियमित नियतन साखर प्रति शिधापत्रिका एक किलो याप्रमाणे मंजुर केले आहे. या महिन्‍यात जिल्‍हयासाठी 2308.76 क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्‍त झाले आहे. या नियतनाची उचल करुन प्रत्‍यक्ष शिधापत्रिकाधारकास संबंधीत स्‍वस्‍त धान्‍य दुकानामार्फत वितरण करण्‍यात येणार आहे.   
तालुका निहाय नियतन पुढील प्रमाणे देण्‍यात आले आहे. नांदेड व लोहा- 193 , हदगाव- 141, किनवट- 459, भोकर- 92, बिलोली- 143, देगलूर- 257.76, मुखेड- 201, कंधार- 121, लोहा- 106, अर्धापूर- 44, हिमायतनगर- 67, माहूर- 196, उमरी- 63, धर्माबाद- 75, नायगाव- 112, मुदखेड- 38 याची सर्व अंत्‍योदय शिधापत्रिकाधारकांनी स्‍वस्‍त धान्‍य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी  केले आहे.
0000000


शिल्पनिदेशक पदासाठी मुलाखत
नांदेड, दि. 22 :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धर्माबाद येथे शिल्पकारागीर योजनेंतर्गत शिल्पनिदेशकांचे पद तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर तत्वाभ्यास व प्रात्यक्षिक शिकविण्यासाठी नेमणुक करण्यात येणार आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी बुधवार 28 फेब्रुवारी 2018 रोजी मुळ व छायांकित कागदपत्रासह मुलाखतीस शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था धर्माबाद येथे सकाळी 11.30 वा. उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे.
यांत्रिक कृषित्र, संधाता, कातारी, विजतंत्री या व्यवसायासाठी शिल्पनिदेशकांचे पद तासिका तत्वावर भरण्यात येणार आहे. शैक्षणिक अर्हता ही संबंधीत व्यवसायात यंत्र, विद्युत अभियांत्रिकी किमान द्वितीय श्रेणीत पदवी, पदविका व एक-दोन वर्षाचा अनुभव किंवा संबंधीत व्यवसायातील आयटीआय प्रमाणपत्र एनसीव्हीटी / एटीएस परीक्षा उत्तीर्ण आसावा. तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. सीटीआय उत्तीर्ण उमेदवारास व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झालेले शिल्पनिदेश / गटनिदेशक यांना प्राधान्य देण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना शासन निर्णयानुसार अटी मान्य असल्याचे लेखी हमीपत्र दिल्यानंतरच तासिक तत्वारील नियुक्ती मिळेल. या संस्थेस यापुर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी नमूद केलेल्या दिनांकास संस्थेत उपस्थित रहावे. त्यानंतर आलेल्या संबंधीत उमेदवारांचा विचार केला जाणार नाही, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.  
000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...