Tuesday, January 30, 2018

कर्जमाफीचा लाभ अद्याप न मिळालेल्या अर्जदार शेतकऱ्यांनी
बँकेशी संपर्क साधावा
- सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे आवाहन
            मुंबई, दि. 30 : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ ज्या अर्जदार शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही, त्यांनी त्यांच्या बँक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.
            शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पात्र अर्जदार शेतकऱ्यांना बँकांकडील माहितीच्या आधारे कर्जमाफीचा, प्रोत्साहनपर लाभाचा फायदा देण्यात आला आहे. काही शेतकऱ्यांनी त्यांच्या अर्जात दिलेली कर्जाची माहिती ही बँकेकडून प्राप्त झालेल्या कर्ज खात्यांच्या माहितीशी जुळत नसल्याने अशा शेतकऱ्यांना लाभ मिळू शकला नाही. अर्जदार शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीची शहानिशा करुन पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देता यावा म्हणून शासनाने तालुकास्तरीय समिती गठित केली आहे. अशा शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित बँकेत उपलब्ध करुन दिलेल्या आहेत व बँकांनी त्यांच्या शाखेत त्या याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत.
            कर्जमाफी योजनेचा लाभ प्रलंबित असलेल्या अर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज खात्याची अचूक माहिती आपल्या बँकेच्या शाखेत त्वरीत सादर करावी. शेतकऱ्यांसंबंधी माहितीची शहानिशा करुन त्यामध्ये आवश्यक ती दुरुस्ती बँकेमार्फत करण्यात येईल. त्यानंतर तालुकास्तरीय समितीमार्फत तपासणी अंती ही माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात येऊन योजनेंतर्गत लाभ देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. सर्व संबंधित शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क साधण्याचे आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.

००००
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे
1 फेब्रुवारीला आयोजन
नांदेड दि. 30 :- उज्ज्वल नांदेड या मोहिमेअतंर्गत जिल्हाधिकारी कार्यालय सेतू समिती, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने गुरुवार 1 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 2 यावेळेत डॉ. करराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम परिसर नांदेड ेथे एक दिवसीय स्पर्धा परिक्षा मार्गदर्शनशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या मार्गदर्शनशिबिरास विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी केले आहे.
  जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न  होणाऱ्या  या शिबिरात पुणे येथील सुजीत पवार  हे सर्वसाधारण बुद्धीमत्ता गणीत या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी धर्माबाद येथील सहाय्यक पोलीस अधिक्षक नुरुल हसन उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांचे स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन राहणार आहे. यावेळी मनपा आयुक्त गणेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...