Friday, May 24, 2019


 गुटखा, पानमसाला कार्यवाहीत
51 हजार रुपयाचा साठा जप्त  
      
नांदेड दि. 24 :- प्रतिबंधित अन्नपदार्थाची साठवणूक, वाहतूक, विक्री व उत्पादन करणाऱ्या अन्न व्यावसायिकाविरुद्ध माहूर येथे 15 हजार 600 रुपये तर  किनवट येथे 35 हजार 474 रुपयाचा साठा जप्त करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध गुटखा, पानमसाला व तत्सम पदार्थाची विक्री करणाऱ्या विरुद्ध नियमित कारवाई करण्यात येणार आहे. असे अन्न पदार्थ कोणी छुप्या, चोरट्या पद्धतीने विक्री, उत्पादन, साठा, वाहतूक करु नये असे आवाहन नांदेड येथील अन्न व औषध प्रशासनचे तु. चं. बोराळकर यांनी केले आहे.  
            अन्न व औषध प्रशासनचे सुरक्षा अधिकारी यांनी 20 मे रोजी माहूर शहरातील नगीना मसिद जवळ शेख युसुफ शेख रशिद (वय 40 वर्षे) व किनवट नालागड्डा येथील असिफखान मसिदखान (वय 32 वर्षे) या व्यक्तीच्या ताब्यातून प्रतिबंधित अन्नपदार्थ गुटखा, सुगंधित तंबाखू आदींचा एकुण 51 हजार 074 रुपयाचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध पोलीस स्टेशन माहूर येथे अन्न सुरक्षा कायदा व भादवि नुसार गुन्हा दाखल केला आहे. मा. न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्यास संबंधितास आजीवन तुरुगंवास आणि 10 लाख रुपयापर्यंत शिक्षेची तरतुद आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड यांनी सहाय्यक आयुक्त तु. चं. बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
00000


स्कूल बसेसचे योग्यता प्रमाणपत्र
नूतनीकरणाचे आवाहन
       नांदेड दि. 24 :- मा. उच्च न्यायालय मुंबई, नागपूर खंडपीठ यांनी जनहित याचिका क्र.2 / 2012 मध्ये दिलेल्या आदेशान्वये ज्या स्कूल बसेस / स्कूल व्हॅन यांचे योग्यता प्रमाणपत्राची वैधता संपलेली आहे, अशा वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र विहित नमून्यात अर्ज करुन अपॉईंटमेट घेऊन शालेय सत्र सुरु होण्यापूर्वी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करुन घ्यावे. जर अशी वाहने कार्यालयात योग्यता प्रमाणपत्र तपासणीकरिता हजर केल्यास संबंधीत वाहनांविरोधात परवाना निलंबनाची कार्यवाही करण्यात येईल याची जिल्हयातील सर्व स्कूलबस मालक / चालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.
000000

  वृत्‍त क्र.   36 6 एमएच-सीईटी परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश   नांदेड , दि.   19   : - एमएच-सीईटी परीक्षा-2024     ही 2...