Saturday, August 4, 2018


एमपीएससीमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा
आज जिल्हा प्रशासनातर्फे नागरी सत्कार
नांदेड दि. 4 :- "उज्ज्वल नांदेड" या मोहिमेंर्गत जिल्हाधिकारी कार्यालय सेतू समिती, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने रविवार 5 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 10.30 वा. डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम परिसर नांदेड येथे एमपीएससी यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने 23 24 सप्टेंबर 2017 या दोन दिवसात प्रतिरुप मुलाखाती (mock Interview) घेण्यात आले होते. त्यातील जवळपास 30 विद्यार्थ्यांची पोलिस उपनिरीक्षक या पदावर निवड झाली आहे. तसेच शासनाच्या इतर काही विभागात विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. अशा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकासह नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रास प्रमुख अतिथी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, प्रा. मनोहर भोळे व औरंगाबादचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   404   लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये  मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश   नांदेड दि. 3 मे :-  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2...