Tuesday, May 24, 2022

 शालेय शिक्षणासाठी लागणारे विविध

प्रमाणपत्र वेळेत काढून घेण्याचे आवाहन

 

नांदेड, (जिमाका) दि. 24 :- इयत्‍ता दहावी व बारावीच्‍या परीक्षा नुकत्‍याच संपलेल्‍या आहेत. त्‍यानुसार सर्व जण निकालाची वाट पाहत आहेतनिकालानंतर पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्‍यासाठी विविध दाखल्‍याची गरज असतेतहसिल कार्यालयामार्फत उत्‍पन्‍नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, राष्‍ट्रीयत्‍व प्रमाणपत्र, शेतकरी असल्‍याचे प्रमाणपत्र, भुमिहिन प्रमाणपत्र इत्‍यादी दाखले  वितरित करण्‍यात येत असतात याअनुषंगाने प्रमाणपत्राची आवश्‍यकता असल्‍यास विनाविलंब तात्‍काळ सेतु सुविधा केंद्रामार्फत विहित नमुन्‍यात ऑनलाईन अर्ज दाखल करुन प्रमाणपत्र प्राप्‍त करुन घ्‍यावे, असे आवाहन नांदेड तहसिल कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.  

 

निकालानंतर पुढील प्रवेशासाठी असणारा मर्यादित कालावधी त्‍याचवेळी तहसिल कार्यालयात विविध दाखल्‍यासाठी प्राप्‍त होणाऱ्या  अर्जांचे प्रमाण मोठया प्रमाणात राहु शकते. त्‍यामुळे सर्व अर्जांची तपासणी करण्‍यास वेळ लागतो तसेच सदर केलेल्‍या अर्जात काही त्रुटी असल्‍यास त्‍याची पुर्तता करण्‍यासाठी आपणास पुरेसा वेळ मिळत नाहीतसेच सर्व सेतु केंद्रामार्फत मोठया प्रमाणात प्रमाणपत्रांची आवक वाढून ऑनलाईन प्रमाणपत्र ज्‍या सर्व्‍हरद्वारे देण्‍यात येतात ते सर्व्‍हर युजर्सच्‍या संख्‍या जास्‍त असल्‍यामुळे हॅंग होणे होणे या अडचणी निर्माण होण्‍याची शक्‍यता नाकरता येत नाहीत्‍यामुळे विनाविलंब तात्‍काळ पुढील प्रवेशासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करुन वेळेआधीच प्रमाणपत्र प्राप्‍त करुन घ्‍यावे, असेही आवाहन नांदेड तहसिल कार्यालयाने तालुक्‍यातील सर्व पालक, विद्यार्थी, नागरीक, शिक्षकांना केले आहे.

00000 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...