Tuesday, January 20, 2026

वृत्त क्रमांक 66

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमात 

पंचक्रोशीतील गावांचा सहभाग वाढविण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार

पंचक्रोशीतील गावांचा भव्य जनसहभाग; नगर किर्तनातून सामाजिक ऐक्याचा संदेश”

नांदेड, दि. २० जानेवारी:– शिख पंथाचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त नांदेड शहर व पंचक्रोशीतील गावकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग मिळावा, यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी आज लंगर साहिब गुरुद्वारा येथे भेट देऊन बाबा बलवंदरसिंग जी यांच्याशी चर्चा केली.

यावेळी बाबा बलवंदरसिंग यांनी नांदेड शहरासह पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना आवाहन केले की, शनिवार २४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजता तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथून निघणाऱ्या भव्य नगर किर्तनात नागरिकांनी, महिला, युवक व बालगोपालांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

तसेच प्रत्येक गावातून किमान एक दिंडी भजन मंडळासह नगर किर्तनात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांनी धर्म, मानवी हक्क व समाजहितासाठी दिलेल्या बलिदानाचा गौरवशाली इतिहास समाजापर्यंत पोहोचावा, यासाठी जनसहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

नगर किर्तनाच्या माध्यमातून त्याग, बलिदान व सामाजिक ऐक्याचा संदेश संपूर्ण देशभर पोहोचेल आणि श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांना हीच खरी अभिवादन ठरेल, असे बाबा बलवंदरसिंग यांनी सांगितले.

०००००

No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...