Wednesday, August 18, 2021

 

जुन्या वाहनांच्या नोंदणीसह थकीत पर्यावरण कर भरणे अनिवार्य 

नांदेड (जिमाका) दि. 18 : खाजगी संवर्गातील दुचाकी, चारचाकी, तीनचाकी वाहनाची वयोमर्यादा नोंदणीस 15 वर्षे पूर्ण झाली आहे अशा वाहनांची नोंदणी ही विधीग्राह्य राहणार नाही. या वाहनाच्या नोंदणीचे नूतनीकरण करणे मोटार वाहन नियम 1989 अन्वये अनिवार्य केले आहे. नूतनीकरण न झालेल्या विधिग्राह्यता संपलेल्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तपासणी पथकामार्फत कारवाई करण्यात येणार आहे. 

तसेच ज्या वाहनाच्या नोंदणीस 15 वर्षे पुर्ण झाली आहेत व परिवहन संवर्गातील मालवाहतूक करणारे लोडींग ऑटो, टेम्पो, ट्रक, बसेस याची वयोमर्यादा 8 वर्षे पूर्ण झाली आहे अशा वाहनांना पर्यावरण कर भरणा न केल्यास 2 टक्के प्रती महिना व्याज आकारण्यात येते. ज्या वाहनांचा पर्यावरण कर थकीत आहे अशा वाहनधारकांनी तातडीने थकीत कराची भरणा करुन भरारी पथकाद्वारे होणारी कारवाई  टाळावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...