Wednesday, May 17, 2023

 गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेत

अशासकीय संस्थाना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :-  शासनाच्यावतीने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या अशासकीय संस्थानी पुढील नमुद केलेल्या कार्यालयाशी संपर्क करुन मृद व जलसंधारण विभागाच्या अखत्यारित जलसाठ्यांची माहिती घ्यावी व संबंधित ग्रामपंचायतीचे ठराव सोबत सदस्य सचिवजिल्हास्तरीय समितीगाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना तथा जिल्हा जलसंधारण अधिकारीमृद व जलसंधारण विभागपाटबंधारे वसाहतचैतन्यनगरनांदेड-05 (दु.क्र. 02462-260813 व ई-मेल eessiwcnanded@gmail.com) येथे प्रस्ताव सादर करावेतअसे आवाहन सदस्य सचिव जिल्हास्तरीय समिती गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार तथा जिल्हा जलसंधारण अधिकारीमृद व जलसंधारण विभाग नांदेड यांनी केले आहे.

 

राज्यात 6 मे 2017 पासून 31 मार्च 2020 अखेर पर्यंत गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबविण्यात आली होती. शासन निर्णय 20 एप्रिल 2023 अन्वये सदर योजना पुन्हा सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या अशासकीय संस्थाना यंत्रसामुग्री आणि इंधन या दोन्हीचा खर्च देणे प्रस्तावित आहे. अल्प व अत्यल्पभुधारकविधवा, दिव्यांग व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल यासाठी अनुदान देणे प्रस्तावित आहे. अशासकिय संस्थांना गाळ काढण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री आणि इंधनासाठी 31 रुपये प्रति घनमीटर व पात्र शेतकऱ्यांना शेतात गाळ पसरविण्यासाठी 35 रुपये 65 पैसे प्रति घनमीटर प्रमाणे 15 हजार रुपयांच्या मर्यादा व 2.5 एकर (37 हजार 500 रुपयांपर्यंत) अनुदान दिले जाणार आहे.

 

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मृद व जलसंधारण विभाग यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार तसेच शासन निर्णय क्र.: गामुध 2023/प्र.क्र.22/जल-13 दि. 04.05.2023 अन्वये संस्था निवडीचे निकष आणि दिलेल्या अटी व शर्तीची पुर्तता करणे बंधनकारक आहे व त्यानंतरच अशासकीय संस्थांना पात्र ठरविण्यात येईल.

 

तालुकास्तरावर संपर्कासाठी तालुकास्तरीय अध्यक्ष यांचे मुख्यालयसमाविष्ट तालुकेसंपर्काचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. नांदेड मुख्यालयात नांदेडहदगावहिमायतनगर तालुक्याचा समावेश असून संपर्कासाठी उप विभागीय जलसंधारण अधिकारी नांदेड यांचा मो. क्र. 8007262021 व ई-मेल sdwconed@gmail.com याप्रमाणे आहे. मुखेड मुख्यालयात मुखेड तालुक्याचा समावेश असून संपर्कासाठी उप विभागीय जलसंधारण अधिकारीमुखेड  यांचा मो. क्र. 9423347886 व ई-मेल sdwcomukhed@gmail.com याप्रमाणे आहे. नायगाव मुख्यालयातर्गत नायगावधर्माबादउमरी या तालुक्याचा समावेश असून संपर्कासाठी उप विभागीय जलसंधारण अधिकारीनायगाव यांचा मो. क्र. 9421084530 व ई-मेल sdwconaigaon@gmail.com सा आहे. भोकर मुख्यालयातर्गत भोकरमुदखेडअर्धापुर या तालुक्यांचा समावेश असून संपर्कासाठी उपविभागीय जलसंधारण अधिकारीमृद व जलसंधारण उप विभाग भोकर यांचा मो. क्र.7350276165 व ई-मेल  sdwcobhokar@gmail.com याप्रमाणे आहे. कंधार तालुकास्तरीय मुख्यालयातर्गत कंधारलोहा तालुक्याचा समावेश असून संपर्कासाठी उप विभागीय जलसंधारण अधिकारी कंधार यांचा मो.क्र. 9049888753 व ई-मेल sugm@rediffmail.com याप्रमाणे आहे. किनवट तालुकास्तरीय मुख्यालयातर्गत किनवटमाहुर तालुक्याचा समावेश असून उप विभागीय जलसंधारण अधिकारीकिनवट यांचा मो. क्र. 7276167441 व ई-मेल sdossiwc.kinwat@gmail.com याप्रमाणे आहे. देगलूर मुख्यालयातर्गत देगलूरबिलोली तालुक्याचा समावेश असून संपर्कासाठी उप विभागीय जलसंधारण अधिकारीदेगलुर यांचा मो. क्र. 9421321402 ई-मेल dwco.swcsddeglurg@gmail.com याप्रमाणे आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...