Friday, May 12, 2017

वंचितापर्यंत शासनाच्या सेवा पोहचविण्यासाठी
शासन कटीबद्ध - अंकुश पिनाटे
नांदेड, दि. 12 :- जिल्ह्यात वंचितांचा शोध घेवून त्यांच्यापर्यंत शासनाच्या सेवा पोहचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे यांनी केले. नांदेड तहसिल कार्यालयाच्यावतीने आयोजित शोध शुद्धीकरण प्रतिसाद मोहिमअंतर्गत निवडणूक ओळखपत्राचे नुकतेच वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
अनुलोम संस्थेचा सहाय्याने शांतीनगर येथील कचरा गोळा करणाऱ्या वंचितांचा शोध घेऊन त्यांच्यासाठी मतदार यादीत नाव नोंदणी शिबीर नुकतेच त्यांच्या भागात जावून घेण्यात आले. यावेळी 102 वंचितांची व काही मुकबधीर दिव्यांगांची नाव नोंदणी करण्यात आली. त्यांना निवडणूक ओळखपत्र उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे व मतदार नोंदणी अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
मतदार नोंदणी अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचा पार्श्वभुमी स्पष्ट केली. या कार्यक्रमामुळे शासन आमच्या पाठिशी असल्याचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे, अशी प्रतिक्रिया सुनील हातवळणे यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार गजानन नांदगावकर, शांतीनगर येथील नवीन मतदार व कर्मचारी उपस्थित होते.

0000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   392   23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद ; निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये   ·      लोकसभा...