Tuesday, November 21, 2017

किनवट नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका
मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडाव्यात
- निवडणूक निरीक्षक राम गगराणी
            नांदेड दि. 21 :- किनवट नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणुका मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडाव्यात यासाठी कायदा व सुव्यवस्था, संशयास्पद आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश निवडणूक निरीक्षक तथा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष राम गगराणी यांनी दिल्या.
किनवट नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी विविध उपाययोजनाची आखणी, राज्‍य निवडणूक आयोगाच्‍या विविध आदेशांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्‍यासाठी स्‍थापन करण्‍यात आलेल्‍या जिल्‍हास्‍तरीय निवडणूक संनियंत्रण समितीची बैठक निवडणूक निरीक्षक राम गगराणी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.  
किनवट नगरपरिषदेची बुधवार 13 डिसेंबर, 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. आचारसंहितेची अंमलबजावणी व खर्चावर नियंत्रण ठेवणे, आर्थिक बळाचा दुरुपयोग टाळणे आदी उपाययोजना आखण्यात आल्या आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.  
            या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनुराधा ढालकरी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संचालक डॉ. राजेश्वर दुडूकनाळे , रासयो समन्वयक प्रा. एन. व्ही. कांबळे, माहूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डोईफोडे काकासाहेब, सहा. प्रा. परिवनहन अधिकारी विजय तिराणकर , जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अजय क. अटोर, बी. आर. जायभाये, जि.प्र.आ. पराग वानखेडे आदिंची यावेळी उपस्थिती होती.

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 409   वादळी वारे वाहण्याची ,   विजेच्या कडकडाटासह , ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता   नांदेड दि.  6  मे :-   प्रादेशिक ...