Sunday, April 14, 2019


मी मतदान करणारच.... या सेल्फी पॉइंट चे उद्घाटन
नांदेड, दि. 12 :- मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती व्हावी यासाठी मी मतदान करणारच.... यासेल्फी पॉइंटचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व निवडणूक निरीक्षक हरदीप सिंग यांच्या  हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उद्घाटन करण्यात आले आहे. 
नांदेड  लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे गुरुवार 18 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे. मतदानाविषयी जनजागृती व्हावी. स्वीपकक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांच्याकडून या सेल्फी पॉइंटचे  आयोजन करण्यात आले आहे. शहरात बसस्थानक व रेल्वे स्थानक याठिकाणी सुद्धा सेल्फी पॉइंट लावण्यात आले आहे. या ठिकाणी भेट देऊन सर्व नागरिकांनी सेल्फी काढण्याचा आनंद घ्यावा. सोशल मीडियावर प्रसारित करुन मतदार जनजागृती अभियानामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा  व जास्तीत जास्त  मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण परदेशी, निवासी जिल्हाधिकारी संतोष वेणीकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत शेळके, अनुराधा ढालकरी, गीता ठाकरे, संतोष कंदेवार, किरण अंबेकर, प्रशांत डिग्रसकर, दिलीप बनसोडे,  मिलिंद व्यवहारे तसेच कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सेल्फी पॉइंट हा उपक्रम  यशस्वी करण्यासाठी स्वीप कक्षाचे सदस्य प्रलोभ कुलकर्णी, शेख रुस्तूम, रवी ढगे,कविता जोशी, गणेश रायेवार, प्रसाद शिरपूरकर,  धिरेन आठवले,अभिजीत हिवरे  यांनी परिश्रम घेतले.
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   407 लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  नांदेड दि. ४ मे :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 प्र...