वृत्त क्रमांक 99
श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत
जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनास प्रशिक्षणार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
नांदेड, २३ जानेवारी:- औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणार्थ्यांना केवळ तांत्रिक प्रशिक्षणापुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या कौशल्यांना वाव मिळावा, नवनवीन संकल्पनांचा विकास व्हावा तसेच नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या तंत्रप्रदर्शनामध्ये नांदेड जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सहभागी झाल्या असून, एकूण जवळपास २४ संस्थांनी आपला सहभाग नोंदविला. विविध तांत्रिक मॉडेल्स, कार्यक्षम यंत्रणा, नवोन्मेषी प्रकल्पांचे सादरीकरण यामुळे प्रदर्शन विशेष लक्षवेधी ठरले.
या कार्यक्रमास संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य हर्षदभाई शहा, प्रस्तुत संस्थेचे प्राचार्य तथा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुर्यवंशी एस. व्ही., औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अर्धापूर येथील प्राचार्य तथा उपप्राचार्य श्री. कंदलवाड व्ही. डी., तसेच मा. प्राचार्य श्री त्रिचूरकर, श्री फारुकी , श्री गायकवाड , श्री पिंडकुलवार , श्री अन्नपूर्णे पी. के. यांच्यासह जिल्ह्यातील विविध औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे अधिकारी, कर्मचारी व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तंत्रप्रदर्शनामुळे प्रशिक्षणार्थ्यांच्या व्यावसायिक कौशल्यांना चालना मिळून त्यांच्यात आत्मविश्वास, सर्जनशीलता व स्पर्धात्मक वृत्ती विकसित होण्यास मदत झाली, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
०००००
No comments:
Post a Comment