Friday, January 23, 2026

वृत्त क्रमांक 98

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा नांदेड दौरा

नांदेड, दि. 23 जानेवारी :- राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे दि. 23 व 24 जानेवारी, 2026 रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे राहील. 

शुक्रवार 23 जानेवारी, 2026 रोजी सायंकाळी 05.25  वा. मुंबई येथून विमानाने नांदेडकडे प्रयाण. रात्री 06.35 वाजता नांदेड विमानतळावर आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह कडे प्रयाण. रात्री 7 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.

शनिवार दि. 24 जानेवारी, 2026 रोजी सोईनुसार मोदी ग्राऊंड, कौठा, नांदेड येथे आयोजित हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार शासकीय विश्रामगृह, नांदेडकडे प्रयाण करुन तेथे आगमन व राखीव राहील.

***

No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...