वृत्त क्रमांक 97
महानगर किर्तन दरम्यान घरासमोर रंगीबेरंगी फुलं,
रांगोळींनी सजावट करून सहभाग नोंदवावा
नांदेड, दि. 23 जानेवारी :- हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहाद्दूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमीत्त श्री गुरूग्रंथ साहीब नगर किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर महानगर किर्तनास शनिवार 24 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8 वा. गुरूव्दारा गेट नं 1 पासून गुरूव्दारा चौक-महाविर चौक- वजिराबाद मार्केट येथून वजिराबाद चौक-तिरंगा चौक-रामसेतू दादरा-रविनगर-नागार्जून पब्लिक स्कूल-मामा चौक या मार्गाने मोदी मैदान मुख्य कार्यक्रम स्थळी पोहचणार आहे.
या मार्गातील सर्व रहिवाशी यांनी या महानगर किर्तनादरम्यान आपण आपल्या घरासमोर, दुकानासमोर रंगीबेरंगी फुलांनी अथवा रांगोळीनी संपूर्ण रस्त्याच्या बाजूने सजावट करावी. तसेच आपल्या घरावर, दुकानावर विद्युत रोशनाई तसेच दिवे लावून पालखीचे स्वागत करून भव्य महानगर किर्तनात सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
000000
No comments:
Post a Comment