Wednesday, June 21, 2017

वाद तंट्यातील मध्यस्थीची भुमिका 
साधु संतासारखी  - न्या. मांडे
नांदेड दि. 21  :- कोणत्याही प्रकारचे वादविवादात किंवा तंट्यामध्ये व्यक्ती कोणतीही अपेक्षा करता झालेला वाद मिटविण्याचा प्रयत्न करतो परिणामी वाद मिटतो त्यावेळी त्याने केलेली मध्यस्थीची भुमिकाही साधु संताएवढी असते , असे प्रतिपादन न्या. व्ही. के. मांडे यांनी केले.   
जिल्हा सत्र न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणांतर्गत मध्यस्थीची जागरुकता  निर्माण करण्यासाठी मुख्य मध्यस्थी केंद्र मुंबई यांचे सुचनेनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सभागृह येथे मध्यस्थी कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थावरुन मार्गदर्शन करताना न्या. मांडे बोलत होते. 
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. डी. टी. वसावे म्हणाले की , मध्यस्थीची संकल्पना ही समाजात रुढी, परंपरेने सुरु झाली आहे. मध्यस्थला ईश्वराचे स्वरु प्राप्त झाले आहे. पुढे नागरिक पंचासमक्ष वाद-विवाद, तंटा मिटवू लागले. स्वातंत्र्यानंतर भारतात कायदचे राज्य आले आणि दिवाणी प्रक्रिया संहितामध्ये कलम 89 (डी) मध्ये मध्यस्थीला स्थान देण्यात आले. त्यानुसार न्यायालयात वाद-विवादाने प्रकरणे निकाली निघत आहेत.  यावेळी जेष्ठ विधीज्ञ व्ही. . नांदेडकर यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अभिवक्ता संघाचे उपाध्यक्ष अॅड. जगजीवन भेदे, अॅड. पाटनुरकर, अॅड. एम. एल. गायकवाड, अॅड. सुकेशनी वासणीक यांच्यासह अनेक ज्येष्ठ विधिज्ञ उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांनी केले.
00000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...