Wednesday, June 21, 2017

"उन्नत शेती समृध्द शेतकरी" मोहिमेतर्गत
लाभार्थी निवडीसाठी तालुकानिहाय सोडतीचे आयोजन ;
अर्जदार शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन
नांदेड दि. 21 :- "उन्नत शेती समृध्द शेतकरी" मोहिमेंतर्गत  जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी औजारासाठी कृषि विभागाकडे अर्ज केली आहेत अशा पात्र लाभार्थ्यांची निवड लॉटरी  पध्दतीने करण्यात येणार आहे. संबंधीत उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी अर्जदार शेतकऱ्यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात येणार आहे. अर्जदार शेतकऱ्यांनी संबंधीत तालुक्यात सोडतीच्या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन कृषि विभागामार्फत  करण्यात आले आहे.
पात्र अर्जदारांची सोडतीद्वारे ज्येष्ठता क्रमवार निश्चित केला जाणार आहे. ट्रॅक्टर इतरजारासाठी अर्जाप्रमाणे वेगळी यादी करण्यात येणार आहे. त्या यादीतून सोडत काढली जाणार आहे. सोडतीचा कार्यक्रम स्थळ वेळ पुढील प्रमाणे राहील.    
गुरुवार 22 जुन 2017 रोजी कंधार तालुका- तहसिल कार्यालय कंधार येथे सकाळी 11 वा. लोहा- कृषि अधिकारी कार्यालय पारडी दुपारी 3 वा. धर्माबाद- तालुका  तालुका कृषि अधिकारी कार्यालय दुपारी 2 वा. बिलोली-  तालुका  गुणन केंद्र  कासराळी सकाळी 11 वा.  किनवट- कृषि अधिकारी कार्यालय किनवट सकाळी 11 वा. माह- पंचायत समिती सभागृह दुपारी 3 वा.
शुक्रवार 23 जुन रोजी नांदेड तालुका- जिल्हा फळ रोपवाटीका धनेगाव येथे सकाळी 11 वा.  मुदखेड- जिल्हा फळ रोपवाटीका धनेगाव दुपारी 12.30 वा. अर्धापूर- जिल्हा फळ रोपवाटीका धनेग  दुपारी 3 वा. मुखेड- तालुका बी गुणन केंद्र मुखेड सकाळी 11 वा. नायगाव- तालुका कृषि अधिकारी नायगाव दुपारी 3 वा. हदगाव- पंचायत समिती सभागृह  सकाळी 11 वा. हिमायतनगर- तालुका कृषि अधिकारी कार्यालय हिमायतनगर  दुपारी 3 वा. याप्रमाणे सोडतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संबंधीत तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोडतीच्या ठिकाणी उपस्थित राहावे, असेही आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.        

000000

No comments:

Post a Comment

 शासकीय लेखनसामुग्री व ग्रंथागार 22 ते 26 एप्रिल या कालावधीत बंद छत्रपती संभाजीनगर, दि. 18 (विमाका): शासकीय लेखनसामुग्री व ग्रंथागार, छत्रपत...